शारीरिक दृष्ट्या मुलं फिट राहण्यासाठीचे ३ जबरदस्त उपाय

शारीरिक दृष्ट्या मुलं फिट राहण्यासाठीचे तीन जबरदस्त उपाय


नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो

रोजचा दिवस सारखा नसतो. अभ्यासक्रमामध्ये फिट राहणं जितके गरजेचे आहे तितकेच शारीरिक दृष्ट्या सुद्धा गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे मुलांची एकूणच शारीरिक हालचाल कमी झालेली आपण बघितले आहे. आणि म्हणूनच आता शाळा सुरू झाल्यापासून त्यांना खूप थकवा जाणतच असणार. मुलांचा हल्ली ऍक्टिव्ह न राहण्यामागे हे एक कारण असू शकते. आणि म्हणूनच हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा ज्यामध्ये तुम्हाला पडलेला सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. चला तर जाणून घेऊयात तीन जबरदस्त उपाय ज्यांनी तुमची मुलं अभ्यासासोबतच शारीरिक दृष्ट्या देखील फिट राहतील.
१) मुलांची सकाळ कशी असावी :- 

सकाळी लवकर उटणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आधी लवकर झोपणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर थोडं कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. योगासन करणे, जसं की सूर्यनमस्कार किंवा श्वासावर नियंत्रण असलेले प्रकार देखील करावेत. आणि त्यानंतर मेडिटेशन करणे गरजेचे आहे. मेडिटेशन करण्याचे अनेक फायदे आहेत. एकदम दररोज जास्त मिनिटाचे मेडिटेशन करणे मुलांना शक्य होत नाही म्हणूनच हळूहळू थोडे मिनिटे वाढवत पूर्ण करावे. तुमच्यासाठी मेडिटेशन मुसिकची लिंक ब्लॉगच्या शेवटी दिली आहे ती नक्की पहा.


२) मुलांनी त्यांचा स्वतःचा पौष्टिक आहार करावा :- 

आता या बाबतीत हल्ली मुलं कुणाचेच सहसा ऐकणे टाळतात. त्यांना जंक फूड शिवाय चालत नाही. त्यामुळे एकदम जर तुम्ही त्यांचा पौष्टिक आहार सुरू केलात तर ते तसंच करतील असे नाही. त्यांना आठवड्यामध्ये वारानुसार कच्च्या भाज्या आणि शिजवलेल्या भाज्या यांचे कॉम्बिनेशन द्या. पानात दररोज एक शिजवलेली आणि एक कच्ची भाजी म्हणजेच सॅलड नक्की असावे. त्यांनी सकाळी थोडस दूध, एक प्रकारचे ड्रायफ्रूट आणि नाष्टा पोटभर करायला हवा. दुपारचे जेवण ही वेळेत होणे गरजेचे आहे. संध्याकाळी हमखास मुले काहीतरी जंक फूड मागतातच. त्यावेळी त्यांना ते न देता, boiled sprouts द्या. असे नाही की सगळेजण जंक फूड बंद करा पण जंक फूड खाण्याचा आठवड्यातला दिवस ठरवून ठेवा. मुलांना काही गोष्टी ठरवून ठेवून गेम खेळण्यासारख्या काही फूड डे किंवा फूड ऍक्टिव्हिटीज ठेवल्या तर ते इंटरेस्ट घेऊन फॉलो करतात. 
 

३) मुलांना त्यांचा आवडता मैदानी खेळ खेळू द्या. 

मुलांना त्यांचा आवडता कोणताही मैदानी खेळ खेळू द्या म्हणजेच क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी खो-खो, हॉकी किंवा या व्यतिरिक्त स्केटिंग असेल कुंफू, कराटे, टायकोंडो अशा गोष्टींची माहिती देऊन त्यांच्या इच्छेचा खेळ त्यांना नक्की  शिकवा.  कोणताही खेळ असला तरी त्यामध्ये व्यायाम इतर मुलांबरोबर अगदी बरोबर पद्धतीने होतो. दररोज नियमित व्यवस्थित व्यायाम झाल्याने मुलांना बरोबर वेळेत भूक लागते. आणि अशा प्रकारच्या हेल्दी खाण्याने त्यांना अधिकाधिक ताकद मिळेल. हेच गेम्स त्यांना पुढे त्यांची एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून नक्कीच कामाला येतात. शेवटी कोणतेही कधीच ज्ञान वाया जात नाही.  मुलांचा मूळ स्वभाव खेळकर असल्यामुळे त्यांना त्यांचे काम  किंवा सांगितलेल्या चांगल्या सवयी एखादा खेळ गेम ऍक्टिव्हिटीनुसार जर त्यांच्यासमोर दिलं गेलं तर ते आनंदाने आणि इंटरेस्टने पूर्ण करतात.  त्यांना जर तुम्ही सतत अशा गोष्टी सांगत राहिला किंवा डायरेक्ट समोर देत राहिला तर कदाचित खूप कमी पर्सेंट मुलं ते पूर्ण करू शकतात. अशा गोष्टी करणाने घरातला वातावरण सुद्धा ॲक्टिव्ह आणि हॅपी राहतं.

तर वरील तीन जबरदस्त उपाय नक्की वापरून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट मध्ये शेअर करा.
तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Meditation Link - Meditation Link

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!


Comments