असा साजरा करायला हवा ७५ वा स्वातंत्र्य दिवस (आझादी का अमृत महोत्सव )

असा साजरा करायला हवा ७५ वा स्वातंत्र्य दिवस 
(आझादी का अमृत महोत्सव )


आपल्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारने "हर घर तिरंगा जाहीर केलेली योजना.."

केंद्र सरकारने "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत तिरंगा फडकवण्याच्या नियमात बदल केला आहे, आता तुम्ही कधीही तुमच्या घरात तिरंगा फडकवू शकता. केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी "हर घर तिरंगा मोहिमेच्या" नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. बदलानंतर, आता तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही तुमच्या घरात तिरंगा फडकवू शकाल. तसेच आता पॉलिस्टर आणि मशिनने बनवलेला राष्ट्रीय ध्वज "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत वापरता येणार आहे, सरकार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान "हर घर तिरंगा मोहीम" सुरू करणार आहे, त्यादृष्टीने हे पाऊल पुढे आले आहे. 

हा आपला राष्ट्रीय सण आहे. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगाच का निवडला गेला असावा? चला तर जाणून घेवूया आपल्या देशाच्या तिरंग्याबद्दल.. 

आपल्या ध्वजामध्ये ३ रंग आहेत. केशरी, पांढरा व हिरवा हे रंग आपल्याला काय सांगतात? जसं की प्रत्येक रंगाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रंगाच एक महत्त्व आहे. 

प्रथम येतो तो केशरी रंग आपल्याला क्रांतिवीरांचा त्याग, कर्तुत्व आणि साहस दाखवतो. ज्यांच्या धाडसामुळेच खरंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.  

पुढचा आहे पांढरा रंग शांतता, प्रकाश आणि सत्याचे प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो. 

यानंर हिरव्या रंगाची सुद्धा वेगळी ओळख आहे, हा रंग आपल्याला समृद्धी, विश्वास आणि प्रगती या सर्व गोष्टी दाखवण्याचे कार्य करतो.

आणि सगळ्यात वेगळे आपल्याला आकर्षित करणारे अशोक चक्र, हे चक्र आपल्या सर्व धर्मांची एकता दाखवतो. चकाप्रमाणे नेहमी पुढे चालत राहाणे असा संदेश देतो. अशोक चक्र आपल्या ध्वजाचे चौथे प्रतीक आहे.

आपला तिरंगा हा अनेक गोष्टींना एकत्र करून तयार केला गेला आहे. यामध्ये अनेक विचारवंतांचे योगदान आहे. आणि म्हणूनच आपल्या तिरंग्याची शानच वेगळी आहे. स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते फडकवला जातो. 

तिरंगा फडकवणे जसे महत्त्वाचे आहे तसेच त्यानंतर तो जपणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

दरवर्षी प्लास्टिकचे लहान तिरंगे फडकवण्याची पद्धत बऱ्याच जणांनी सुरू केली होती. किंवा लहान मुलांनी शाळेच्या गणवेशावरती छोट्या झेंड्याचा बॅच लावण्याची पद्धत सुरू केली आहे. एवढेच नाही तर तिरंग्याचे हातात घालण्याचे, डोक्यात घालण्याचे बँड देखील प्रसिद्ध झाले आहेत. ज्याला तसं बघायला गेलं तर कोणाचाही विरोध नाही पण भारतीय माणूस या ज्या गोष्टी परिधान करण्यास सुरुवात करत आहे त्या तिरंग्याच्या आहेत हे विसरून चालणार नाही. दुःख या गोष्टीचा आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्टला या सर्व गोष्टी बऱ्याचदा रस्त्यावरती दिसतात. बऱ्याच संस्थांनी अशा ठिकाणी तिरंगा मिळाल्यास ते जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांचे खरंच कौतुक वाटते. पण अशी एखादी मोहीम आपल्या देशात सुरू करावी लागली याची खंत कायम मनात राहते. कारण तिरंगा फक्त तीन रंगांपुरता किंवा आपला ध्वज म्हणून नाही तर त्यामध्ये खूप गहन भावना दडलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी कमवलेलं पुण्याचं वस्त्र आहे जे आपले देवरूपी सैनिक परिधान करून आपल्याला कायमचा निरोप देतात. त्यामुळे आपण आपला तिरंगा अगदी सन्मानाने जपून ठेवू. तो रस्त्यावर पडलेला दिसणार नाही याची आपण काळजी घेऊ.

सर्वांना नम्र विनंती आहे, हा आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे आणि एकत्र मिळून एक सुंदर उपक्रम करण्याच्या दिशेला आपण सर्वच आहोत, तर तो छान आणि अगदी उत्तमरित्याच पार पडू देऊ. तिरंग्याचा सन्मान करू. स्वच्छतेला विसरणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि जल्लोषात १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करूया. 

सर्वांना वर्सटाईल परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐🙏🏻

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

जय हिंद!!

Comments