कथा एका ध्येय वेड्याची.... करोली ट्याकस्


मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनोंमे जान होती है, पंखो से कुछ नही होता सहाब होसलो से उडान होती है l

मला जमणार नाही.. माझे हाथ नीट नाहीत... , मी हे कसे करू.., जर मला हे मिळालं असतं तर मी जिंकलो असतो..,

येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे , प्रत्येक दिवसासाठी आपण एक नवीन कारणासोबत उभे असतो. मला जमणार नाही, वेळ नाही, अस बरच काही म्हणत ,...
कारणाचे पुस्तक घेऊन आपण नेहमी तयार असतो. 

मित्रांनो, वर्सटाईल ही एक अशी संस्था आहे जी प्रत्येक युवक युवतीला त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून तत्पर आहे.

मात्र मंडळी वर्सटाईल ब्लॉगर वाचकांसाठी काहीतरी नवीन जे वाचून सगळ्यांचं रक्‍त सळसळे, आपण सगळे ही ध्येय वेडे व्हाल आणि एक उडान स्वप्नांसाठी नक्कीच द्याल. म्हणून शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की वाचा.

नमस्कार
ही कथा खरी असून कथेमधील हिरो काल्पनिक नसून खऱ्या आयुष्यातील एक हिरो आहे.

चला तर मग सुरुवात करुया आपल्या कथेला... 

हंग्री या शहरातील ही कथा आहे. 
सैनिकात असलेले विश्वा मध्ये प्रसिद्ध शूटर म्हणून ख्याती असलेले,म्हणजेच कथेचे हिरो करोली टाकस.
हंग्री शहराच नाव मोठं व्हावं, ह्यासाठी त्यांनी त्यांच्या कलेचा उपयोग करून, १९३८ मध्ये होणाऱ्या टोकोयो नॅशनल कॉम्पिटिशन साठी राईट हॅन्ड शूटर मध्ये आपल्या शहरच नाव मोठं व्हावं म्हणून भाग घेतला. आणि त्या साठी सराव सुरू केला... आणि हाच सराव सुरू असताना अचानक एक दुर्दैवी घटना घडली. करोली ह्यांचा उजव्या हातात एक बॉम्ब फुटला आणि कारोली ह्याचा उजवा हात पूर्ण शरीरापासून वेगळा होऊन जमनी वर पडला.... 
महत्वाची बाब ही होती की ज्या हाताने शूट करायचे होते त्याच हातचे तुकडे झाले होते....

आता कसलं नॅशनल, कसलं गोल्ड मेडल....

ही बातमी हंग्री शहरात जाताच पूर्ण शहर निराश झाल, ते शहरच काय तर आपण ही निराश च झालो असतो...

संपूर्ण शहर निराश असताना एक व्यक्ती मात्र आशेच किरण घेवून उभा होता.... ते म्हणजे स्वतः करोलि 
एक हात गेला तर काय झाले दुसऱ्या हाताचा काय उपयोग ...
हार मामो नहीं तो कोशिश बेकार नहीं होती 
कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती....

ह्या वाक्याला म्हणत कारोलि ह्यांनी आपल्या सोबत असलेल्या डाव्या हाताने शूटर सरावाची ची सुरुवात केली...
बऱ्याच अडचणी ना तोंड द्यावं लागतं होत, मात्र हार मानायची नाही हे ब्रीद वाक्य ते केव्हाच विसरले नाही...

आणि १९३९ मध्ये नॅशनल चॅम्पयनशिपमध्ये ज्या वेळेस करोली गेले त्या वेळेस उपस्थित सगळ्यांना हेच वाटू लागलं होत की करोली हे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्या साठी आले आहेत....
मात्र ज्या वेळेस करोली ह्यांना स्पर्धक म्हणून तेथील सर्व माणसांनी पाहिलं ते बघून अख्खं मैदान हैरान झाले होते.....

आणि करोली ह्यांनी सगळ्या वर मात करत ते मेडल आपल्या नावी केलं.आणि आता पूर्ण शहरात आशेच आणि आनंदच वातावरण तयार झाले होते.
आता मात्र वाट एकाच गोष्टीची होती ती म्हणजे 
एका वर्षानंतर असलेल्या १९४० चा ऑलंपिकची...

आणि करोली ह्यांची ह्या ऑलंपिक मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची तयारी सुरू केली होती.
मात्र विश्व युद्धामुळे १९४० च ऑलंपिक रद्द करण्यात आल, आणि संपूर्ण शहराला पुन्हा निराशाच हाती आली.

आपण ह्या जागी असतो तर आपण ही हेच केलं असतं. आपल्याकडे आपला ना बेस्ट हॅन्ड होता ना आपल्याला नशीब साथ देत होतं, अशी वाक्य म्हणून आपण तिथेच हार मानून शांत राहिलो असतो. मात्र करोली ह्यांनी असं न करता पुढील चार वर्षानंतर असलेलं १९४४ ऑलंपिक साठी तयारी सुरू केली. ह्या ऑलंपिक साठी चॅम्पियन म्हणून गोल्ड मेडल जिंकण्याची संपूर्ण तयारी सुरु केली होती. मात्र पुन्हा एकदा विश्व युद्धामुळे १९४४ ऑलंपिक रद्द करण्यात आल. आता तर संपूर्ण शहराने हार मानली होती. कारण करोली ह्यांचा वयात वाढ होत असल्यामुळे आता मात्र हंग्री या शहराला गोल्ड मेडल मिळणं अशक्य झालं होतं, हे या शहराने ठरवलं होतं. मात्र करोली ह्यांनी अजूनही हार मानली नव्हती. त्यांच्या या जिद्दीला आजही संपूर्ण विश्व सलाम करत आहे.
 १९४८ ह्या ऑलंपिक साठी करोली यांनी परत तयारी सुरू केली.
स्पर्धेत करोली पेक्षा तरुण मंडळी जास्त होती.
करोली हे वयाने असल्यामुळे इतर सगळ्यांना हेच वाटत होतं की करोली काय हे चॅम्पियन होणार आहेत.
मात्र सगळ्याचा ह्या वाक्यांला खोटं ठरवून करोली ह्यांनी आपल्या बेस्ट हॅन्ड नसलेल्या हाताने १९४८ ऑलंपिक गोल्ड मेडल हंग्री शहराला आणून दिलं होतं.
तोच तो जजबा, तीच जिद्द आणि तेच ध्येय वेडे.
म्हणून म्हटलं जातं वेडे इतिहास घडवतात आणि याच वाक्याला खरं ठरवत करोली ह्यांनी आजही त्यांचे नाव विश्वाच्या इतिहासात कोरल आहे. 
म्हणूनच कोणतेही कारण न देता आपल्या ध्येयासाठी काम करणे हे ह्या कथेतून आपण शिकलो.

तुमचं ध्येय ठरल आहे का...?
आयुष्यात काय करायचं आहे हे तुमचं ठरल आहे का ..?
जर ध्येय ठरलं आहे तर तुम्ही ध्येय वेडे आहात का..?

ह्या तिन्ही प्रश्नानं पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नाही असल्यास लगेच च खाली संपर्ककाशी संवाद साधा.

संपर्क क्र. - 8655351999

Facebook Page : Versatile Educaare System

Facebook Group : PRAGYAKULAM

YouTube channel : Versatile Educaare System

धन्यवाद.

Comments