प्रवास Reels पासून Stage पर्यंतचा...

नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो
सोशल मिडीयाचा वापर हा चांगला की वाईट यावर बोलू लागलो तर चर्चा बराच वेळ चालेल पण शेवटी कुठल्याही ठोस कारणावर येण जरा कठीणच आहे. पण या बाबतीत एक गोष्ट मात्र नक्कीच स्टार्ट टू एन्ड तूम्हा सर्वांना सुध्दा पटेल ते म्हणजे, अती तेथे माती. गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या की  नुकसान हे होणारच. असच काहीस मुलांच मोबाईल बाबत झालय. या ब्लॉग मध्ये आपण मुलांना काही अती महत्वाच्या, इंटरेस्टिंग वाटणाऱ्या कामाबद्दल बोलणार आहोत. ऐकायला थोड विचित्र वाटेल पण हीच सत्य परिस्थिती आहे. हल्ली मुले ईंस्टा वरती रिल्स (Reels) बनवण्यात बिझी झाले आहेत. त्यांना वाटते की रिल्स म्हणजे अभिनय. आणि लवकरच प्रसिद्ध होण्याचा मार्ग. पण तस नाही हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. चला तर मग जाणून घेऊया मुलांचा हा गैरसमज आणि त्यांची ही सवय त्यांच का आणि कसा वेळेचा दुरुपयोग करू शकतात. आणि यावर उपाय काय. 

१) मुलांशी बोला आणि त्यांचे या सर्व गोष्टींबाबत मनोगत जाणून घ्या. 
आतापर्यंत आपण ऐकून आहोत की, मुलांना पालकांनी दररोज थोडा जरी वेळ दिला तर लवकरच पालकांना हवे असलेले पॉझिटिव्ह चेंजेस दिसू लागतात. थोडा वेळ काढून मुलांशी हे बोलणे गरजेचे आहे. संपूर्ण संभाषणामध्ये त्यांचे reels बनवायला सुरुवात करण्याबाबतचे मनोगत जाणून घ्या. खरं तर त्यांना या काही ठराविक गोष्टी समजावून सांगा,
१. त्यांचा किती वेळ यावर त्यांना घालवावा लागतो? 
२. हे सर्व केल्यानंतर त्यांना याचा काय फायदा होतो? 
३. यामधून काय नवीन शिकायला मिळते? 
४. तुमच्या मुळे लोकांना वैचारिक किंवा सामाजिक फायदा होतो का? त्याचा कुठेही लॉंग लाइफ रिझल्ट आहे का? 
या प्रश्नांमध्येच त्यांच्या सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटीची उत्तर मिळतील. पालकांनी त्यांना हा अश्या पद्धतीची विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. मग, आणि मगच त्यांना मार्ग दिसू लागेल. 

२) त्यांच्या या सवयी त्यांच्या आयुष्यामध्ये काही फायदा करून देतात का? त्यांचा हा वेळ किती महत्वाचा आहे हे सांगा. 
मुलांचे याबाबतचे विचार ऐकून घेतल्यावर पालकांनी त्यांना शांतपणे पुढे काही गोष्टी समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. त्या म्हणजे त्यांना आत्ता मिळणारा वेळ त्यांना घडवणारा आहे. सत्कारणी लावला तर निश्चितच त्याचे सोने होईल. बऱ्याच मुलांना अभिनय करायला मिळतो असे वाटते म्हणून ते करतात पण reels मध्ये ज्याला ते अभिनय म्हणतात तो अभिनय नसून तो मिमिक्री सारखा प्रकार असतो. जर त्यांचा इंटरेस्ट खरच असेल तर तो त्यांना ओळखायला मदत करा. रिल्स बनवणे त्यांच्या आयुष्यात एंटरटेनमेंट सारखा भाग असावा. बाकी वेळ जर त्यांनी एखादी नविन गोष्ट शिकण्यात वेळ घालवला तर खऱ्या अर्थाने वेळ सत्कारणी लागला असे म्हणता येईल. अभिनयात जर त्यांचा रस असेल तर त्यांच्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे नाटक. मुलांना नाटक पाहायला न्या. खरंच ते मन लावून नाटक पाहतात की नाही याचे निरीक्षण करा. 

३) खरा अभिनय म्हणजे काय आणि नाटकाच्या पावित्र्याची ओळख करून द्या.
खरच जर त्यांचा इंटरेस्ट नाटकांमध्ये असला, तर त्यांना सगळयात आधी काही बालनाट्ये दाखवा. लहान मुले कसा अभिनय करतात, त्यांच चालण, बोलण, चेहऱ्यावरचे हावभाव, उभारण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्याला अभिनय म्हणतात. जेव्हा ते हे सगळं प्रत्यक्षात बघतील आणि स्वतःहून ठरवतील. तेव्हा त्यांना एक दिशा मिळेल. त्यांचा हा इंटरेस्ट त्यांना वेगळं नवीन काहीतरी शिकवून जाईल. आणि कॉन्फिडन्स वाढेल स्टेज डेरिंग येईल. असे अनेक फायदे आहेत. हे त्यांना दाखवून द्या. नाटक अभिनय या गोष्टी फक्त एंटरटेनमेंट पुरत्या लिमिटेड नाहीत. तर तुम्ही जर त्या बाबतीत करिअर ओरिएंटेड असाल तर तुम्हाला त्यातून नवीन दुसरे मार्ग देखील आहेत. याची जाणीव त्यांना करून द्या.  

जवळ जवळ बऱ्याच मुलांचे म्हणणे असते की त्यांना अभिनय आवडतो म्हणून रिल्स करतात. पण त्यांना यामधली रियालिटी आणि अभिनयातले अंतर पटवून द्या.

माझी खात्री आहे याने मुलांमध्ये बदल नक्कीच घडेल.  
जर नाटकाबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढच्या ब्लॉग मध्ये ती नक्कीच जाणून घ्या.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments