अक्षरात लपलाय तुमच्या मुलाचा स्वभाव

 अक्षरात लपलाय तुमच्या मुलाचा स्वभाव





आज सकाळी तुमच्या मुलाची वही उघडताना

तुमचं मन एका क्षणासाठी थांबलं का…?


१.अक्षर विस्कटलेलं होतं…

२.ओळी तुटक होत्या…

३.काही शब्द खोडलेले होते…

आणि नकळत तोंडातून निघालं असेल  “अजूनही अक्षर सुधारलं नाही…”


पण पालकांनो,

आज जर आम्ही तुम्हाला सांगितलं की

ही वही अक्षरांची नाही

तर तुमच्या मुलाच्या मनाची कथा सांगते आहे…?



थांबा.

हा ब्लॉग वाचण्याआधी

एकदा मन शांत करा.

कारण पुढचे शब्द

कदाचित तुमच्या मुलाकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलून टाकेल…


पण थांबा पालकांनो…

एक क्षण थांबून विचार करा 

जर ही वही बोलू शकली असती, तर ती वही काय बोलू लागली असती ?


अक्षर म्हणजे मुलाची न बोललेली भाषा



मुलं खूप वेळा बोलत नाहीत…कारण त्यांना शब्द सापडत नाहीत. पण त्यांचं मन अक्षरातून सतत बोलत  असतं. या तुम्हा मुलाच्या अक्षरावरून थोड त्यांना जाणून घेऊयात.


ओळी सोडून लिहिलेलं अक्षर

➝ “माझं मन सैरभैर आहे…”


वारंवार खोडलेले शब्द

➝ “मी स्वतःवर समाधानी नाही…”


खूपच छोटं अक्षर

➝ मला दडायचं आहे…”


अक्षरात जास्त दाब

➝ “माझ्यावर खूप अपेक्षा आहेत…”


ही चूक नाही…हे अक्षर किंवा अस लिहा म्हणजे चूक नाही,

ही तुमच्या मुलाची आतून मदतीची हाक आहे.


😢 ओरडलेली अक्षरं, पण न ऐकलेलं मन



पालक म्हणून तुम्ही काळजीने नेहमी हे बोलता

“नीट बसून लिही!”

“किती वेळ सांगितलं आहे!”

“इतर मुलांसारखं का नाही जमत तुला?”


अशी बरीच उदाहरण आपण देतो ,पण ह्याच वेळेस मुलाच्या मनात आवाज उठतो 

“मी प्रयत्न करतोय, पण मला कोणी समजून घेत नाही…”


आणि मग मुलांचे त्या दिवशी अक्षर अजून बिघडतं. त्या दिवशी मूल अजून विचारात जातं.


खरं सांगायचं तर,

अक्षर बिघडणं हे अपयश नसतं…

ते असतं मनात साठलेलं विचारांच ओझ.


जेव्हा मूल:


#सतत तुलना ऐकतं


#कौतुकाऐवजी टीका मिळते


#अपेक्षांचं ओझं वाढतं


तेव्हा त्याचे हात थरथरतो…

आणि अक्षर त्याची साक्ष देतं


ह्या वर उपाय काय ?


योग्य मार्गदर्शन = भावनिक उपचार


अक्षर सुधारणा म्हणजे फक्त

रेषा, वळणं, गती शिकवणं नाही…



ती एक हीलिंग प्रक्रिया आहे.


✔️ शांत बसायला शिकणं

✔️ श्वासावर नियंत्रण

✔️ हात–मेंदू समन्वय

✔️ स्वतःवर विश्वास


म्हणूनच वर्सटाईल नेहमी म्हणत Handwriting is Brainwriting


❤️ पालकांनो, आधी मन वाचा, मग अक्षर..


तुमचं मूल मुद्दाम हट्टी नाही.

ते कमकुवतही नाही.

ते फक्त समजून घेण्याची वाट पाहत आहे.


आज जर तुम्ही त्याच्या अक्षराकडे तक्रारीने नाही, तर करुणेने पाहिलंत, तर उद्या ते मूल स्वतःवर प्रेम करायला शिकेल.


 शेवटचं एक मनापासून


कदाचित तुमचं मूल मोठं होऊन

डॉक्टर, इंजिनियर, कलाकार किंवा शिक्षक बनेल…


पण सर्वात आधी

ते आतून मजबूत माणूस बनणं महत्त्वाचं आहे.



आणि हो…

अक्षर हे वहीत लिहिलेलं नसतं,

ते मुलाच्या मनावर उमटलेलं असतं. 

👉 आजपासून अक्षर पाहताना फक्त “कसं लिहिलंय?” असं न विचारता

एकदा विचार करा 

“तो/ती आता कसा आहेस ?”


आज एक प्रश्न स्वतःला विचारा पालकांनो 👇

 माझं मूल अक्षराने कमजोर आहे, की आत्मविश्वासाने?


👉 उत्तर शोधायचं असेल

तर आजच मला Message करा.

https://wa.me/message/OGQKSZB2GC7TN1

आम्ही तुमच्या मुलाच्या अक्षराआड दडलेलं मन

तुमच्यापर्यंत पोहचवू. 


धन्यवाद.

Comments