मुलं व पालकांच्या उत्तम नातेसंबंधासाठी ३ जबरदस्त उपाय

मुलं व पालकांच्या उत्तम नातेसंबंधासाठी ३ जबरदस्त उपाय

नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो,

शाळा जरी नियमित सूरू झाल्या असल्या तरी अजूनही मुलांना आणि पालकांना त्यांचे बदललेले स्केड्युल मॅनेज करणे थोडे अवघड जात आहे. या सगळ्यांमध्ये मुलांवरती प्रेशर येत नाही ना याची काळजी घेणं खूप महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी मुलं इंटरेस्ट घेऊन जर करत असतील तर आणि तरच त्यांना याचा आयुष्यात उपयोग आहे. आणि म्हणूनच या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही मुलांच्या इंटरेस्टनेच त्यांचं स्केड्युल खूप सोप्प्या पद्धतीने मॅनेज करू शकाल. आणि तुम्हाला मुलांसोबत त्यांचं स्केड्युल फॉलो किंवा मॅनेज करण्यापेक्षा एन्जॉय देखील करता येईल. हे तीन उपाय शेवटपर्यंत नक्की जाणून घ्या. मला खात्री आहे हे उपाय केल्यानंतर तुम्ही मुलांसोबत स्केड्युल नक्कीच एन्जॉय करू लागल. 

१) मुलांसाठी परफेक्ट रोल मॉडेल बना.

लहानपणापासूनच प्रत्येक मुलांसाठी त्यांचे आई वडीलच त्यांचे रोल मॉडेल असतात. त्यांचे पहिले शिक्षक सुद्धा तेच असतात. मग ऑटोमॅटिकली जे पालक सांगतील किंवा करतील त्या गोष्टींकडे मुलं लक्ष देतात. त्यामुळेच तुम्ही जे सांगताय ते मुलांनी करावं अशी तुमची अपेक्षा असेल तर ते तुम्ही सुद्धा पहिले फॉलो केले पाहिजे. मुलं जे ऐकतात, बघतात, अनुभवतात तेच सगळ्यात जास्त आणि लवकर शिकतात. म्हणजेच जर तुम्हाला मुलांनी ठराविक गोष्ट करावी अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत सुरुवात करा किंवा स्वतःपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ मुलांनी टीव्ही कमी बघावा दिवसातून एक पान वाचन करावे अशी जर तुमची इच्छा असेल तर हीच गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा. आज पूर्ण दिवसात काय नविन शिकलो किंवा काही नविन गोष्ट केली याची नोंद करणे. या सगळ्याच गोष्टी पहिला पालकांनी केल्या की मुलं हे बघून बघून आपोआप करू लागतात. पण जर तुम्ही सांगून पण तुम्हीच जर का या गोष्टी केल्या नाहीत तर मूल सुध्दा करणार नाहीत. 

२) मुलांबरोबर फ्रेंडली रिपोर्ट सिस्टीम. 
 

आता रिपोर्ट म्हणल्यानंतर दिवसभरात कोणत्या गोष्टी केल्या कोणत्या नाही केल्या काय नवीन शिकलात हे मुलांनी आणि पालकांनी एकमेकाशी डिस्कस केलं पाहिजे. यासाठी दिवसातला कमीत कमी पंधरा मिनिटांचा वेळ नक्की द्यायला हवा. जसा आपण पहिला पॉईंट मध्ये वाचलं की जे पालक करतात तेच मुलंही करतात तर तसंच सर्व गोष्टी दोघांनीही पूर्ण केल्या की नाही हे समजून घेण्यासाठी फ्रेंडली रिपोर्ट सिस्टीम बेस्ट काम करते. अशा ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मुलांसोबत बेस्ट बॉण्डिंगसाठी मदत करतात आणि पालकांना मुलांकडून सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करून घेता येतात. उदाहरणार्थ दिवसाच्या शेवटी मुलांनी आणि पालकांनी एकमेकांसोबत दिवसभरात किती वाचन केले? 
आज काय नवीन शिकलो? 
आज काही चुकलं का? 
अभ्यास किती होता? आणि 
कोणती नवीन चांगली सवय फॉलो करणार?
यावर डिस्कस करायचे. जर हे करणं दररोज शक्य नसेल तर मग कमीत कमी आठवड्याला तरी हे रिपोर्टिंग एकत्र झाले पाहिजे. याचा मुलांच्या डेव्हलपमेंट वरती आणि तुमच्या बाँडींगवरती जबरदस्त परिणाम होतो. याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल. 


३) फॅमिली विजिट प्लॅन किंवा एज्युकेशनल टूर प्लॅन करा. 
पूर्ण दिवसाच्या बिझी स्केड्युल मधून प्रत्येकालाच ब्रेक हवाहवासा असतो. एखादी छोटीशी व्हिजीट आपल्याला भरपूर आनंद देते आणि रिफ्रेश करून जाते. पण या वयात मुलं जे बघतात तेच लवकर शिकतात. त्यामुळेच तुम्ही फिरायला मुलांना कुठे घेऊन जाता हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जर मुलांना तुम्ही सतत पिझ्झा किंवा बर्गर पॉईंट, बीच, गेम झोन अशा ठिकाणी फिरायला नेलं तर तिथे मुलांना शिकण्यासारखे असे फारसे काहीच मिळणार नाही. पण जशी तुमची इच्छा आहे की मुलांनी उत्तमच घडलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही एज्युकेशनल व्हिजिट करायला हव्यात. जसं की देऊळ, नैसर्गिक ठिकाण, बस किंवा रेल्वेचा प्रवास, एज्युकेशनल प्लेस जसा की झू किंवा सायन्स सेंटर. किंवा नातेवाईकांना भेटणे सुद्धा उत्तमच ठरेल. इथे मुलं सर्वात जास्त फॅमिली बॉण्डिंग शिकतात. बर्गर पॉइंट किंवा गेम झोनला जाणे चुकीचे आहे असे नाही. एखाद्या वेळेस कधीतरी जाणे चांगले आहे. खरंतर मुल खूप छान मजा करतात. पण पालकांच्या दृष्ट्या महत्त्वाचा हेतू या ठिकाणांवर साध्य होत नाही. मुलांना चांगल्या सवयी लागण्याचा दृष्ट्या मग त्या वागणुकीच्या असोत किंवा खाण्यापिण्याच्या ह्या अशाच साध्य करू शकतात.  

हे तीन उपाय फॉलो करण्याने तुमचे आणि मुलांचे बाँडींग स्ट्रॉंग होईल. तुम्हाला त्यांच्यावर चांगले संस्कार करता येतील आणि ते सुद्धा या सगळ्या ॲक्टिविटिज एन्जॉय करत. मुलांना कसल्याच गोष्टीचे बर्डन होणार नाही. त्यांचं स्केड्युल ऑटोमॅटिकली मॅनेज होत राहील. तर ॲक्टिविटिज आठवड्याला किंवा महिन्याला नक्की करून पहा.

तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिविटिजच्या माध्यमातून मुलांना संस्कार लावणे, पालक व मुलांचे बाँडींग वाढवणे व मुलांचे चारित्र्य घडवण्याचे काम Versatile Educaare System च्या संस्कार वर्ग मध्ये केल्या जातात. Versatile संस्कार वर्गच्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता.

Versatile Sanskar Warg - Versatile Sanskar Warg

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!





Comments

Post a Comment