"अबॅकस – महिलांच्या उद्योजकतेचा नवा अध्याय"
आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रत्येक महिलेला स्वतःचं करिअर घडवायचं आहे, स्वतःच्या क्षमतेवर उभं राहायचं आहे आणि समाजात एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. शिक्षण, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांच्या दरम्यान अनेकदा महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. पण आज महिलांना घरी बसूनही करिअर घडवता येतं, आत्मनिर्भर होता येतं — आणि या प्रवासात अबॅकस टिचर ट्रेनिंग एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.
तर या ब्लॉगमध्ये, अबॅकस टिचर ट्रेनिंगद्वारे महिलांचे सशक्तीकरण म्हणजेच महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आणि उद्योजकतेचा नवा प्रवास कसा सुरू होऊ शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात आधी जाणून घेऊयात की,
१. अबॅकस प्रोग्राम म्हणजे काय?
अबॅकस ही गणित शिकवण्याची एक प्राचीन पण अत्यंत परिणामकारक पद्धत आहे. हे एक मोजणी साधन असून, त्याच्या साहाय्याने मुलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अतिशय वेगाने आणि अचूकपणे शिकतात.
परंतु अबॅकस फक्त गणितापुरतं मर्यादित नाही — ते मुलांच्या मेंदूचा विकास, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि वेगवान विचारक्षमता वाढवण्याचं उत्तम साधन आहे.
२. महिलांसाठी अबॅकस टिचर ट्रेनिंग का विशेष आहे?
.png)
अनेक महिलांकडे उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असते, पण लग्न, मुलं, घर आणि जबाबदाऱ्यांमुळे त्या कामाच्या जगापासून दूर राहतात. अशा महिलांसाठी अबॅकस टिचर ट्रेनिंग ही एक सुवर्णसंधी आहे.
या प्रशिक्षणामुळे महिलांना –
* घरबसल्या काम करण्याची संधी मिळते
* स्वतःचा अबॅकस क्लास सुरू करता येतो
* विद्यार्थ्यांसोबत शिकवताना आनंद आणि समाधान मिळतं
* आर्थिक स्वावलंबन मिळतं
* आत्मविश्वास आणि सामाजिक ओळख वाढते
* हे प्रशिक्षण महिलांना शिक्षिका पासून उद्योजिका बनवतं.
* त्या स्वतःचा शिक्षण क्षेत्रात व्यवसाय उभारतात आणि त्याद्वारे इतर महिलांनाही रोजगार देतात.
३. उद्योजकतेचा नवा प्रवास
अबॅकस टिचर ट्रेनिंग म्हणजे केवळ एक कोर्स नाही — ती एक उद्योजकतेची संधी आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर महिला स्वतःचा ब्रँड तयार करू शकतात, आपल्या परिसरात क्लासेस सुरू करू शकतात, शाळांमध्ये अबॅकस शिकवू शकतात आणि इतर शिक्षकांनाही प्रशिक्षण देऊ शकतात.
काही महिला आज अबॅकस फ्रँचायझी ओनर, ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर आणि महिला उद्योजिका म्हणून झळकत आहेत. त्यांनी केवळ स्वतःचं जीवन बदललं नाही, तर अनेक इतर महिलांना सशक्त बनवलं आहे.
४. सशक्त महिला, सशक्त समाज
महिला शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून जेव्हा समाजात आपलं स्थान निर्माण करतात, तेव्हा तो संपूर्ण समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. अबॅकस टिचर ट्रेनिंग हे केवळ आर्थिक प्रगतीचं नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक प्रगतीचंही साधन आहे.
५. ही संधी महिलांना देते
* आर्थिक स्थैर्य
* स्वतंत्र ओळख
* सकारात्मक दृष्टीकोन
* स्वतःवरचा विश्वास आणि समाधान
महिला म्हणजे शक्ती, पण त्या शक्तीला योग्य दिशा दिली तर ती समाज परिवर्तनाचं कारण बनते.
अबॅकस टिचर ट्रेनिंग ही अशीच एक दिशा आहे — जी महिलांना ज्ञान, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचं बळ देते.
आज हजारो महिला या प्रशिक्षणाद्वारे आपली ओळख निर्माण करत आहेत.
तुम्हीही त्यापैकी एक होऊ शकता!
अबॅकस शिकवा — मुलांचं भविष्य घडवा आणि स्वतःचंही उज्वल भविष्य तयार करा!
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ.
(VES Abacus Program Director)





Waah Waah ......
ReplyDeleteKhup chan ❤️🙏
ReplyDelete