नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.
तर या ब्लॉगमध्ये, मुलांनी कोणत्या ब्रेन जिम करायला हव्यात? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
चला तर जाणून घेऊया मुलांसाठी खास निवडलेल्या ५ इंटरॅक्टिव्ह ब्रेन जिम -
१. क्रॉस क्रॉल (Cross Crawl)
ही ब्रेन जिम संपूर्ण शरीराची समन्वय वाढवणारी अतिशय प्रभावी क्रिया आहे.
कशी करायची?
• उजवा हात डाव्या गुडघ्याला आणि डावा हात उजव्या गुडघ्याला स्पर्श करायचा.
• मुलांना हे १ मिनिटासाठी करायला सांगावे.
फायदे:
✔ मेंदूच्या दोन्ही बाजूंमधील समन्वय वाढतो.
✔ लक्ष केंद्रीत होते.
✔ वाचन आणि लेखन अधिक सोपे वाटते.
२. ब्रेन बटन्स (Brain Buttons)
ही ब्रेन जिम मुलांची जागरूकता आणि रक्ताभिसरण सुधारते.
कशी करायची?
• एका हाताने कॉलरबोनखालील दोन्ही बाजू हलके मसाज करायचे.
• दुसऱ्या हाताने पोटावर हात ठेवून खोल श्वास घ्यायचा.
फायदे:
✔ मानसिक थकवा कमी.
✔ अभ्यासाची तयारी वाढते.
✔ स्मरणशक्ती मजबूत होते.
३. हुक-अप्स (Hook-ups)
ही ब्रेन जिम म्हणजे भावनिक संतुलन आणि शांत मनासाठी सर्वोत्तम व्यायाम.
कसे करायचे?
• दोन्ही हात क्रॉस करून बोटे एकमेकांत अडकवायची.
• पायांचीही क्रॉस पोझिशन
• खोल श्वास
फायदे:
✔ Anxiety कमी होते.
✔ मेंदू शांत होतो.
✔ परीक्षेपूर्वी अतिशय उपयोगी
४. डबल डूडल (Double Doodle)
ही ब्रेन जिम म्हणजे दोन्ही हात एकत्र वापरण्याची मजेदार क्रिया.
कसे करायचे?
• मुलाने दोन्ही हातात पेन्सिली घेऊन एकाच वेळी आकृत्या, वर्तुळे किंवा रेघा काढायचा.
फायदे:
✔ क्रिएटिव्हिटी वाढते
✔ लेखन कौशल्य सुधारते
✔ हात-डोळा समन्वय मजबूत
५. लेझी एट्स (Lazy 8s)
अक्षर ओळख, वाचन आणि एकाग्रता सुधारण्यासाठी क्लासिक ब्रेन जिम.
कसे करायचे?
• कागदावर बाजूला पडलेल्या ८ चा आकार सतत काढायचा.
• हात मोकळा ठेवून हलके हालचाल
फायदे:
✔ डोळ्यांची हालचाल सुधारते.
✔ वाचन गती वाढते.
✔ मेंदू रिलॅक्स होतो.
मुलांसाठी ब्रेन जिम का महत्त्वाची आहे?
• मुलांची एकाग्रता वाढते
• स्मरणशक्ती आणि समज वाढते
• अभ्यासातील ताण कमी होतो
• आत्मविश्वास वाढतो
• सतत शिकण्याची ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो
दररोज फक्त ५–७ मिनिटे ब्रेन जिम केल्या तर परिणाम अतिशय उत्तम दिसतात. कारण जेव्हा आपण मुलांना खेळांसारखा मजेदार अनुभव देऊ तेव्हा मुले सर्वात छान शिकतील.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ.
(VES Abacus Program Director)
%20(1).png)


_2K.png)

खूपच छान activity 👏
ReplyDeleteVery Useful blog
ReplyDeleteKadak Blog
ReplyDeleteKhuppp sundar
ReplyDelete👌👌
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDelete