आईपणाच्या जबाबदाऱ्यांतून स्वतःची ओळख शोधणारी स्त्री


आईपणाच्या जबाबदाऱ्यांतून स्वतःची ओळख शोधणारी स्त्री




आई म्हणून जबाबदारी,आणि स्त्री म्हणून एक नवे स्वप्न

आजचा दिवसही नेहमीसारखाच सुरू झाला…


सकाळी लवकर उठणं, डबा, नाश्ता, शाळेची घाई, मुलांची वही तपासणं, वही उघडली, अक्षर विस्कटलेलं, ओळी नीट नाहीत, काही शब्द खोडलेले…


आणि नकळत तोंडातून निघालं — “अजूनही अक्षर सुधारलं नाही…”


पण त्या वहीकडे पाहताना

आई म्हणून तुमचं मन जसं काळजीने भरून येतं,

तसंच कुठेतरी आतून

एक वेगळंच दुःख टोचून जात नाही का…?


💭 “मी कोण आहे?” हा प्रश्न


आई म्हणून तुम्ही परिपूर्ण आहात.

पण स्त्री म्हणून…?


कधी शांत क्षणी स्वतःला विचारलंत का — मी फक्त आईच आहे का?

माझी स्वतःची काही ओळख आहे का?

माझं स्वतःचं काही स्वप्न आहे का?


लग्नानंतर हळूहळू तुमचं नाव “अमुकची बायको” “अमुकची आई”यात कुठेतरी हरवून गेलं…


तुमच्या इच्छा,तुमचे छंद, तुमचं स्वप्न…


सगळं बाजूला ठेवलंत —

कारण “मुलांचं भविष्य महत्त्वाचं आहे”.


पण आई…

मुलांचं भविष्य घडवताना, तुमचं स्वतःचं आयुष्य

कुठे थांबून गेलंय, हे कधी जाणवलंय का?


🌸 आईपण सुंदर आहे…


पण स्वतःसाठी काही करणं चुकीचं नाही

समाज आपल्याला शिकवतो — “आईने त्याग करायलाच हवा.”

पण कुणीच सांगत नाही — आई खुश असेल तरच घर आनंदी असतं.


तुमचं मन कधी म्हणत नाही का — मलाही काहीतरी करायचं आहे…

माझ्यावरही कुणाला अभिमान वाटावा…

माझ्या नावानेही कुणी मला ओळखावं…

ही भावना स्वार्थ नाही, ही आहे स्वतःला जगण्याची इच्छा.


1. शिक्षण – जिथे आईचा अनुभव सोनं बनतो


आज प्रत्येक पालकाची एकच तक्रार आहे — “मुलं हुशार आहेत, पण अक्षर चांगलं नाही…”


आई म्हणून तुम्हाला माहीत असतं — मुलं मुद्दाम वाईट लिहित नाहीत, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.


👉 इथेच तुमची ताकद आहे.


आई म्हणून — 

✔️ तुम्ही संयमी आहात

✔️ तुम्ही समजून घेता

✔️ तुम्हाला मुलांची मानसिकता कळते


हे गुण कुठल्याही डिग्रीपेक्षा मोठे आहेत.


शिक्षण क्षेत्रात आईचं स्थान वेगळंच असतं. कारण आई शिकवते फक्त अक्षर नाही, ती शिकवते आत्मविश्वास


2. घरातून सुरू होणारा व्यवसाय पण ओळख समाजात



“बाहेर जाऊ शकत नाही…”

“घर-संसार आहे…”

“लहान मुलं आहेत…”


हे सगळं खरं आहे आणि म्हणूनच घरातून सुरू होणारा शिक्षण व्यवसाय महिलांसाठी वरदान ठरतो.


❌ मोठी गुंतवणूक नाही

❌ दुकान नाही

❌ स्टाफ नाही


✔️ घरातून वर्ग

✔️ वेळेची मोकळीक

✔️ स्वतःचा सन्मान


आज तुम्ही घरात बसून फक्त आई नाही राहणार…

तर Teacher, Guide, Mentor व्हाल.


3. “माझ्या मुलाचं अक्षर या मॅडममुळे सुधारलं…”



हा वाक्य ऐकण्याचा क्षण

कधी अनुभवायचा आहे का?


कोणीतरी पालक फोन करून म्हणतो — “मॅडम, माझ्या मुलाचा आत्मविश्वास वाढलाय.”


तो क्षण तुमचं मन भरून आणतो, कारण तुम्ही फक्त शिकवत नाही, तुम्ही बदल घडवता. तोच बदल

हळूहळू तुमच्यातही घडतो.


आज —

✔️ तुम्ही घाबरता

✔️ आत्मविश्वास कमी आहे


उद्या — 

✔️ लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात

✔️ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता



4.तुमचं मूल तुम्हाला पाहून शिकतं



मुलांना आपण सांगतो — “स्वतःच्या पायावर उभं राहा.”पण आई स्वतः उभी नसेल, तर मुलं काय शिकणार?


कल्पना करा — तुमचं मूल शाळेत अभिमानाने सांगतं — “माझी आई Teacher आहे.”


तो अभिमान त्यांच्या डोळ्यांत चमकतो.


आई जेव्हा स्वतःसाठी काही करते, तेव्हा ती मुलांसाठी सगळ्यात मोठा Role Model बनते.


 हा निर्णय पैशाचा नाही…


हा निर्णय आहे —  स्वतःवर विश्वास ठेवण्याचा

स्वतःला ओळखण्याचा

आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा


आज तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात, म्हणजे तुमच्यात कुठेतरी

“मी करू शकते”हा आवाज आहे.


तो आवाज दाबू नका.


आज नाही तर कधी?


स्वप्न पाहायला वय लागत नाही.

नवीन सुरुवात करायला

परिपूर्ण वेळ कधीच नसतो.


फक्त निर्णय हवा असतो.


📞 आजच एक छोटंसं पाऊल घ्या


जर हा ब्लॉग वाचताना

तुमचं मन कुठे थांबलं असेल…

डोळे पाणावले असतील…

किंवा मनात विचार आला असेल — “ही संधी माझ्यासाठीच आहे…”


👉 Inquiry करा.

https://wa.me/message/OGQKSZB2GC7TN1


कधी कधी एक निर्णय आईला स्वतःची ओळख देतो


धन्यवाद.



Comments