लॉजिकल ब्रेन म्हणजे नक्की काय? त्याला डेव्हलप करण्याचे ५ प्रभावी मुद्दे

 लॉजिकल ब्रेन म्हणजे नक्की काय? त्याला डेव्हलप करण्याचे ५ प्रभावी मुद्दे

लॉजिकल ब्रेन म्हणजे काय?


मुलांच्या मेंदूमध्ये दोन प्रकारची विचारशक्ती काम करत असते क्रिएटिव्ह (उजवा मेंदू) आणि लॉजिकल (डावा मेंदू). Logical Brain म्हणजे विचार करण्याची, तर्क लावण्याची, समस्या सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता.


यामुळे मुलं:

✔ व्यवस्थित विचार करतात

✔ कारण-परिणाम समजतात

✔ गणित, पझल्स, पॅटर्न यामध्ये मजबूत होतात

✔ दैनंदिन गोष्टींमधील लॉजिक पटकन पकडतात


म्हणून लॉजिकल ब्रेन डेव्हलपमेंट हे मुलांच्या शैक्षणिक आणि जीवनातील प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.


नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System  ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.


तर या ब्लॉगमध्ये, लॉजिकल ब्रेन डेव्हलप करण्याचे ५ प्रभावी मुद्दे याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.


१. समस्या सोडवण्याची क्षमता (Problem Solving Skills)


जेव्हा मुलाला एखादी समस्या दिली जाते जस कि पझल, पॅटर्न, किंवा साधा क्यूब तेव्हा ते स्वतःच मार्ग शोधायला शिकतात. यामुळे त्यांचा विचार क्रमबद्ध व तार्किक होतो. त्यामुळे मुलांना अशाप्रकारचे वेगवेगळे खेळ खेळायला द्या.


२. निरीक्षणशक्ती वाढते (Sharp Observation Skills)



लॉजिकल ब्रेन मजबूत असला की मुलं लहानातल्या लहान गोष्टीतला बदल ओळखतात. चित्रातील फरक शोधणे, पॅटर्न समजणे, सीक्वेन्स लक्षात ठेवणे ही कौशल्ये रोजच्या आयुष्यात खूप मदत करतात.


३. निर्णयक्षमता सुधारते (Better Decision-Making)



तर्कशुद्ध विचारामुळे मुलं निर्णय घेण्यापूर्वी 'का' आणि 'कसे' याचा विचार करतात. त्यामुळे घाईघाईत निर्णय न घेता योग्य पर्याय निवडण्याची सवय तयार होते.


४. गणितामध्ये आत्मविश्वास वाढतो (Boosts Maths Confidence)



लॉजिकल ब्रेन हे गणिताचे मुख्य आधार. नंबर सेन्स, गणितीय पॅटर्न्स, वेग–अचूकता सगळं सहज समजायला लागतं. यामुळे मुलांचा Maths मध्ये confidence झपाट्याने वाढतो.


५. क्रिएटिव्ह आणि लॉजिक यांचा सुंदर समतोल (Balanced Creative & Logical Thinking)



तार्किक विचार वाढल्यावर मुलांची सर्जनशीलता अजून चमकते. ते नवे आयडिया मांडतात, वेगळे उपाय शोधतात आणि अनेक दिशांनी विचार करायला शिकतात.


लॉजिकल ब्रेन डेव्हलपमेंट ही आजची गरज आहे. हे केवळ अभ्यासापुरतं सीमित नसून मुलांच्या जीवनातील बुद्धिमत्ता, निर्णयशक्ती, एकाग्रता आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांच्यावर थेट परिणाम करते. योग्य मार्गदर्शन आणि मेंदूविकास उपक्रमांमुळे मुलं बुद्धिमान, आत्मविश्वासी आणि भविष्यासाठी तयार होतात.


तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.





धन्यवाद!!


जया सकपाळ.

(VES Abacus Program Director)

Contact:- 8652381880


Comments

Post a Comment