पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधण्याचे ७ उत्तम पर्याय

पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधण्याचे ७ उत्तम पर्याय

नमस्कार पालक मित्रांनो,

पालक म्हणून मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी प्रभावी संवाद आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवणे आवश्यक आहे. मुलांशी दररोज सुसंवाद कसा साधू शकतो आणि अर्थपूर्ण वेळ कसा घालवू शकतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मी जया सकपाळ Versatile Educaare System  ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.

तर या ब्लॉगमध्ये, आपण पालकांनी मुलांसोबत सुसंवाद कसा साधू शकतो याचे ७ उत्तम पर्यायची माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.

१) सक्रिय ऐकणे:-

तुमची मुलं जेव्हा तुमच्यासोबत बोलतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्या. डोळ्यांच्या संपर्कात राहून, होकार देऊन आणि योग्य प्रतिसाद देऊन तुम्ही त्यांच्या विचारांना आणि भावनांना महत्त्व देता हे त्यांना कळू द्यात. तुम्ही त्यांना निर्णयाची भीती न बाळगता व्यक्त होण्यास प्रोत्साहित करा.

२) ओपन-एंडेड प्रश्न:-


उत्तम संभाषणाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही मुलांना खुले प्रश्न विचारा. उदा. "शाळेत तुमचा दिवस चांगला गेला का?" असे विचारण्याऐवजी तुम्ही विचारू शकता कि, *"तुमचा आजच्या दिवसातला सर्वोत्तम भाग कोणता होता?"* याप्रकारे तुम्ही मुलांना अधिक बोलत करण्यासाठी आणि स्वतः चं मत मांडण्यासाठी प्रोत्साहित करता.

३) दैनंदिन दिनचर्या:-

तुम्ही दैनंदिन दिनचर्यामध्ये संभाषण समाविष्ट करू शकता. जसे की जेवणाच्या वेळा किंवा झोपण्याची वेळ सर्वांसाठी एकच ठेवू शकता. त्यांच्या दिवसाबद्दल विचारण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांचे विचार आणि चिंता यावर चर्चा करण्यासाठी या वेळेचा तुम्ही योग्य वापर करू शकता.

४) गुणवत्तेचा वेळ:-

तुमच्या मुलांसोबत तुम्ही पूर्णपणे कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही त्यांना तुमचा दररोज गुणवत्तापूर्ण वेळ द्या. तुम्हाला फोन, इतर काम किंवा टीव्ही यासारखे विचलित करणाऱ्या कामांसाठी तुम्ही तुमचा ठराविक वेळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांना योग्य वेळ देता येईल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत पुस्तक वाचणे, गेम खेळणे किंवा एकत्र फिरायला जाणे अशा गोष्टी करू शकता.

५) सहानुभूती:-

एक पालक म्हणून तुम्ही मुलांसोबत गरजेनुसार सहानुभूतीशील व्हा आणि तुमच्या मुलांच्या भावना समजून घ्या. त्यांना त्यांच्या भावनांबद्दल बोलण्यासाठी आणि त्यांचे अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहित करा. जरी तुम्हाला पूर्णपणे समजत नसेल किंवा तुम्ही सहमत नसाल तरी किमान ऐकून घ्या. त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक नियमितपणे शब्दबद्ध करा. कारण सकारात्मक मजबुतीकरण मुलांचा आत्मसन्मान आणि सुरक्षिततेची भावना वाढवते.

६) सामायिक स्वारस्ये:-

तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडी शोधा आणि त्यांचे पालनपोषण करा. तुमच्या मुलांना आवडणाऱ्या ॲक्टिविजमध्ये त्यांना टाका. मग तो खेळ, छंद किंवा कला असो. तुम्ही देखील मुलांसोबत या ॲक्टिविज करू शकता. कारण हे तुमचं अर्थपूर्ण संभाषणांसाठी सामान्य ग्राउंड तयार करते.

७) कौटुंबिक बैठका:-

नियमित कौटुंबिक बैठका आयोजित करा जिथे प्रत्येकाला बोलण्याची आणि त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल. हे आपुलकी आणि सहकार्याची भावना वाढवते. त्याचबरोबर या कौटुंबिक बैठकीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या कामाची, यशाची आणि प्रयत्नांची स्तुती करू शकता. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढवण्यासाठी मदत होते.

लक्षात ठेवा की  प्रत्येक मुलं हे अद्वितीय आहे, म्हणून तुमची संवाद शैली आणि वेगवेगळ्या ॲक्टिवीज त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्व आणि गरजांनुसार जुळवून घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे एक सहाय्यक आणि प्रेमळ वातावरण तयार करणे जिथे मुलांना मनमोकळे पणाने बोलण्याची, मूल्यवान वेळेची आणि आमचे पालक नेहमी आमच्या सोबत आहेत याची खात्री असेल.

तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर Jaya Sakpal  यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster  या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.

धन्यवाद!!
जया सकपाळ

Comments