स्वतंत्र व्यवसायक बनण्याचे ९ मार्ग

स्वतंत्र व्यवसायक बनण्याचे ९ मार्ग


नमस्कार

तुम्हाला Independent Enterprineur व्हायचे आहे का...?
व्यवसाय सुरू करण्याची भीती आहे का...?
जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याची गरज समाजाला आहे का... हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का...?
व्यवसाय सुरू केल्यानंतर ग्राहक कसे आणायचे....?

ह्या मधील प्रत्येक एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या ब्लॉग मधून मिळणार आहे...

आणि ब्लॉगच्या शेवटी एक उपयुक्त बाब तुम्हाला वर्सटाईल देणार आहे तर हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा...
(हा ब्लॉग सेलिंग १०१ - झिग झिगलर ह्यांचा पुस्तकाच्या आधारे आहे.)

विक्री व्यवसाय आणि विक्रेते यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. या व्यवसायातील तत्त्वांवर प्रामाणिक विश्वास आहे. जास्तीत जास्त व्यावसायिकता अंगी बाणण्यासाठी आवश्यक ज्ञानाची कधीही न शमणारी लालसा आहे.

विक्रीतील माझ्या करिअरची सुरुवात १९४७ साली जेव्हा मला विक्रीसाठी. पहिले 'अधिकृत' बोलावणे आले तेव्हाची नाही, तर खरी सुरुवात लहानपणी मी मिसिसिपीतल्या याझू शहराच्या रस्त्यांवर भाज्या विकत असे तेव्हाची आहे. त्यावेळी मी वर्तमानपत्रेसुद्धा टाकत असे आणि सुदैवाने सुरुवातीच्या काळात मला किराणामालाच्या दुकानात अनेक वर्षे काम करायची संधी मिळाली...

माझे शिक्षण आणि लग्नाचा खर्च काढण्यासाठी मी दक्षिण कॅरोलिना विद्यापीठाच्या वसतिगृहाजवळ सकाळी सँडवीच विकत असे, त्यानंतर मी प्रत्यक्ष विक्रीत (Direct Sale) शिरलो. त्यात रोखे व्यवसाय, गृहोपयोगी उत्पादने, आयुर्विमा इ. क्षेत्रातील नेमून दिलेले काम असे. १९६४ साली मी व्यक्तिगत प्रगती आणि सांघिक विकासाच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून प्रशिक्षणाची आणि प्रेरणाविषयक अभ्यासक्रमांची विक्री करत आलेलो आहे...


फायदे तुमच्यासाठी


"आज मी एक यशस्वी विक्रेता होणार आहे. आज मी काहीतरी नवीन शिकेन. ज्यामुळे उद्यापासून मी अधिक व्यावसायिकतेने काम करेन." या वाक्याने तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करा असं मी तुम्हाला सांगेन. या वाक्याची रोज स्वतःला आठवण करून दिलीत तर एक यशस्वी व्यावसायिक विक्रेता असल्याचे अनेक फायदे तुमची प्रतीक्षा करीत आहेत.

स्वातंत्र्य


या व्यवसायातल्या अनेक मोठ्या फायद्यांपैकी एक म्हणजे तुम्हीच तुमचे बॉस असता. म्हणतात ना 'स्वतःहून नाही तर स्वतःसाठी' तुम्ही या व्यवसायात आहात. रोज सकाळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता तेव्हा स्वतःच्या नजरेला नजर देऊन म्हणा - "तू इतका चांगला, कार्यक्षम, प्रभावी, मेहनती आणि व्यावसायिक माणूस आहेस की, तुला पगारवाढ मिळायलाच हवी.' बस तुमच्या प्रगतीची सुरुवात झालीच म्हणून समजा. 

 संधी


थोडक्यात जेव्हा तुम्हीच तुमचे बॉस असता तेव्हा तुमच्यावर प्रचंड जबाबदारी असते. हा या व्यवसायातला सगळ्यात रोमहर्षक भाग आहे. या स्वातंत्र्यातून जी जन्माला येते आणि जबाबदारीने हाताळली जाते ती संधी होय. आणि विक्रीत एक संधी दुसरीसारखी कधीच नसते.


 समस्या सोडवणे

तुमच्याजवळच्या वस्तू, उत्पादन किंवा सेवेमुळे, इतरांच्या वेळेची आणि पैशाची बचत होत असेल व नैराश्य आणि / किंवा चिंतेपासून त्यांची सुटका होत असेल तर यातून मिळणाऱ्या वैयक्तिक समाधानाची आणि तृप्तीची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही.
                 
                            
आधुनिक विक्रेत्यांसाठी महत्त्वाची कौशल्ये...


व्यावसायिक जीवनाच्या उभारणीसाठी आपण अध्ययन, श्रवण आणि संभाषण कौशल्यं विकसित करणे तसेच विश्वासार्ह आणि विश्वसनीय होणे आवश्यक आहे. या कौशल्यांच्या आधारे, ज्या जगात आपण राहतो त्यात परिवर्तन घडवत, आपला व्यवसाय, जीवन, कुटुंब, मैत्री आणि व्यावसायिक विक्रीतले करिअर उभारू शकू.


विक्रीतील प्रामाणिकपणा आणि सचोटी


सच्चे व्यावसायिक विक्रेते हे नैतिकतेबद्दल केवळ बोलत नाही तर ते नैतिकतेने जगतात! जेव्हा तुम्ही प्रामाणिक व नैतिक असता आणि सचोटीने जगता तेव्हा त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते.प्रामाणिकपणा, सचोटी आणि नैतिक आचरण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक फायदे मिळवून देईल हे नक्की.

श्रवणकौशल्य


सर्व यशस्वी, व्यावसायिक विक्रेते त्यांच्या श्रवण कौशल्याचा पुरेपूर वापर करत असतात. 
 श्रवण कौशल्य विकसित करण्याचे काही टप्पे आहेत. तसेच या विषयावर आठवड्याच्या मुदतीचे पाठ्यक्रमही आहेत; पण आपल्या गरजांसाठी आपण “talking is sharing but listening is caring" या जुन्या वचनाचा आधार घेऊ शकतो.
                  
केव्हा?


मग प्रश्न निर्माण होतो की, ग्राहक निर्मिती कुठल्या वेळी करायची असते? त्याचं उत्तर आहे प्रत्येक क्षणी! ग्राहक निर्मिती ही काही ८ ते ५ केलेली नोकरी नव्हे. ग्राहक निर्मिती, विनयाने, जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत करता येते सामाजिक समारंभात, विमानात, विमानतळावर जेवताना, क्लबच्या सभेत किंवा  लोकं उपलब्ध होतील तेव्हा. संभाव्य ग्राहकाची यादी मोठी आणि वैविध्यपूर्ण राहावी यासाठी तुमची सर्व साधने वापरा. जेणेकरून तुमचे करिअर केवळ एका व्यक्तीवर किंवा ठराविक व्यक्तींच्या एका समूहावर अवलंबून राहणार नाही.

विश्वास व आत्मविश्वासाची निर्मिती


विक्रीच्या जगात ग्राहक सगळ्यात जास्त महत्त्व ज्या गोष्टीला देतो तो आहे विश्वास. तुमचे बलस्थान कोणते हे ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असाल त्या घटना मनात पुन्हा पुन्हा आठवणे. माणूस जितका जास्त यशस्वी तितके जास्त अडथळे, चुका आणि अपमान त्याच्या वाट्याला आलेले असतात.

नोट - तुम्हाला ही व्यवसायाची संधी आणि स्वतंत्र हवे आहे का.....?
तुम्हाला समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत का...?

वरील एका ही प्रश्नाचे उत्तर हो असल्यास खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा....
आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून Versatile सोबत This Independence Day Be An Independent Enterprineur व्हा...

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Meditation Link - Meditation Link

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments