मुलांच्या समस्या सोडवण्याची कला अवगत करा ह्या ५ मार्गांनी !!


नमस्कार पालक मित्रांनो,
आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना, संकटाना सामोरे जावे लागते.. आणि ह्या अडचणी लहान मोठे सर्वांनाच पार कराव्या लागतात... पण प्रत्येक वेळी त्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं...

मुलांना कोणत्याही खेळात, घरी काही काम करताना, शाळेतील परीक्षेत किंवा काही प्रॉजेक्ट मध्ये अडचणी येतं असतात...आणि त्या अडचणी सोडवायला मुलांना थोड कठीण होत असते आणि प्रत्येक वेळी मुलं तुमची मदत घेत असतात.. पण ह्याच अडचणी तुमच्या मुलांनीच सोडवल्या तर? अनुभवातून आपण अडचणी कश्या सोडवायच्या ते शिकतो.. पण लहान मुलांना सतवणाऱ्या अडचणींना त्यांनी कसे सामोरे जावे ह्याचे कौशल्य आपण त्यांना अवगत करून दिले पाहिजे... तरच मोठे झाल्यावर मुलं स्वतः आपली कौशल्य वापरून त्या समस्या उत्तम रित्या सोडवू शकतात...

Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून असे लक्षात आले आहे की... मुलांची संपूर्ण वागणूक ही त्यांच्या सवयींवर आधारित असते.. चला तर मग जाणून घेऊयात ह्याच काही सवयींबद्दल

त्यामुळे आज आपण असे काही मार्ग पाहूया त्यातून मुलांचे समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित होईल...

1.वाचनाची आवड लावा...
समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पुस्तके... मुलांना वाचनाची आवड लावायची असेल तर त्यांना लहान लहान पुस्तके आणून द्या.. त्यांना गोष्टी वाचून दाखवा... पुस्तकातील कथेवर चर्चा करा... हळू हळू त्यांना पुस्तकाची आवड निर्माण होईल...
वाचनामुळे मुलांचे शब्दकौशल्य वाढेल...त्यांचा दृष्टीकोन बदलावा सुरुवात होईल... कोणत्याही परिस्थितून आपण कश्याप्रकारे बाहेर पडू शकता ह्यावर मुलं विचार करू लागतील...
आणि ह्या सर्वांचा मुलांना नक्कीच फायदा होईल

2.चुका करू द्या...
दुसरं खूप महत्त्वाचे म्हणजे मुलांना कोणतीही गोष्ट करताना चुका करू द्या...त्यांना त्यांना ओरडू नका तर चुका मधून कसं शिकता येईल त्यावर भर द्या... त्यांना काही कामे स्वतःहून करू द्या... त्यांचं काही चुकलंच तर त्यांना समजावून सांगा... त्यांना प्रोत्साहन ह्या...चुकातून माणूस शिकत असतो तसच मुलांना ही हळू हळू त्यांच्या चुकांमधून शिकायला मदत करा..

3.क्रिएटिव्ह विचार करायला प्रोत्साहन द्या..
मुलांना वेगवेगळ्या गेम्स मधून त्यांना विचार करण्यास भर टाका... गेम्स मध्ये तुम्ही बुद्धिबळ, लुडो, लॉजिकल गेम्स, कोडी असे गेम्स खेळू शकता... तसेच तुम्ही मुलांना विषय देऊन त्यावर चित्र काढण्यास सांगू शकता.. त्यातून ते क्रिएटिव्ह विचार करायला सुरुवात करतील आणि हळू हळू त्याची निर्णय क्षमता वाढायला सुरुवात होईल..

4. अपयशातून यश मिळवायला शिकवा...
मुलं एकदा चुकल्यावर पुन्हा त्या गोष्टी करायला घाबरतात किंवा ते मान्य करायला तयार होत नाहीत... त्यामुळे त्यांना अपयशातून कोणत्या गोष्टी शिकता येईल ते सांगा... एकदा आलेल्या अडचणीतून आपल्याला पुढच्या वेळी कसे बाहेर पडता येईल त्यावर मुलांसोबत चर्चा करा.. प्रत्येक समस्यावर उपाय असतात ते शोधायला मदत करा... मुलांना नक्कीच ह्याचा फायदा होईल.

5. प्लॅनिंग करायला शिकवा..
कोणतेही काम करायचे असेल तर त्याचे प्लॅनिंग करणं गरजेचं असतं... मुलांना त्याच्या शाळेचा अभ्यास, प्रोजेक्ट, दिवसभरात काय काय करणार त्याच प्लॅनिंग करायला शिकवा...त्याच्या सोबत तुम्हीही तुमच्या दिवसच नियोजन कसं करता ते सांगा... म्हणजे मुलांना येणाऱ्या अडचणी मुलं स्वतः सोडवू शकतात...

पालक हो, घरात काही समस्या असतील तर त्यावर संवाद साधा. आणि त्या संवादामध्ये मुलांना सहभागी करा.. त्याच्याकडून solution घ्या... त्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्या... त्यांना यांची मत मांडायला सांगा... ह्या सर्वाचा फायदा मुलांना त्यांची कौशल्य वाढवायला नक्कीच होईल...

असेच तुमच्या अथवा तुमच्या मुलांच्या विकासाबद्दल काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM






Comments