GRAPHOLOGY म्हणजे नक्की काय ?

GRAPHOLOGY म्हणजे नक्की काय ? 
              
खूप साऱ्या नव्या गोष्टी आपण दररोज ऐकतो, पाहतो आणि शिकत असतो. त्यातच मी शिकलेली एक अगदी नवीन वाटणारी गोष्ट तुमच्याशी आज शेअर करत आहे. "Graphology" शब्द वाचल्या बरोबर माझ्या मनात सगळ्यात आधी आला तो म्हणजे "Geography" (भूगोल) हा विषय. कारण दोन्ही शब्दांचा उच्चार किंवा पाहताना अचानक स्पेलिंग सारखीच वाटते हो ना? पण जेव्हा मी या विषयाबद्दल ऐकत आणि शिकत गेले तसे हा विषय किती वेगळा आणि युनिक आहे हे समजत गेले. 

नमस्कार मित्रांनो, मी श्रुती कांबळे. Versatile Educaare System ची टीम मेंबर. आज आपण नक्की Graphology म्हणजे काय? या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देईन. कारण आपण जस बोलतो की 'जितक्या व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती' तसेच आहे. म्हणूनच संपूर्ण Graphology ची ओळख सुद्धा फक्त एका ब्लॉग मध्ये होण सुद्धा थोड अवघडच. आपण हा विषय कधी शाळेत न शिकलेला, कधी आईने न सांगितलेला, कधी मित्रांनी सुद्धा न बोललेला असा हा विषय आहे. तर आता हा विषय या ब्लॉग मधून जाणून घेऊयात.

Graphology वाचायला आणि शिकायला अगदी नवीन आणि खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. आणि जणू काही एक कलाच. आपण अनुभवातून आणि सहवासातून माणसे ओळखायला शिकतो पण या कलेचा वापर करून आपण माणसांच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे ओळखावे हे शिकवणारे शास्त्र म्हणजेच "Graphology".
 
आता आपण सगळे बोलाल की आज कालची नवीन मुलं कोणताही नवीन शोध काढतात आणि त्याला शास्त्र नाव देतात. अहो पण तुम्ही आहात कोठे? हे शास्त्र ४०० वर्ष जुने आहे!! आता कुठे भारतामध्ये लोकांना याबद्दल माहिती मिळण्यास सुरूवात झाली आहे .
 
या शास्त्रामध्ये आपण हस्ताक्षर मधून व्यक्तीचे अद्वितीय गुण, काही दोष, कामातील सातत्य, भूतकाळाशी असलेले नाते, भविष्याकडे असणारी वाटचाल अशा असंख्य गोष्टींची माहिती मिळवू शकतो. तसेच काही अक्षरे लिहिण्याची पद्धत बदलून आपण व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवून आणू शकतो. 

हे सगळे कसे काय घडते आणि बदल सुद्धा कसे होतात असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल. तर पहा आपण शाळेत होतो तेव्हा आपल्या सोबत कितीतरी विदयार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत होते. आपले शिक्षक त्यांना आणि आपल्याला एकच गोष्ट शिकवायचे. लिहायला सुद्धा आणि वाचायला सुद्धा एकत्रच शिकलो, पण तरीही सगळ्या मुलांचे हस्ताक्षर वेगवेगळे असायचे ना! काही मुलांचे गोल, काहींचे लांबट, काहींचे तिरके तर काहींचे मुंग्या पाळाव्यात असे असायचे. यामध्ये मग फरक का? तर मानवी मेंदूमध्ये खूप सारे न्युरोंस असतात आणि यावरून माणसाचे स्वभाव आणि कृती ठरत असतात. या न्युरोंस मधून येणारी ऊर्जा आपल्या हातावाटे आपल्या हस्ताक्षरात उतरतात आणि आपले हस्ताक्षर त्याप्रमाणे वेगवेगळे येते. तर प्रत्येक ९० दिवसांनी माणसाचे न्युरोंस आपल्या सोबत ज्या गोष्टी व्यक्ती दररोज करत आहेत त्या गोष्टी पुढे नेतात आणि तसा आपला स्वभाव बनत जातो. तर ज्या वेळेस आपण काही ठराविक कालावधी मध्ये आपले हस्ताक्षर बदलेले पाहतो तर ती त्या वेळेची मानवी मेंदूची किंवा स्वभावाची स्थिती असते. आपले हस्ताक्षर वेळेनुसार किंवा कामानुसर बदलत जाते म्हणून आपण Graphology मध्ये व्यक्तींच्या सध्य स्थितीचा विचार आणि चॅलेंज यावर उपाय किंवा त्यानुसार बदल सांगू शकतो. जेणेकरून व्यक्ती पुढील काही दिवस त्या गोष्टींचा सातत्याने सराव करून त्या गोष्टीमुळे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये थोडा बदल घडवून आणू शकतील.
 
अशा प्रकारे फक्त व्यक्तींच्या हस्ताक्षरावरून आज खूप मोठं मोठ्या क्षेत्रात लोकांची निवड केली जाते. याचा वापर आज सर्व वयोगटातील लोकांसाठी होऊ शकतो. नवीन व्यवसाय चालू करताना आपला जोडीदार योग्य आहे का हे जाणून घेण्यासाठी, एखाद्या नोकरी मध्ये भरती करून घेताना, पोलिसांची मदत करण्यासाठी, कागदपत्रांच्या परिक्षणासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच लहान मुलांचे कौशल्य त्यांच्या अभ्यासाबरोबर विकसित होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी सुद्धा Graphology चा उपयोग होतो. 

तर अशा प्रकारे हे नवीन शास्त्र अगदीच वेगळे पण आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन जाणारे आहे. जाणून घेऊ तेवढे वाढत जाणारे अशा या Graphology ची थोडक्यात माहिती मी या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.

तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!


Comments