अश्या ५ गोष्टी ज्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासाठी नवीन वर्षाआधी केल्याचं पाहिजेत

 


              प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जाते. २०२५ हे वर्षही तसेच होते - कधी समाधान देणारे, कधी आव्हान देणारे, तर प्रत्येक क्षणात काहीतरी शिकवण देणारे. आज या वर्षाच्या शेवटी थांबून मागे वळून पाहताना, पालक म्हणून आपण जे अनुभवलं, आपल्या मुलांनी जे पार केलं,

आणि आपण एक कुटुंब म्हणून जे शिकलो - त्यासाठी मनापासून कृतज्ञ असणं हीच या वर्षाची खरी सांगता आहे.


नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.


तर या ब्लॉगमध्ये, २०२५ यावर्षाचे आभार मानून २०२६ चे नियोजन कसे करावे? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.


२०२५ यावर्षाबद्दल कृतज्ञता – पालक म्हणून आपण काय शिकलो?

पालकत्व म्हणजे केवळ जबाबदारी नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.


२०२५ मध्ये—

•⁠  ⁠आपल्या मुलांनी नवीन गोष्टी शिकल्या

•⁠  ⁠काही ठिकाणी अडखळले

•⁠  ⁠कधी आत्मविश्वास वाढला

•⁠  ⁠कधी भीती वाटली

पण प्रत्येक टप्प्यावर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो— हेच आपलं मोठं यश आहे. आपल्या मुलांनी केलेल्या

लहानशा प्रगतीसाठी, त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि आपण त्यांना दिलेल्या वेळेसाठी आपण स्वतःचेही कौतुक करायला हवे.


कृतज्ञ पालक = सकारात्मक पालकत्व

करूया स्वागत २०२६ चे – नवीन वर्ष, नवीन जबाबदाऱ्या


२०२६ हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्याचं नाही, तर आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची संधी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना फक्त अभ्यासात यशस्वी करून चालणार नाही, तर त्यांना

•⁠  ⁠विचार करायला

•⁠  ⁠निर्णय घ्यायला

•⁠  ⁠स्वतःवर विश्वास ठेवायला

•⁠  ⁠अपयश स्विकारायला शिकवणं गरजेचं आहे.


२०२६ हे वर्ष

मुलांच्या सर्वांगीण विकासाचं वर्ष ठरवूया.


पालकांनी २०२६ मध्ये कसे नियोजिन व व्यवस्थापन करावे?


१.अभ्यास + मेंदू विकास यांचा समतोल :-


फक्त अभ्यासावर भर देण्याऐवजी

•⁠  ⁠एकाग्रता

•⁠  ⁠स्मरणशक्ती

•⁠  ⁠लॉजिक

•⁠  ⁠कल्पनाशक्ती

यांचाही विकास होईल याकडे लक्ष द्या.


२.वेळेचं योग्य नियोजन – मुलांसाठीही, पालकांसाठीही:- 


२०२६ मध्ये -

•⁠  ⁠स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा

•⁠  ⁠अभ्यासाची ठराविक वेळ ठरवा

•⁠  ⁠खेळ व कौशल्य विकासाला प्राधान्य द्या

•⁠  ⁠पुरेशी विश्रांती द्या

कारण शिस्त ही दबावाने नव्हे, तर सवयीने निर्माण होते.


३.तुलना नव्हे, तर प्रगती मोजा:-


“तो मुलगा किती हुशार आहे” यापेक्षा “माझ्या मुलाने कालपेक्षा आज काय चांगलं केलं?” हा विचार ठेवा. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची गती वेगळी असते आणि त्याची क्षमता सुद्धा वेगळी असते.


४.संवाद – पालकत्वाचा मजबूत पाया:- 


दररोज काही मिनिटे मुलांशी मनमोकळा संवाद ठेवा.

त्यांचे—

•⁠  ⁠विचार

•⁠  ⁠भीती

•⁠  ⁠प्रश्न

•⁠  ⁠स्वप्नं

ऐकून घ्या.

जे मूल बोलू शकतं, ते तणावात तुटत नाही.


५.चुका स्विकारायला शिकवा:- 


२०२६ मध्ये मुलांना चुका करण्याची भीती वाटू देऊ नका.

चूक ही अपयश नसून ती शिकण्याची संधी आहे हे त्यांना समजावून सांगा.


पालकांसाठी २०२६ चे छोटे संकल्प

•⁠  ⁠रोज मुलांसोबत किमान १५ मिनिटे गुणवत्तेचा वेळ

•⁠  ⁠रागापेक्षा संवाद

•⁠  ⁠तुलना नाही, प्रोत्साहन

•⁠  ⁠मार्क्सपेक्षा कौशल्य

•⁠  ⁠दबाव नाही, विश्वास


२०२५ ला आपण कृतज्ञतेने निरोप देऊया,

आणि २०२६ चे स्वागत समजूतदार, सजग आणि सकारात्मक पालकत्वाने करूया.

कारण, आजचे पालकत्वच उद्याचे भविष्य घडवते.


तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा. 






धन्यवाद!!


जया सकपाळ.

(VES Abacus Program Director)

Contact:- 8652381880



Comments

Post a Comment