पावसाळ्यात मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे ३ मार्ग

पावसाळ्यात मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे ३ मार्ग 

नमस्कार पालक मित्रांनो, 

पावसाळा म्हणताच आपल्या सर्वांना खूप आनंद होतो. पावसात भिजणं, खेळणं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद आपण घेतो. पावसाची मजा तर सगळ्यांनाच घ्यायला आवडते. त्यात लहान मुलांचा आनंद तर विचारुच नका. पण पावसाळ्याच्या दिवसातच मुलं खूप जास्त आजारी पडतात. मुलांचे आरोग्य बिघडते म्हणजे ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी आणि अजुन बरेच काही आजार मुलांना होतात. त्यामुळे त्यांच्या शाळेच्या सुट्टया होतात व अभ्यास बुडतो. म्हणूनच पावसाळ्यात मुलं आजारी पडू नये यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे फार गरजेचं आहे. पण मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक तुम्ही मुलांकडे खास लक्ष देत असालच. तर आज आपण असे काही ३ सोप्पे मार्ग बघणार आहोत ज्यामुळे आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होईल.

१) दिवसाची सुरूवात हेल्दी फूडने करा :- 

पावसाळ्यात वातावरण थोड थंड असतं पण अशा वातावरणात मुलं उत्साही राहाण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला करावी लागेल ती म्हणजे मुलांच्या दिवसाची सुरुवात हेल्दी फुडने करून. यासाठी मुलांना सकाळी एखादं फळ, भिजवलेले बदाम, भिजवलेले मनुके आणि केशरच्या एक ते दोन काड्या खाण्यास द्याव्यात. यामुळे मुलांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. सुकामेवा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. बदामामध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे मुलांच्या शरीरात होणारं पेशींचं नुकसान रोखलं जातं. मुलांना लोह, प्रथिनं यासारखी महत्त्वाची पोषणमुल्यं मिळून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

२) रोज एक आवळा :- 

पावसाळ्यात मुलांचं आरोग्य निरोगी राहाण्यासाठी मुलांना रोज एक आवळा खायला द्यावा. आवळ्यामध्ये "क" जीवनसत्व जास्त असतं. ते जर मुलांच्या शरीरात गेलं तर मुलांचं संसर्गापासून रक्षण होतं. पण जर पाहिलं तर मुलांना आवळा खायला आवडतं नाही, ते नुसता आवळा खाण्यास टाळाटाळ करतात. तर आपण मुलांना वेगवेगळ्या प्रकारात आवळा खायला देऊ शकतो. जसं कि आवळा कॅण्डी, सुकवलेला गोड आवळा, मोरावळा, आवळ्याचा मुरांबा किंवा आवळ्यचं सरबत या स्वरुपात मुलांना आवळा खायाला देऊ शकतो. जो मुलांसाठी फार फायदेशीर ठरतो.

३) मुलांना खेळायला द्या :- 

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी पुरेसं खेळायलाही हवं. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांना पावसात खेळायला बाहेर जाऊ नको असं सांगतो. त्यामागे एक पालक म्हणून तुमचा हेतू चांगलाच असतो. कारण मुलं आजारी पडतील याची भिती तुम्हाला वाटत असते. पण पावसाळ्यात मुलं बाहेर जाऊन खेळू शकत नसतील तर मुलांना घरात खेळण्यास प्रोत्साहन द्या. कारण मुलांनी दिवसभरात ६० ते ९० मिनिटं खेळायला हवंच. एवढा वेळ मुलं सलग खेळत नसतील तर त्यांनी टप्पाटप्यानी तरी तेवढा वेळ खेळायला हवं. खेळल्यामुळे मुलांचे हाडं मजबूत होतात. त्यांचं आरोग्य सुदृढ राहतं तसेच मेंदूही चांगलं काम करतो. त्यामुळे मुलं घरात नुसती बसून राहाणार नाही याकडेही पालकांचं लक्ष असायला हवं. आणि तुम्ही एक पालक म्हणून मुलांकडे उत्तम लक्ष देत असालच. 

तर वरील ३ मार्ग पावसाळ्यात आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतीलच. पण त्याच बरोबर अजुन एक महत्त्वाचे म्हणजेच पावसाळ्यात मुलांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर मुलांना घरचं ताज आणि पौष्टिक आहार खायला द्या. मग आपल्या मुलांचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.

तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Meditation Link - Meditation Link

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!



Comments

Post a Comment