मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे ५ जबरदस्त मुद्दे

 मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे ५ जबरदस्त मुद्दे



आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा आत्मविश्वास मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास असलेली मुले नव्या गोष्टी सहज स्विकारतात, आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवतात आणि स्वतःवर विश्वास ठेवतात. पालकांनी काही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो.


नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System  ची Abacus Program Director, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.


तर या ब्लॉगमध्ये, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे ५ जबरदस्त मुद्दे जाणून घेणार आहोत - जे प्रत्येक पालक आणि शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवेत त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.


१. मुलांच्या प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक करा



कौतुक ही मुलांसाठी जादूची किल्ली आहे.

मुलाने एखादी छोटी गोष्टही चांगली केली - जसे की गृहपाठ वेळेत पूर्ण केला, नीटपणे लिहिले किंवा नवीन शब्द शिकले तरी त्यांचे कौतुक करा. कौतुकामुळे मुलांना आपल्यात क्षमता आहे याची जाणीव होते आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो.


२. मुलांना स्वतः निर्णय घेऊ द्या



सतत "हे करू नको" किंवा "हे असंच कर" म्हणण्यापेक्षा मुलाला लहान लहान निर्णय घेऊ द्या.

उदा. त्याला कोणता ड्रेस घालायचा, कोणते पुस्तक वाचायचे, कधी खेळायचे याचा निर्णय स्वतः घेऊ द्या. यामुळे मुलांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची शक्ती निर्माण होते.


३. चुका करण्याची मोकळीक द्या



मुलं चुकीतूनच खूप काही शिकतात.

म्हणून त्यांना “चूक झाली तर काय?” असा विचार करू देऊ नका. चूक झाली तरी त्यांना समजावून सांगा की चुकांमधून शिकणे हीच खरी प्रगती आहे. यामुळे ते नवीन गोष्टी करण्यास घाबरत नाहीत.


४. सकारात्मक वातावरण तयार करा



घरात किंवा वर्गात सकारात्मक, शांत आणि प्रोत्साहन देणारे वातावरण असणे खूप गरजेचे आहे. नकारात्मक टिका, ओरडा किंवा इतर मुलांशी तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करते. त्याऐवजी प्रोत्साहन, प्रेम आणि समजून घेणे हे मुलांसाठी महत्त्वाचे ठरते.


५. मुलांच्या मेहनतीची दखल घ्या, फक्त निकालाची नाही



मुलांनी किती प्रयत्न केले, अभ्यासासाठी किती वेळ दिला, कोणती नवी कौशल्ये शिकली याची दखल घ्या. फक्त निकालावर लक्ष केंद्रित केल्यास ते दडपणाखाली येतात. मेहनतीचे कौतुक केल्याने मुलं प्रयत्न करत राहतात आणि आत्मविश्वास वाढतो.


मुलांचा आत्मविश्वास वाढवणे ही सततची प्रक्रिया आहे. कौतुक, सकारात्मकता, स्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या साहाय्याने प्रत्येक मूल आत्मविश्वासू, धाडसी आणि यशस्वी होऊ शकते.


पालक आणि शिक्षक म्हणून आपण या प्रवासात त्यांचे सर्वात मोठे साथीदार आहोत! आणि तुम्ही त्यांना साथ द्याल याची मला खात्री आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!


तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.





धन्यवाद!!


जया सकपाळ.

(VES Abacus Program Director)

Contact:- 8652381880

Comments

Post a Comment