मेडिटेशनचे ५ अद्भुत फायदे

मेडिटेशन आजकाल भरपूर ठिकाणी ऐकला आणि पहिला जाणारा शब्द आहे. मेडिटेशन बद्दल भरपूर लोकांनी ऐकल असेल आणि वाचलं असेल काही लोकांनी तर त्याचा खूप छान अनुभव सुद्धा घेतला असेल. पण हे मेडिटेशन नक्की काय आहे आणि त्याचे फायदे आपल्याला कशा प्रकारे होतात हे जाऊन घ्यायचे आहे का? तर हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
              नमस्कार मी श्रुती कांबळे Versatile Educaare System ची टीम मेंबर. आज आपण मेडिटेशन बद्दल काही माहिती या ब्लॉग मधून जाणून घेणार आहोत चला मग ब्लॉगला सुरूवात करूया.
              मेडिटेशनचा अर्थ ध्यानधारणा असा होतो. झोपल्यानंतर जसे आपण आपल्या शरीराला विश्रांती देतो त्याच प्रमाणे ध्यानधारणा करून आपण आपल्या मेंदूला आराम देतो. ध्यानधारणा म्हणजे संपूर्ण विश्रांती. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येक गोष्टीमुळे आपले मन अशांत किंवा चंचल असते. त्याच मनाला जर शांत करायचे असेल तर ध्यान हा एकमेव मार्ग अतिशय पूर्वीच्या काळापासून वापरला जातो. ज्यामध्ये एका ठिकाणी बसून डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. अशाप्रकारे ध्यानधारणा केल्याने माणसाचे शरीर आणि मेंदू दोन्ही शांत होऊन ध्यान लागते. 
                  हे ध्यान धारणा करण्याचे फायदे काय होतात ते जाणून घेऊया. 

१) मन शांत होते - दररोजच्या धावपळीच्या जगात माणसाचे मन अतिशय अशांत आणि चंचल झाले आहे. कोणतीही मोठी गोष्ट करण्यासाठी मन शांत आणि स्थिर असणे खूप गरजेचे असते. शांत मनाने घेतलेले कोणतेही निर्णय नेहमी बरोबर असतात. हेच मन जर शांत ठेवायचे असेल तर ध्यान हा एकमेव मार्ग आहे. 
       
२) एकाग्रता वाढवण्यासाठी - ज्या वेळेस आपण अभ्यास करत होतो त्यावेळी नेहमी आपल्याला एकच गोष्ट ऐकायला मिळत होती की कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता. पण ही एकाग्रता वाढवायची कशी तर त्यासाठी तुम्ही श्वासावर नियंत्रण करून ध्यान करू शकता. हा ध्यानाचा प्रकार एकाग्रता वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. 

३) स्वभावांमध्ये बदल घडवून येतो - ध्यान धारणा केल्याने आपल्या स्वभावांमध्ये बदल होऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने नाते संबंध जपू शकतो. आपला स्वभाव मनमिळावू होऊ लागतो. लोकांना जसे आहे तसे स्वीकारण्याची क्षमता वाढू लागते. एकत्र काम करण्याच्या ठिकाणी या गुणांचा अतिशय चांगला वापर होऊ शकतो.

४) शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते - ध्यान धारणा करण्याचे फायदे फक्त मनावरच नाही तर शरीरावर सुद्धा होतो. शांत मनाने आपण अतिशय चांगल्या प्रकारे योग प्रकार तसेच व्यायाम करू शकतो.  ज्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. चांगले शरीर आणि मन दोन्ही गोष्टी चांगल्या आयुष्यासाठी खूप आवश्यक असतात. या दोन्ही गोष्टी आपण ध्यानधारणेमुळे मिळवू शकतो. अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांवर आपण ध्यानधारणेमुळे आपण विजय मिळवू शकतो . 
       
५) आत्मविश्वास वाढतो - आपण जर रोजच्या आयुष्यात ध्यान करत राहिलो तर आपली बौद्धिक क्षमता वाढते. ज्यामुळे आपल्या राग , मोह अशा भावनांवर  परिणाम होतात आणि मन स्थिर आणि शांत होते ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीसाठी अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. आत्मविश्वास प्रबळ असेल तर आपण आपले ध्येय सहज प्राप्त करू शकतो. 
           अशा प्रकारे ध्यानामुळे आपण आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत खूप सारे फरक अनभवू शकतो. आयुष्याचा खरा अर्थ काय? जगण्याचा खरा हेतू काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या ध्यानधारणेमुळे मिळवू शकतो . मनाची स्थिरता आणि एकाग्रता आपल्याला यामुळे मिळते. आजकालच्या तरुण पिढीसाठी मेडिटेशन हे खूप महत्त्वाचे आहे . बाहेरच्या स्पर्धेच्या जगात मनाची एकाग्रता वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. ध्यानाचा परिणाम हा क्षणिक नसून खूप दूरगामी आहे.

तर वरील ५ मुद्द्यांवरून आपल्याला ध्यानधारणा  किती महत्वाचे आहे ते कळालच असेल. तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

Post a Comment