जीवनाची दोर !!!


नमस्कार 

आपल्या सगळ्यांसोबत हे नक्कीच झाले असणार,
लहान असताना आपल्याला बराच ठिकाणाहून बऱ्याच लोकांकडून काही गोष्टी ऐकायला मिळालेल्या असतात आणि त्याच गोष्टी केव्हा आपल्या मनावर खोलवर जातात हे आपल्याला देखील कळत नाही आणि त्याचा आपल्याला पुढील आयुष्यावर प्रभाव पडत असतो. आणि आपण त्या limiting Beliefs चा पुढे जाण्याचा किंवा मात करण्याचा प्रयत्न करतच नाही. उदाहरणार्थ, एक साधारण कुटुंबातील मुलगा मुलगी हे व्यवसाय करू शकत नाही फक्त आठ व दहा तासांची नोकरी करायची. 

व्यवसाय का करायचा नाही असे विचारले तर मग उत्तर काय , व्यवसायात कधी तुम्हाला नफा होईल तर कधी बऱ्याच वेळा तोटा होतो आणि ह्याच भीतीने आपण व्यवसायात वळत नाही आणि आपण ती आठ दहा तासांची तोटा न देणारी नोकरी करायला सुरुवात करतो. काही गोष्टी आपल्या मनावर फार प्रमाणात प्रभाव करत असतात.

 तुमचा अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यांचा लहानपणापासून तुमच्या मनावर प्रभाव आहे ज्या मुळे तुम्ही एखाद पाऊल उचलण्यास मागे फिरतात हे खाली कॉमेंट मध्ये कळवा.
एका सत्य कथेतून मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपले limiting Beliefs आपल्या वर किती प्रभाव पाडतात.
एक माणूस रस्त्याने चालत होता तेव्हा त्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या हत्तीनां पाहिलं.आणि तो माणूस विचार करू लागला. कारण त्याने पाहिलं की हत्तीचा पुढच्या पायांमध्ये दोर बांधलेली आहे. त्याला आश्चर्य वाटलं की हत्ती सारख्या मोठ्या जीवाला लोखंडाच्या साखळी ऐवजी एका छोट्याश्या दोरीने बांधून ठेवले आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हत्तीच्या मनामध्ये आलं तर ते कुठेही आणि केव्हाही जाऊ शकतो. पण ते हत्ती ते काही करत नव्हते. त्या माणसाला राहवेना, त्या माणसाने तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला विचारले हे हत्ती एवढे शांत का उभे आहेत आणि तेथून पळायचा प्रयत्नात का बर करत नाही आहेत. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले या हत्तींना लहानपणापासूनच दोरीने बांधून ठेवले होते. कारण लहान असल्यामुळे हत्ती मध्ये दोरी तोडण्याची शक्तीने नसते. हे हत्ती लहान असताना सारखा सारखा प्रयत्न करून सुद्धा ही दोरी तोडून न शकल्यामुळे त्यांचा यावर विश्वास बसला की ही दोरी आता काय आम्ही तोडू शकत नाही. आणि हत्ती मोठा होत असताना हा विश्वास अजून मजबूत होऊ लागला. आपलं बंधन आपण तोडू शकतो हे माहित असून देखील हे हत्ती असं करत नाही.
 या हत्ती सारखं आपल्यापैकी कितीतरी लोक फक्त त्यांना मिळालेल्या पहिल्या अपयशाने मानतात की आपल्याकडून कोणतेच काम होऊ शकत नाही. अशी मानसिकता ते मनामध्ये स्वतः बनवतात आणि आपलं संपूर्ण जीवन जगतात. म्हणून आपला हत्ती होवू न देता. ती दोर तोडून एक उंच भरारी घेतली पाहिजे.

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


Comments