गोकुळाष्टमी सण साजरा करण्याची - आपली खरी संस्कृती व परंपरा!!

गोकुळाष्टमी सण साजरा करण्याची - आपली खरी संस्कृती व परंपरा!!


हा ब्लॉग लिहायच कारण म्हणजे गोकुळाष्टमी होय. दहीहंडी म्हटलं की आपल्या समोर कृष्ण लिला येते. त्यांच्या मित्रांना गोळा करुन दही व दुधाचे मडके जे घरातल्या एका उंच जागेवर बांधलेले असायचे, ते थरावर थर लावून मडके फोडून त्यातील दही व दुध मित्रांसोबत खात. 

पण आता दहीहंडी फोडण्यासाठी नियम काढावे लागतात. कारण दुसर्‍याला दाखवण्यासाठी मोठे थर तयार केले जातात आणि त्याच्यामुळे मोठे अपघात होतात व जीवहानी होते. 

गोकुळाष्टमी का साजरी केली जाते

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण आपल्याला माहिती आहे का या सणाला का साजरे केले जाते..? चला तर जाणून घेवुयात..

जेव्हा लहानपणी भगवान श्रीकृष्ण दही दुध खाण्यासाठी वर लटकवलेले मातीचे मडके फोडायचे आणि मडके फोडून त्यामधील दही आणि दुध फस्त करून टाकत, जर मडके जास्तच वर टांगलेले असेल तर श्रीकृष्ण आपल्या मित्रांना घेऊन त्या मडक्याला फोडत असत. आणि त्यामधील दुध, दही, ताक सर्वांमध्ये वाटून खाऊन घ्यायचे आणि त्यांच्या ह्या गोष्टींची आठवण ठेवत देशात सगळीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी दही हंडीचा उत्सव साजरा केला जातो. 

कशी साजरी करतात दहीहंडी?

आपल्या देशातील दहीहंडी साजरी करण्याचा आनंद हा पाहण्याजोगा असतो, आपल्या देशातील दहीहंडी ही विशिष्ट प्रकारे साजरी केली जाते. महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि बऱ्याच ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाते, आता आपण दहीहंडीचा उत्सव कश्या प्रकारे साजरा केला जातो याविषयी थोडीशी माहिती पाहूया.

दहीहंडी साजरी करण्यासाठी सुरुवातीला एक मातीचे मडके घेतात त्यामध्ये दुध, दही, ताक आणि काही फळांना कापून टाकले जाते, त्या मडक्याला एखाद्या उंच ठिकाणी दोरीवर मधोमध टांगल जातं. आणि नंतर बाळ गोपाळ आपल्या मंडळींन सोबत घेऊन थर तयार करून मडके फोडतो. म्हणजेच सुंदर विजय प्राप्त करतो असं म्हणायला हरकत नाही. 

पूर्वी या सगळ्यांमध्ये कुठेही स्पर्धा किंवा तीव्र ईर्षा नसायची. हल्ली या सगळ्यांमध्ये जल्लोषात स्पर्धा देखील साजरी केली जाते. जे एक प्रकारे उत्तमच आहे. पण त्या स्पर्धेमध्ये तीव्र इर्षेमुळे कित्येक जणांना नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागते आहे. यावर्षी फक्त एकच विनंती आहे की जास्त थरांची दहीहंडी साजरी करा पण काळजी घेऊनच. अशाने या सणाचा गोडवा आणि आनंद आपण नितांत जपून ठेवू शकतो.

गोपालकाला असेही म्हणतात, हे नाव देण्यामागेे काय कारण आहे?


पूर्वी याच दिवशी एक वेगळा पदार्थ बनवला जायचा. हा खूप खास असायचा. खासच म्हणू, कारण हा पदार्थ बनवण्यासाठी प्रत्येकाच्या घरातून एक एक साहित्य आणले जाते. त्यामध्ये चिरमुरे, लाया, फरसाण, चिवडा, दही, टोमॅटो, कोथिंबीर असे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून काला तयार केला जातो. म्हणजेच तो एक प्रकारचा खमंग चिवडा असतो. याची चव काही वेगळीच असते बनवताच तोंडाला पाणी सुटण्यासारखी. ही पूर्ण प्रोसेस म्हणजे पूर्वीची अनेक परिवारांनी एकत्र केलेली ऍक्टिव्हिटी किंवा टीमवर्क म्हणू शकतो. अनेक परिवार एकत्र येऊन हा चविष्ट पदार्थ बनवतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वांना वाटतात. 

गोपालकाल्याला काला, असा तयार होणारा पदार्थ, हा सगळ्यांनी एकत्र बनवून तो अनेकांना वाटल्याशिवाय अपूर्णच. याप्रथेमुळे लोक एकमेकाला ओळखायचे जाणून घ्यायचे मैत्री वाढायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांमध्ये एकता निर्माण व्हायची. प्रत्येक सणांमध्ये हा एक उद्दिष्ट समान आहे. आणि आता याला जपणे आपली जबाबदारी आहे. आणि आपण सर्व जण मिळून ही परंपरा जपू याची आम्हाला खात्री आहेच.

तर तुम्हा सर्वांना वर्सटाईल परिवाराकडून श्रीकृष्ण जयंती व गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments