बऱ्याचदा वाचन म्हंटले की लोकांना मोठं मोठी पुस्तकं डोळ्यासमोर येतात... आणि वाचन सुरू करण्याआधीच त्यातला रस निघून जातो. परंतु शोधातून असे लक्षात आले आहे की माणसाने त्याच्या दैनंदिन आयुष्यात वाचणे हे तितकेच आवश्यक आहे तितके जेवण. चांगल्या विचारांसाठी.. आचरणासाठी... आणि आयुष्यात हवे ते मिळवण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्याल.. समजून घ्याल आणि त्यावर कृती कराल.
वाचाल तर वाचाल असे तुम्ही ऐकले वा वाचले असेलच.. त्यामुळे वाचनाला आयुष्यात किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच... मानसशास्त्राच्या निकषानुसार असे लक्षात आले आहे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी ६६ दिवस लागतात. जर तुम्हाला वाचनाची सवय लावयची असेल तर कमीत कमी ६६ दिवस तुम्हाला सलग काही ना काही वाचावे लागेल.. तर पाहूया वाचनाची सवय लावण्यासाठी चे तीन उपाय.. जेणेकरून तुम्हीसुद्धा न कंटाळता अवांतर वाचन करू शकाल..
१. आवड :
वाचनाची सवय लागण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. त्यासाठी तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत !!
१. तुम्हाला वाचनाचा कंटाळा येतो का ?
२. जर वाचायचे झालेच तर कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अधिक आवडतात ?
३. जर तुमच्याकडून तुमचा मोबाईल फोन, किंवा सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे लॅपटॉप, टीव्ही किंवा कॉम्पुटर काढून घेतले.. तर अशा रिकाम्या वेळेत तुम्ही काय कराल ?
वरील तीन प्रश्नांच्या उत्तरांतून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला वाचायला नेमके का आवडत नाही ? मग हळू हळू आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्रापासून सुरुवात करा.. दिवसाला एक तरी वर्तमानपत्र वाचा. हळू हळू कविता किंवा गोष्टींपासून सुरुवात करा.
२. लिहून ठेवा :
वाचलेली प्रत्येक गोष्ट लक्षात राहीलच असे बऱ्याचदा होत नाही. मग अशावेळेस वाचलेल्या किंवा वाचनातून आवडलेल्या गोष्टी लिहून ठेवा. जेणेकरून तुमच्याकडे नकळतच नोट्स तयार होतील. सोबतच रिविजन करताना तुम्हाला त्या छोट्या छोट्या नोट्स उपयोगी पडतील.
३. संवाद साधा :
जेव्हा आपल्या बोलण्यात कोणीतरी रस घेतो.. किंवा आवडीने आपलं बोलणं ऐकू लागतो त्यावेळेस आपल्यात काही सकारात्मक बदल घडू लागतात.. आपण आणखी उत्तमरीत्या बोलण्यासाठी, आणखी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतो, म्हणूनच वाचलेल्या पुस्तकांवर, गोष्टींवर, कवितांवर, बातम्यांवर सतत चर्चा करत रहा. जेणेकरून तुमचा त्यातला रस वाढत जाईल आणि
आणखी काहीतरी नवीन वाचण्याची उर्मी वाढावी म्हणून तुम्ही प्रयत्न करू लागाल.
वाचनाने अभ्यास वाढतो. त्यामुळे सखोल विचार करायला मदत होते. वाचनाच्या सवयीमुळे ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सोप्पे होते. पण बऱ्याचदा वाचन करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.. तुम्ही किंवा तुमच्या पाल्याला जर अशाच काही अडचणींना सोमारे जावं लागत असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता.. आणि तुमच्या समस्यांच निराकरण करू शकता.
तुम्हाला वाचनाबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल..किंवा त्यासंदर्भात कोणतेही समस्या येत असेल तर लगेच जॉईन व्हा !!
Ankuram : Ankuram
Facebook Page : Versatile Educaare System
Facebook Group : PRAGYAKULAM
याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.
Comments
Post a Comment