शिक्षण क्षेत्रात एका गृहिणीला घरबसल्या काम करायचं असेल तर ती काय करू शकते?

        


आजच्या डिजिटल युगात घरबसल्या शिक्षण क्षेत्रात करिअर करणे हे केवळ शक्यच नाही, तर अत्यंत यशस्वी आणि स्थिर उत्पन्न देणारे क्षेत्र बनले आहे. विशेषतः गृहिणींसाठी - ज्या घराची जबाबदारी सांभाळत असतात. या क्षेत्रात अनेक संधी आहेत. वेळेचे बंधन नाही, गुंतवणूक कमी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शिक्षण-कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर बनण्याची संधी!


मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.


तर या ब्लॉगमध्ये, शिक्षण क्षेत्रात एका गृहिणीला घरबसल्या काम करायचं असेल तर ती काय करू शकते? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.


चला तर पाहूया, गृहिणी घरबसल्या शिक्षण क्षेत्रात कोणकोणते काम करू शकतात?


१) घरबसल्या अबॅकस क्लास सुरू करणे ( सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर )


आजकाल अबॅकसची मागणी प्रचंड वाढली आहे. पालक मुलांच्या गणिती क्षमता, Concentration, Brain Development आणि Speed वाढवण्यासाठी अबॅकस क्लास शोधत असतात.


का फायदेशीर?


  • कमी गुंतवणुकीत क्लास सुरू करता येतो
  • १–२ तासाचे बॅचेस
  • मुलांची व घराची जबाबदारी सांभाळूनही काम शक्य
  • महिन्याला चांगले उत्पन्न
  • घरातूनच मुलांची बॅच सहज तयार होते 
  • स्वतःचा ब्रँड तयार करता येतो


अनेक गृहिणी आज प्रोफेशनल अबॅकस टीचर म्हणून उत्तम कमाई करत आहेत.


२) ऑनलाइन ट्यूशन (Online Tutoring)


आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही १ली ते ८वी किंवा १०वीपर्यंतचे विषय ऑफलाइन किंवा ऑनलाइन शिकवू शकता.


फायदे:


  • Zoom / Google Meet वरून क्लास
  • स्वतःचे वेळापत्रक
  • देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी
  • कमी खर्चात सुरुवात


विशेष मागणी असलेले विषय:

  • गणित
  • इंग्रजी
  • विज्ञान
  • हिंदी/मराठी Grammar
  • फोनीक्स


३) फोनीक्स किंवा रीडिंग स्किल्स क्लास


लहान मुलांना इंग्रजी वाचनात अडचणी येणं अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे Phonics Teacher ची मागणी कायम असते.


फोनीक्स क्लास का लोकप्रिय?


  •  ३–७ वर्षांच्या मुलांचे पालक नेहमी शोधत असतात
  • कोर्स कालावधी कमी
  • फी चांगली
  • घरातून शिकवणे अतिशय सोपे


४) हस्तकला, आर्ट & क्राफ्ट किंवा कलात्मक कौशल्यांचे क्लासेस


जर तुम्हाला Art & Craft, Drawing, Mandala, Calligraphy, मेहेंदी, DIY क्राफ्ट येत असेल तर तुम्ही घरातूनच मुलांना शिकवू शकता.


ऑनलाइन + ऑफलाइन दोन्ही पर्याय!



५) होमस्कुलिंग सपोर्ट किंवा प्ले-आधारित लर्निंग क्लास


आज बरेच पालक लहान मुलांना घरबसल्या शिकवतात.

अशा पालकांना होमस्कुलिंग सपोर्ट टीचर लागते. 


तुम्ही ३–६ वयोगटातील मुलांसाठी —


  • प्री-स्कूल अ‍ॅक्टिव्हिटीज 
  • लिटरेसी (Reading-Writing)
  • न्यूमेरसी (Numbers)
  • Brain Development Programs

  असे क्लासेस सुरू करू शकता.


गृहिणींसाठी हा क्षेत्र सर्वोत्तम का?


  • मुलांची व घराची जबाबदारी सांभाळूनही काम शक्य
  • स्वतःचे वेळापत्रक
  • ताण कमी
  • गुंतवणूक जवळजवळ नाही
  • समाजात मान-सन्मान
  • दीर्घकाळ टिकणारे करिअर
  • स्वतःची ओळख निर्माण


शेवटी एकच गोष्ट सांगेन कि, गृहिणी म्हणून तुम्ही खूप जबाबदाऱ्या सांभाळता… पण आता स्वतःसाठीही एक पाऊल उचला. शिक्षण क्षेत्र तुम्हाला उत्पन्न + समाधान + ओळख तिन्ही देऊ शकतं.


तर घरबसल्या काम सुरू करण्यासाठी आजच एक निर्णय घ्या आणि आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल टाका!


जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा घरबसल्या काय काम करू शकता? याच मार्गदर्शन हवे असल्यास लगेचच आम्हाला संपर्क साधा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि अबॅकस टीचर ट्रेनिंगच्या अधिक माहितीसाठी Abacus Teacher Training या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.





धन्यवाद!!


जया सकपाळ.

(VES Abacus Program Director)

Contact:- 8652381880

Comments

Post a Comment