मुलांना अभ्यासाची सवय लावण्याचे ५ उत्तम मार्ग

मुलांना अभ्यासाची सवय लावण्याचे ५ उत्तम मार्ग

नमस्कार पालक मित्रांनो, 

अचानक आलेल्या कोरोनासारख्या महामारीमुळे मुलांची शाळा ऑनलाईन होती. ज्यामुळे मुलांच्या अनेक सवयी बदलल्या. पण आता २ वर्षानंतर ऑफलाईन शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जसं की मुलांची अभ्यास करण्याची सवय, एका जागी स्थिर बसण्याची सवय, शाळा ऑफलाईन त्यात वेळ वाढली म्हणून शारीरिक थकवा, अपुरी झोप, घरचा अभ्यास, वेगवेगळे क्लासेस या सर्व गोष्टींमुळे मुलांची अगदी धावपळच होत आहे.

त्यात आता मुलांना बऱ्याच मोठ्या गॅपनंतर अभ्यास करावा लागणार आहे. आणखी महिन्याभरात शाळांमध्ये चाचणी परीक्षा सुरू होतील. म्हणून शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासाबरोबरच मुलांनी आणखीही अभ्यास करावा अशी पालकांची अपेक्षा असते. जास्तीचा नाही पण किमान घरचा अभ्यास तरी वेळेत आणि नीट पूर्ण करावा असं पालकांना वाटत असत. पण मुलांना मात्र अभ्यासाला बस म्हटलं की ती टाळाटाळ करतात, विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तरं देत नाहीत, लिहायचा खूप कंटाळा करतात. यामुळे पालक म्हणून तुमची मुलांप्रती चिंता वाढत चालली आहे पण काळजी करू नका तुमच्या या चिंतेच निरसरन करण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि यातले ५ मार्ग नक्की अमलात आणा. चला तर जाणून घेऊयात हे ५ मार्ग..
१) लहान असल्यापासून अभ्यासाची सवय

मुलं लहान असल्यापासूनच म्हणजे अगदी ५ वर्षांपासूनच त्यांना अभ्यासाची सवय लावा. म्हणजे त्यांच्या बरोबर पाटी पेन्सिल घेऊन चित्र काढणं, वही व पुस्तकाची ओळख करून देणे, गोष्टी सांगणे व वाचून दाखवणे ह्या गोष्टी आपण करायला हव्यात. म्हणजे मुलांना ऐकण्याची, एका जागी बसण्याची सवय लागेल. पण हो अगदी ठराविक वेळेतच हे करावे म्हणजे त्यांना त्यांच्या बालपणाचा आनंद घेता येईल.
२) एका जागी बसण्याची सवय 

बऱ्याच मुलांना एका जागी स्थिर बसण्याची सवय नसते. त्यांना या गोष्टीचा त्रास देखील होतो. काही मुलांचं डोकं दुखत तर काहींना उलट्या देखील होतात. म्हणून मूल जास्त वेळ एका जागी बसावित यासाठी बसून करण्याच्या काही ॲक्टीव्हीटीज व बैठी खेळ आपण घेऊ शकतो. तसच अभ्यास करताना मुलांचं लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. यासाठी टीव्ही, मोबाइल बंद ठेवणे, कमीत कमी आवाजात बोलणे या गोष्टी करायला हव्यात. मुलांना अभ्यास हा स्वतःसाठी आहे हे अतिशय योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवे.
३) अभ्यासाची वेळ 

बऱ्याच वेळेला पालकांनी सांगिलेल्या वेळेस मुलांना अभ्यास करायचा नसतो मग मुलं वेगवेगळी कारण देतात. म्हणून आधीच अभ्यासाची वेळ मुलांना विचारून ठरवा. जर आधीच विचारुन ठरवलं तर अभ्यासावरुन पालक व मुलांमध्ये वाद होणार नाहीत. मुलं एक विशिष्ट वेळ ठरवून सुद्धा अभ्यासाला बसायला टाळाटाळ करत असतील तर पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद साधून त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. 
४) अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती

रोज रोज त्याच पद्धतीने अभ्यास केला तर मुलांनाच नाही तर आपल्याला देखील कंटाळा येतो म्हणून अभ्यास घेताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये कधी गोष्टी सांगून, कधी चित्रांच्या माध्यमातून तर कधी व्हिडिओ दाखवून आपण मुलांना विषय समजावून सांगू शकतो. जर मूल थोडे मोठे असेल तर प्रश्नमंजुषेसारखे खेळ खेळून मुलांचा अभ्यास घेऊ शकतो. वेगवेगळी उदाहरणं देऊन, गाणी म्हणून, इतिहासातले प्रसंग रंगून सांगून, नाट्यमय पद्धतीने मुलांना विषय समजावून सांगितला तर मुलांच मनोरंजन पण होईल आणि अभ्यासही होईल. विषयानुसार, मुलांच्या वयानुसार पद्धतीचा वापर केलात तर मुलांना नवीन विषय शिकायला कंटाळा येणार नाही. 
५) लिखाणाची सवय 

मुलांना लिहायला आवडत नाही कारण त्यामुळे त्यांचे हात दुखतात अस त्यांचं मत असतं. म्हणून तुम्ही
लिखाणासाठी मुलांच्या बोटांची पकड वाढवण्याच्या ॲक्टीव्हीटीज घेऊ शकता. जसं कि मणी ओवणे, कात्रीने कागद कापणे, लहान वस्तू निवडणे, खोडरबरने खोडणे इत्यादी. मात्र मूल खूप लहान असताना त्याला लिखाणाचा आग्रह करु नका ज्यामुळे त्यांचा लिखणाप्रती अधिक कंटाळा वाढेल.

तर जसं की आता आपण अभ्यासाचे ५ मार्ग म्हणजे
१) लहान असल्यापासून अभ्यासाची सवय
२) एका जागी बसण्याची सवय
३) अभ्यासाची वेळ
४) अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती
५) लिखाणाची सवय

पाहिले तर या ५ मार्गांचा अवलंब करून आपण आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लावू शकतो. मात्र अभ्यासाबरोबरच मुलांना विविध गोष्टी देखील करण्यास एक पालक म्हणून तुम्ही त्यांना सहकार्य करायला हवं.

तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!


Comments