शाळा पुन्हा बंद !!

मोबाईल मधून मुलं किती काय काय शिकणार?
फोनवर शिकवलेल कितपत मुलांना लक्षात राहणार?
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहेत का? 
परीक्षा देताना गूगलवर किंवा शाळेचे प्रोजेक्ट बनवताना पालकांवर अवलंबून असतात का? 
आता कुठे शाळा परत ऑफलाईन चालु होत होत्या तेवढयात आता शाळा पुन्हा बंद, आता मुलांच्या अभ्यासाचं  काय?


बऱ्याच प्रश्नांनी पालक तुम्ही पुन्हा भांभवून गेले आहात... आणि खूप गंभीर स्थिती निर्माण झाली आहे याची कल्पना आहे.
 
शाळा आता कुठे चालू झाल्या होत्या, मुलांचे जुने शेड्युल चालू झाले होते, ऑफलाईन परीक्षेच्या भीतीने मुले अभ्यासाला लागली होती. तितक्यात शाळा परत बंद झाल्या. पण पालक तुमच्या मनात बरेच प्रश्न पडले आहेत.
जसं कि 
आता मुलांच्या परीक्षेचं काय?
मुलं ऑनलाइन परीक्षा देऊन ऑफलाईन करियरसाठी तयार होतील का ? 

त्यात आता पुन्हा हातात फोन..?

फोन नको म्हणूनच शाळा सुरू करा हा पालकांचा हट्ट होता. आणि तो अगदीच योग्य असा होता...
शाळा सुरू करून पालकांचा हा हट्ट पूर्ण करण्यात आला. मात्र ह्या हट्टाला जास्त दिवस टिकता आल नाही... आणि पुन्हा शाळा बंद ही घोषणा झाली. पालक वर्ग पुन्हा घाबरून गेला आहे. फोन वापरून आरोग्य तर बिघडत आहेच, सोबतच अती फोनच्या वापरामुळे मुल सोशल मीडियाच्या अधीन जात आहेत. फोनवरील नवीन खेळ, इंस्टाग्राम, फेसबुक अश्या बऱ्याच जाळ्यामध्ये मुल अडकून जात आहेत...

शारीरिक अडचणी

ऑनलाईन शिक्षण पद्धत घेत असताना मुलांनी अजून पर्यंत शाळेतले स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जास्त पाहिल्या नाहीत. त्यामुळे मुलांच्या फिजिकल अक्टिविटिच्या सवयी फार कमी झाल्या आहेत. याचाच परिणाम मुलांच्या वागण्यावर आणि मुलांच्या विचार करण्याच्या शैलीवर सुद्धा होत आहे. आपण जेवढे शुद्ध वातावरणात किंवा ओपन ग्राउंडमध्ये खेळू तेवढाच आपला मेंदू ताजा राहतो. या सर्व गोष्टी होत नसल्याने इनडायरेक्टली मुलांच्या विचार करण्याच्या शैलीवर प्रभाव पडत आहे. उदाहरणार्थ जेव्हा आपण कबड्डीचा खेळ खेळत असतो तेव्हा समोरचा खेळाडू आपल्या पक्षात रेड करायला येतो तेव्हा त्याच्याकडे फक्त तीस सेकंद असतात त्या तीस सेकंदमध्ये एक तर त्याला पॉईंट घेऊन जायचं असतो किंवा तो आऊट होणार असतो ह्या दोनच शक्यता असतात. यासाठी मुलांना पटकन विचार करावा लागतो त्यामुळे त्यांचे माईंड ऍक्टिव्हेट होतो यामुळे मुलांची क्विक ऍक्शन कळून येते. या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मुलांच्या होत नसल्यामुळे मुलं कुठे तरी ह्या गोष्टींपासून दुरावत आहेत व त्यांच्या इफेक्ट त्यांच्या फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ या दोघांवरही होत आहे.

परीक्षेच्या भीतीला लॉकडाऊन

जवळपास तब्बल तीन वर्ष मुलं फक्त ऑनलाईन परिक्षा देत आहेत आणि परीक्षेची भीती काहीशी नष्ट होत आहे. मुलं चार भिंतीच्या आत राहून शिकत आहेत. हे शिकत असताना मुलं बऱ्याचशा गोष्टींकडे वळत असतात. कारण सहाजिकच आहे आपण एकाच जागी जास्त वेळ बसू शकत नाही. तसं करण्यासाठी एकतर खूप जास्त सय्यम लागतो सोबतच एकाग्रताही लागते. पण सातत्याने एकाच जागी बसणं हे मुलांना जमत नाही. त्यासाठी शाळा चालू करण्यात आल्या पण काही वेळातच शाळा बंद करण्यात आल्या. यामुळे मुलांची एकाग्रता आणि एकांत जागी बसण्याचा संयम या दोन्ही गोष्टींवर बराच परिणाम होत आहे. मुलं खूप चिडचिड करतात.

पालकहो तुम्हा सर्वांच्या अश्या बऱ्याचशा चिंता Versatile Educaare System च्या लक्षात आल्या आणि म्हणूनच
ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सोबतच उपाय घेवून येत आहे Versatile Educaare System तर्फे Ankuram - Yours Child's Self Discovery जो दर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता तुमचे प्रश्न व आपल्या तज्ञाचे उपाय अश्या पद्धतीने गेली एक वर्षे  विनामुल्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चालणारा हा कार्यक्रम आहे. जो तुम्ही येत्या शनिवारी नक्की बघू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच रजिस्ट्रेशन करा...


आणि हो तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खालील माध्यमातून संपर्क साधू शकता : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System

धन्यवाद!!

Comments

Post a Comment