“मार्क्स महत्त्वाचे की मेंदूचा विकास?” परीक्षेतील गुण हे यशाचं एक मोजमाप असू शकतात, पण यशाची खरी शिदोरी मेंदूच्या विकासात दडलेली आहे. मग नेमकं काय करावं? दोघांमध्ये संतुलन कसं साधावं? चला, सविस्तर पाहूया.
नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.
तर या ब्लॉगमध्ये, मार्क्स’ की ‘मेंदू विकास’? यांचे योग्य संतुलन कसे साधावे? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
मार्क्स विद्यार्थ्याला नक्की काय देतात?
तर मार्क्स विद्यार्थ्याला –
• अभ्यासाची शिस्त लावतात
• स्मरणशक्ती (Memory) वाढवतात
• स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करतात
• शैक्षणिक प्रवासात संधींचे दरवाजे उघडतात
पण एक प्रश्न राहतोच –
👉 फक्त मार्क्स म्हणजे हुशारी आहे का?
मेंदू विकास म्हणजे काय?
मेंदू विकास म्हणजे केवळ अभ्यास नाही, तर –
• विचारशक्ती (Thinking Ability)
• एकाग्रता (Concentration)
• निर्णयक्षमता (Decision Making)
• आत्मविश्वास (Confidence)
• समस्या सोडवण्याची कला (Problem Solving Skills)
हे गुण आयुष्यभर उपयोगी पडतात – परीक्षेतच नाही, तर जीवनात!
फक्त मार्क्सवर भर दिल्यास काय होतं?
• मुलं पाठांतरावर अवलंबून राहतात
• चुकण्याची भीती निर्माण होते
• आत्मविश्वास कमी होतो
• “मी करू शकत नाही” अशी मानसिकता तयार होते
परंतु यामुळे मुलांचा नैसर्गिक विकास खुंटतो.
फक्त मेंदू विकास पुरेसा आहे का?
नाही.
मार्क्सही महत्त्वाचे आहेतच. कारण –
• शैक्षणिक प्रगतीसाठी ते आवश्यक आहेत
• पुढील शिक्षणाचे मार्ग ठरतात
म्हणूनच फक्त एक बाजू धरून चालणार नाही.
म्हणून मार्क्स आणि मेंदू विकास यांचे योग्य संतुलन कसे साधावे?
१. शिकण्याची पद्धत बदला
पाठांतराऐवजी समजून शिकवणे, कृतीतून शिकणे (Activity Based Learning) अत्यावश्यक आहे.
२. स्किल-बेस्ड शिक्षणावर भर द्या
अबॅकस, मेंटल मॅथ्स, लॉजिकल गेम्स, पझल्स, क्युब –
हे मेंदूला व्यायाम देतात आणि मार्क्सही सुधारतात. म्हणून या स्किल बेस्ड गोष्टी शिकवणे आवश्यक आहे.
३. चुका करण्याची मुभा द्या
चूक म्हणजे अपयश नाही, चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे. हे मुलांना कळू द्यात त्यासाठी त्यांना चुका करण्याची मुभा देणे गरजेचे आहे.
४. पालकांची भूमिका बदला
एक पालक म्हणून आपली भूमिका ही खूप महत्त्वाची आहे म्हणून मुलानं “किती मार्क्स मिळाले?” या ऐवजी “आज काय नवीन शिकलास?” असा प्रश्न विचारणे योग्य ठरेल.
५. आत्मविश्वास वाढवणारे वातावरण तयार करा
प्रत्येक मूल वेगळं आहे – म्हणून कोणाचीच कोणासोबत तुलना न करता प्रोत्साहन द्या.
कारण मार्क्स हे गंतव्य नाही आणि मेंदू विकास हा प्रवास आहे. जेव्हा मेंदू विकसित होतो, तेव्हा मार्क्स आपोआप येतात. पण फक्त मार्क्स आल्याने मेंदू विकसित होतोच असं नाही. म्हणूनच आज गरज आहे – मार्क्स + मेंदू विकास यांचा योग्य समतोल साधण्याची. कारण आजचा विद्यार्थीच उद्याचा विचारवंत, नेता आणि यशस्वी नागरिक बनणार आहे.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ.
(VES Abacus Program Director)
%20(2).png)
खूप महत्वाचे आहे हे धन्यवाद
ReplyDelete🙌👌🙌
ReplyDelete