पालकांनी मुलांना शिकवायलाच हव्यात या ३ शिकवणी

पालकांनी मुलांना शिकवायलाच हव्यात या ३ शिकवणी

नमस्कार पालक मित्रांनो, 

प्रत्येक पालकांना अस वाटतं की त्यांच्या मुलांनी यशस्वी व्यक्ती असावं. एक संस्कारी मुलं म्हणून जगात ओळखल जाव. पण संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर आपण व आपले मूल नक्कीच आदर्श व्यक्ती बनेल. त्यासाठी आपल्या मुलांना अगदी लहान वयातच काही गोष्टी शिकवायला हव्यात आणि त्या आपल्याला देखील करायला हव्यात. नक्की त्या कोणत्या? चला तर जाणून घेऊयात त्या ३ गोष्टी या ब्लॉग मधून.


१. मुलांना स्वावलंबी बनवणे :- 
लहानपणीच मुलांना योग्य वळण लावायला हवे. जसं की झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सकाळचे सर्व आवरून झाल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवणे, अभ्यासाची पुस्तके, वह्या निटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे शिकवणे, शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. सकाळ-दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. 
पण मात्र मुलांच्या प्रयत्नांना तुम्हाला प्रोत्साहन द्यायचे आहे कारण सुरुवातीला त्यांना कदाचित नीट जमणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही. त्यांना स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल. अगदी तुम्हाला जसं हवं होत तसच.


२. स्वच्छ व नीटनेटके राहण्यास शिकवणे :- 


मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना सन्मान देणे तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करणे गरजेचे आहे. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय जमत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे गरजेचे आहे. याची सुरुवात तुम्ही केलात की मुलं ते पाहून लगेच करायला सुरुवात करतात. पण जर का आपण आळस केला की मुलांनाही तिचं सवय लागते. म्हणून आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.

३. मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवा :- 


जर तुम्ही आपले आधीचे ब्लॉग वाचले असाल तर तुम्ही "मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवा" हे खूपदा वेगवेगळ्या प्रकारे वाचलं असालच कारण हे अतिशय महत्वाचे आहे. आणि पालकहो हिच पहिली पायरी आहे असं म्हणाल तरी चालेल. जर घराचे ‘सत्यं शिवं सुंदरम्’ करायचे असेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करतील. कारण "तुम्ही मुलांना काय सांगता यापेक्षा तुम्ही मुलांसमोर काय करता याचा प्रभाव मुलांवर जास्त पडतो." आणि जसं तुम्हाला तुमचं मुलं हवं आहे तस जर का तुम्ही आधी वागलात, तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही.

तर वरील ३ गोष्टी तुम्ही मुलांना शिकवाल याची खात्री आहेच. अशाच प्रकारे वरील गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून Versatile Educaare System च्या संस्कार वर्ग मध्ये शिकवल्या जातात. मुलांना संस्कार लावणे, पालक व मुलांचे बाँडींग वाढवणे व मुलांचे चारित्र्य घडवण्याचे काम Versatile संस्कार वर्ग मध्ये केल्या जातात. जर तुम्हाला Versatile संस्कार वर्ग बद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Meditation Link - Meditation Link

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!


Comments