३ शक्तिशाली सवयी ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायलाच हव्यात!!


नमस्कार पालक मित्रांनो,

"आपण तसेच बनतो जे आपण वारंवार करतो." पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक आणि तत्त्वज्ञ विल ड्युरंट यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, चांगल्या सवयी हा अर्थपूर्ण जीवनाचा पाया आहे. जर का आपल्याला मुलांना यशस्वी झालेलं पाहायचं असेल तर याची सुरुवात त्यांना चांगल्या सवयी लावण्यापासून करायला हवी. म्हणूनच पालक आज आपण पाहणार आहोत अश्या ३ शक्तिशाली सवयी ज्या तुमच्या मुलांना शिकवायलाच हव्यात.

१) कृतज्ञतेची सवय - The Habit of Gratitude

आपल्याला ज्या काही वस्तू व गोष्टी मिळाल्या आहेत त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असण फार गरजेचं आहे. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय मुलांना लावणे फार महत्वाची आहे. 
आता ही सवय तुम्ही मुलांना कशी लावू शकता?
तर तुम्ही कौटुंबिक कृतज्ञता भांडे बनवू शकता आणि जेव्हा जेव्हा कुटुंबातील कोणताही व्यक्ती मोकळा असेल तेव्हा त्यावेळेस ज्यासाठी ते कृतज्ञ असतील ती एक गोष्ट लिहून त्या भांड्या मध्ये ठेवतील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अश्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करताना पाहून मुलांनाही हळू हळू ही सवय लागेल.

२) पैशाचे व्यवस्थापन करण्याची सवय - The Habit of Managing Money

पैसे कमविण्यासोबतच त्यांचा योग्य तो वापर कसा करावा? यासाठी मुलांना पैशांचे व्यवस्थापन करण्याची सवय लावणं आवश्यक आहे. जर आता पासूनच मुलांना पैशांचे व्यवस्थापन करण्याची सवय लावली तर मुलांकडून आपोआप पैसे बचत व्हायला सुरुवात होईल.
आता ही सवय तुम्ही मुलांना कशी लावू शकता?
तर तुम्ही तुमच्या मुलांना एखादी वस्तू खरेदी करताना बजेट कसे असावे हे शिकवू शकता.
मुलांसाठी सेव्हिंग जार बनवू शकता आणि त्यात रोज मुलांना पैसे टाकायला सांगू शकता.

३) पर्यावरणाचा आदर करण्याची सवय - The Habit of Respecting the Environment

निरोगी जीवनासाठी स्वच्छ वातावरण आवश्यक आहे: आपण आपल्या पर्यावरणाची जितकी काळजी घेऊ, आदर करू तितकेच पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत होईल. ज्यांचा आपल्या आरोग्यावर लाभदायक परिणाम होईल. म्हणून मुलांना पर्यावरणाचा आदर करण्याची सवय लावणं गरजेचं आहे.
आता ही सवय तुम्ही मुलांना कशी लावू शकता?
तर तुम्ही तुमच्या मुलांना बागकामात सामील करू शकता. त्यांना रोज रोपांना पाणी द्यायला सांगु शकता. त्यांची आवडती वनस्पती कोणती आणि का आहे ते त्यांना विचारू शकता. फळे आणि भाज्या खाताना निसर्गाचे आभार मानायला लावू शकता.

या ३ शक्तिशाली सवयी तुम्हाला नक्की कळल्या असतीलच आणि तुम्ही या सवयी तुमच्या मुलांना लावलाच याची मला खात्री आहे. पण पालक एक गोष्ट आपण नक्की लक्षात घ्यायला हवी की *तुम्ही मुलांना काय सांगता यापेक्षा जास्त तुम्ही मुलांसमोर कसे वागता* हे महत्वाचे आहे. कारण मुलं अगदी तंतोतंत तुमचं अनुकरण करत असतात. त्यामुळे तुम्हाला जर का या ३ सवयी तुमच्या मुलांमध्ये पाहायच्या असतील तर निश्चितच तुम्हाला देखील या ३ सवयी आधी स्वतः आत्मसात करणे अत्यंत गरजेचं आहे.

तर वरील ३ शक्तिशाली सवयींतून आपण आपल्या मुलांना स्वावलंबी बनण्यास मदत करू शकता. पण या व्यतिरिक्त अजुन बऱ्याच सवयींतून आपण आपल्या मुलांना घडवू शकतो. तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

  1. सुंदर लेख... अतीशय महत्वाच्या सवयी धन्यवाद 👌🙏💐

    ReplyDelete

Post a Comment