प्रोकास्टिनेशन दूर करण्याचे ७ उपाय

 प्रोकास्टिनेशन दूर करण्याचे ७ उपाय

एखादे ठरवलेले काम परत करू, अजुन खूप वेळ आहे परत करू, एवढे महत्त्वाचे नाही पुन्हा त्यावर विचार करू असे विचार नेहमी माझ्या मनात येत होते आणि काम सुद्धा अशीच उशिरा व्हायची. तुमच्या सोबत सुद्धा असे होते का? तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट करायची पुढे ढकलता किंवा टाळता का? तर यापासून मी कसा मार्ग काढला व सगळी कामे अगदी नेमलेल्या वेळेत कशी करू लागले तुम्हाला पण जाऊन घ्यायचे असेल तर आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. 
 


नमस्कार मित्रांनो , मी श्रुती कांबळे Versatile Educaare System ची टीम मेंबर आज आपण सर्व लोक काम पुढे ढकलणे किंवा काम वेळेवर न करणे ज्याला आपण प्रोकास्टिनेशन म्हणजेच विलंब असे म्हणतो. तर ते कमी कसे करायचे याबद्दल जाणून घेणार आहोत . 
       तर सर्व प्रथम आपण प्रोकास्टिनेशन माणूस का करतो हे जाणून घेऊयात . एखादे काम करायचे टाळण्यामागे खूप कारणे असतात. जसे की 

१) ठरवलेल्या कामापेक्षा दुसरे काम अति महत्त्वाचे वाटणे.
२) एखाद्या सोशल मीडिया साइटवर आपला वेळ घालवणे. 
३) अजून भरपूर वेळ आहे असे म्हणून त्या कामाकडे दुर्लक्ष करणे.
४) शेवटचा दिवस येईपर्यंत वाट पाहणे.
५) दुसऱ्या मनोरंजक गोष्टींमध्ये वेळ घालवणे ( टीव्ही पाहणे ,गेम खेळणे) 
६) आळस करणे इत्यादी. 

अशा भरपूर कारणांमुळे आपण एखादी गोष्ट करण्यास वेळ लावतो आणि त्यामुळे काही वेळा ती गोष्ट पूर्ण ही होत नाही. एखाद्या गोष्टीत विलंब करणे ही एखाद्या सवयी सारखी गोष्ट आहे. आपल्या या सवयीमुळे आपल्याला भविष्यात भरपूर गोष्टींना सामोरे जावे लागते याचा खूप मोठा परिणाम आपण ठरवलेल्या ध्येयांवर सुद्धा होऊ शकतो. आता हाच विलंब टाळण्यासाठी आपण कोण कोणत्या मार्गांचा वापर करू शकतो याची माहिती घेऊयात. 

१) टू डू लिस्ट बनवणे 



टू डू लिस्ट ही संकल्पना खूप जणांना ऐकून माहिती असेल. तर टू डू लिस्ट म्हणजे आजच्या दिवसात कोणती कामे करायची आहेत याची एक यादी तयार करणे. त्या यादीचा वापर करून दिवसातील सर्व ठरवलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे संपूर्णपणे प्रयत्न करणे असे केल्याने नेमलेली सर्व कामे आपल्या दृष्टीत राहतात. जेणेकरून आपण ती जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ही टू डू लिस्ट वापरण्याची सवय आपल्याला हळूहळू लागेल पण याचा वापर केल्यामुळे आपण आपली बहुतेक कामे लवकरात लवकर पूर्ण करू. 

२) आवड निर्माण करा 




एखादे काम आपण टाळतो कारण आपल्याला त्या कामाबद्दल कदाचित आवड नसते किंवा ते काम आपण मनापासून करायचे ठरवलेले नसते. तर सर्वप्रथम त्या कामाबद्दल आपल्या मनात आवड निर्माण करा. ते काम केल्याने आपल्याला काय सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे याचा विचार करा. त्यातून आपल्या इंटरेस्टच्या कोणत्या गोष्टी जास्तीत जास्त शिकता येतील याचा विचार करा जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल. आपल्या आवडीचे काम आपण नेहमीच लवकर करतो तर इथे विलंब करणे हा प्रश्नच निघून जातो. 

३) स्वतःसाठी डेडलाईन ठरवा 


एखादे काम संपवण्यासाठी स्वतः स्वतःसाठी काही डेडलाईन ठरवून घ्या. आणि जर त्या ठरवलेल्या वेळेत तुम्ही काम पूर्ण केले तर स्वतःसाठी काही बक्षीस देऊ शकता. असे केल्याने आपण एका वेळेच्या बंधनात बांधले जातो आणि कामे गतीने करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे काम केल्याने विलंब न करता आनंदाने ते काम आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. 

४) बडी ठरवा 


आता बडी म्हणजे काय? तर स्वतःसोबत एक पार्टनर असा ठेवा जो प्रत्येक वेळेस तुम्ही ठरवलेल्या कामाची चौकशी करेल. आणि तो पार्टनर म्हणजे जोडीदार जर आपल्यापेक्षा अनुभवाने किंवा वयाने जरी मोठा असेल तर उत्तमच कारण आपण अशा लोकांना उत्तरे द्यायचे आहेत हे ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस आपण आपले काम नक्की पूर्ण करतो. 

५) कामाची उत्तम वेळ ठरवा 


प्रत्येक व्यक्तीची प्रभावी काम करण्याची वेळ वेगवेगळी असते. काही लोक सकाळच्या वेळेत खूप छान काम करतात तर काही लोक संध्याकाळच्या वेळेत खूप एनर्जीने काम करतात. सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या वेळेत अतिशय उत्साहाने काम करू शकता ती वेळ शोधा आणि त्या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. जेणेकरून परत तुम्ही त्या कामांची टाळाटाळ नाही करणार आणि लवकरात लवकर तुमची कामे पूर्ण होतील.

६) कारणे शोधा 


एखादे काम आपण का करत नाही? त्यांची कारणे काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा. जसे की मी एखादा गेम खेळण्यांमध्ये महत्त्वाचे काम करणे टाळतो, एखादा चित्रपट पाहण्यामध्ये महत्त्वाचा वेळ घालवतो, मित्रांसोबत महत्त्वाच्या नसणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये भरपूर वेळ घालवतो अशा कित्येक गोष्टींमध्ये आपण दिवसातील महत्त्वाचा वेळ घालवतो. तर अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे आपला महत्त्वाचा वेळ खर्च होतो ही कारणे शोधा व ती कमी करण्याचा प्रयत्न करा. 

७) आत्मपरीक्षण करा


आत्मपरीक्षण करणे म्हणजे दररोज स्वतःसाठी वेळ देणे. कोणत्या गोष्टी मी प्रायोरिटी म्हणून सेट केल्या होत्या आणि त्यापैकी किती गोष्टी मी आज केल्या इतर गोष्टी न केल्याने मला भूतकाळामध्ये काय नुकसान झाले आहे? त्यापेक्षा जास्त नुकसान भविष्य काळामध्ये काय होऊ शकते? महत्त्वाच्या गोष्टींची टाळाटाळ केल्यामुळे मी ठरवलेल्या भविष्यावरती काय परिणाम होऊ शकतो? असे प्रश्न जर तुम्ही दररोज स्वतःलाच विचारले तर निश्चितच तुम्ही तुमची नियमित कामे पूर्णत्वास नेऊ शकता. 

    अशा प्रकारे तुम्ही वरील काही टिप्सचा वापर करून विलंब करणाऱ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आणि लवकरात लवकर तुमचे ध्येय गाठू शकता. वेळेचा सदुपयोग करून आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी करू शकता.
तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Meditation Link - Meditation Link

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!


Comments