३ सवयी ज्यामुळे मुलांचा संपूर्ण दिनक्रम बिघडला आहे !!!

नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो.
हल्ली आपण मुलांमध्ये  बऱ्याच गोष्टी बदललेल्या पाहतो.
त्यांच्यामध्ये सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापरेंत, आपण सांगितलेली कोणतीच गोष्ट ते आता आजिबात ऐकत  नाहीत. आणि चुकिच्या पध्दतीने त्यांनी त्यांची लाइफस्टाइल बदलली आहे.  पण अशा नक्की कोणत्या पद्धतीने आणि अस होण्यामागे काय कारणे आहेत हे सुद्धा तुम्ही या  ब्लॉग मधून जाणून घ्याल. आणि मला खात्री आहे  तुमचा हा मुलांच्या बदललेल्या लाईफस्टाईल बद्दल चा प्रॉब्लेम नक्की क्लियर होईल.

Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून असे लक्षात आले आहे की...  मुलांची संपूर्ण वागणूक ही त्यांच्या सवयींवर आधारित असतात.. चला तर मग जाणून घेऊयात ह्याच काही सवयींबद्दल


१) झोपण्याची आणि उठण्याची वेळ कॉन्स्टंट नाही:-
मुलं ठराविक वेळेत झोपत नाही. रात्री बराच वेळ आपण पाहिलं असेल त्यांना जास्त वेळ ऑनलाईन राहण्याची सवय लागली आहे. उशीर पर्यंत त्यांना काही ना काही तरी पहात राहायला आवडत.  उशिरा झोपण्याने सकाळी लवकर उठणे मुश्कील होते. आता  लवकर उठलो नाही तर  पूर्ण  दिवसात आणि कामांमध्ये ऍक्टिव्हनेस राहत नाही. ज्या वयात मुलांनी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह राहून अभ्यासासोबतच एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्ह व्हायला हवे, पण ते तस न करता अख्खा दिवस टंगळमंगळ करत घालवतात. याला कारण वेळेत न झोपण्याची किंवा उठण्याची  सवय जास्त जबाबदार आहे. शाळा ऑफलाइन असताना मोबाईलशी कमी संपर्क असायचा, दिवसभर ती कंटाळून लवकर झोपायची. पण आता यावर पालकांनी कंट्रोल आणायला हवा. त्यांना लवकर  झोपण्याची आणि उठण्याची सवय लावली पाहीजे.  मुलांना मोबाईल मधील उपयोग नसणारे किंवा  जास्त वेळ वाया घालवतात अशा ऑपसना (appsना) डिलीट केले पाहिजे.  असं केल्याने त्यांचा मोबाईलचा वापर निश्चितच कमी होईल. त्याऐवजी मोबाईलमध्ये मेमरी टेक्निक किंवा ब्रेन डेव्हलपमेंट गेम्स असावेत. मुलांच्या या उशिरा झोपण्याच्या कारण  मागे फक्त मोबाईलच कारणीभूत नसून त्यांचा दिनक्रम सुद्धा आहे. जर त्यांनी दिवसभरात काहीच प्रॉडक्टिव किंवा त्यांच्या आवडीचे काम केले नाही किंवा दिवसभराचा थकवा जाणवेल अशी कामे केलीच नाहीत तर त्यांना रात्री लवकर झोप येणार नाही. हे त्यांना समजावून सांगणं महत्त्वाचा आहे. सकाळी लवकर उठून काय करायचे?  असं मुलांच म्हणन असतं, सकाळी उठून व्यायाम करणे  मेडिटेशन करणे या सवयी लावायला हव्यात.
त्यासाठी त्यांना या गोष्टींचे फायदे समजून  सांगायला हवेत. व्यायामाने अॅक्टिवेनेस वाढतो आणि मेडिटेशने एकाग्रता वाढते,  मन शांत राहतं, आत्मविश्वास वाढतो, राग कमी होतो इत्यादी. त्यांना  प्रत्येक  सवाई मागचे कारण आणि कोणत्या बरोबर, चुकीच्या त्याचे फायदे काय हे सांगितले पाहिजे. 

२) मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नाहीत :-
 काही मुलं जेवणाच्या बाबतीत कंटाळा करतात. एक तर त्यांना आवडीची भाजी हवी असते किंवा त्यांना फास्ट फूड, जंक फूड जास्त आवडतं. बऱ्याचदा मुलं खेळण्याच्या किंवा मोबाईलच्या अतिवापरामध्ये  जेवण्याची वेळच विसरून जातात.किंवा मग उशिरा जेवतात. मुलांना पौष्टिक आहार पेक्षा जंकफूड किंवा बेकरी प्रोडक्स जास्त आवडू लागली आहेत. ते बिनधास्त वेळीअवेळी बेकरी प्रॉडक्ट खातात. दररोजच्या पोळी भाजी, भाकरी या जेवणामधून जीवनसत्त्व मिळते त्याची त्यांना गोडी वाटत नाही. जिभेचे चोचले पुरवणे हल्ली त्यांना जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळे पदार्थ खाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते खाण्याआधी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावरती अपलोड करणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते. काही मुलांमध्ये यावरून कॉम्पिटिशन असते. नवीन काहीतरी ट्राय करणं यात काहीच गैर नाही पण अपलोड करणं किंवा त्यावरून   थोड्याफार लाईक्स साठी स्पर्धा ठेवण एकमेकांवरती त्यावरून ईर्ष्या करण चुकीचे आहे. मुलांच्या अशा सवयी थांबवणे खूप कठीण आहे. या गोष्टींसाठी सुद्धा सोशल मीडियाचा अतिवापर आणि  चुकीच्या गोष्टींमध्ये अति इंट्रेस्ट म्हणजेच अशी स्पर्धा ठेवणे,   दररोज पोळी भाजी खाण म्हणजे कमी स्टेटसच वाटणं,  फॅमीली सोबत एकत्र न जेवण अशी हल्लीच्या मुलांची लाईफस्टाईल आहे. याला कारण  त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन,  सोशल मीडियाचा नको असा इफेक्ट आणि फॅमिली सोबतची अटॅचमेंट कमी असण या गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हणू शकतो.

३) मुलांची खेळण्याची सवय आणि ऑदर ॲक्टिविटी चा बॅलन्स :
  खेळण्याबद्दल म्हणाला तर बऱ्याच मुलांची आवड हल्ली व्हिडिओ गेम्स झाली आहे. त्यांना खेळ म्हणजे व्हिडिओ गेम्स हेच एक ऑप्शन दिसू लागला आहे. मैदानी खेळ त्यांना  नावडते झाले आहेत.  बरीच मुलं दिवस-रात्र ते खेळत बसतात. त्यांना खेळल्या शिवाय करमत नाही. टीव्ही सुद्धा त्या गेम समोर त्यांना नकोसा असतो. आणि ऑदर ऍक्टिव्हिटीज बद्दल म्हणाल तर ड्रॉईंग,  स्विमिंग, डान्सिंग, रायटिंग, रीडिंग, सायकलिंग अशा प्रकारचा कोणताच इंटरेस्ट त्यांच्यामध्ये हल्ली आढळत नाही. 
त्यांचं विश्व फक्त फोटो काढणे, गेम्स खेळणे किंवा फास्ट फूड या मध्येच लिमिटेड राहिला आहे. बरीचशी मुलं त्यांच्या पालकांशी सुद्धा खूप कमी संवाद साधताना आपण बघतो. त्यामुळे हल्लीच्या मुलांची लाईफस्टाईल प्रचंड विचित्र पद्धतीची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 

सध्या मुलांना व्हिडिओ गेम्स, फास्टफूड किंवा लाईक्स
 मिळवणे या विश्वातून बाहेर काढणे प्रचंड  महत्वाचे पण  अवघड देखील आहे. टेक्नॉलॉजी त्यांना समजायला सोपी जाते. काही गोष्टी जमू लागल्यावर आता त्यांना बरंच येतय असा त्यांचा समज  निर्माण  होण थोडं सहाजिकच आहे. पण त्यांचा हा गैरसमज पालकांनीच मोडायला हवा. त्यांनी या वयात कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा पण तरीही ते कोणत्या पद्धतीने कसल्या विचारात रमत आहेत हे त्यांना समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या स्वभावात हा असा बदल होणे सहाजिक होते कारण, मुलांना सारखेच आनंदी राहायचे असते हसत-खेळत खूष राहणं त्यांना आवडतं.  कुठल्यातरी गोष्टीचा टेन्शन घेणे,  विचार करत  राहणं त्यांच्या स्वभावात नसत.  ते कायम आनंदाच्या किंवा एक्साईटमेंट किंवा ॲडव्हेंचरस गोष्टींच्या शोधात असतात.  
आणि या गोष्टींमध्ये त्यांना ते मिळतंय असं वाटू लागतं. म्हणून ते अशा गोष्टींकडे जास्त लवकर   ऑट्रॅाक्ट  होतात.
त्यांना पावलोपावली हे समजून दिलं पाहिजे की प्रायोरिटी म्हणजे काय. आणि कोणत्या गोष्टींना प्रॉपर्टी दिल्याने काय आणि कसे घडते. त्यांच्यासाठी जरी ती मज्जा असली तरी त्याच्या अतिरेकाने हीच मजा सजा होऊ शकते. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज,  करियर, स्टडी या गोष्टींच आयुष्यात काय इम्पॉर्टन्स आहे हे पटवून द्यायला हवे. तेव्हाच आणि तेव्हाच मुलांना  त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल. पण आता तुम्ही म्हणाल असं बोलून, समजावून सगळं लगेच मार्गाला लागेलच असं सांगता येत नाही. त्यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत पण ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघू. ज्यामध्ये मुलांना शिस्त लावण्याची क्रिया तुमच्यासाठी सुद्धा सजा नसून मजा असेल आणि हसत खेळत तुम्ही तुमचा हा प्रॉब्लेम सॉल करू शकाल. मुलांना सुद्धा तुम्ही लावणारी प्रत्येक शिस्त, वळण, सवय त्यांच्यासाठी योग्य आहे आणि स्वतःमध्ये त्यांनी हा बदल करायला काहीच हरकत नाही असं त्यांना नक्कीच वाटू लागेल. आणि ते मनापासून  बदलायचा प्रयत्न  नक्की करतील.
तुमच्या या प्रश्नांच्या सोप्या उत्तरान सोबत पुढच्या ब्लॉक मध्ये नक्कीच भेटू. धन्यवाद.

Comments