उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी आवश्यक तीन पायऱ्या !!!

समुहासमोर निडरपणे बोलता येणं हे एक कौशल्य आहे, जे प्रत्येकालाच जमत नाही. एक कुशल वक्ता असणं, समुहासमोर निडरपणे बोलता येणं.. ह्या मागचं महत्व अनेक जणांना पटत नाही. 


       Rat race मध्ये धावत जाणारे आपण, बऱ्याचदा अनेक कला, कौशल्याचे महत्व विसरून जात आहोत. परंतु भूतकाळात जर डोकावून पाहायला गेलो तर लक्षात येईल की आपले बहुतांश नेते हे उत्तम वक्ता होते. त्यांच्या भाषणाचा लोकांच्या हृदयावर थेट परिणाम होत असे. जो अजुनही लोकांच्या बोलण्यात आढळून येतो.
       हल्ली आजूबाजूला पाहायला गेलो तर... दर दिवशी एक नवं पब्लिक स्पिकिंग क्लास डोळ्यासमोर दिसू लागतं.. भरमसाठ फी भरून सुद्धा बऱ्याच लोकांना हवा तो रिझल्ट मिळत नाही.. मग अशा वेळेस उत्तम संभाषण कौशल्य शिकण्यासाठी नेमके काय करायला हवे ??

Versatile Educaare System ही Organisation जी गेली १८ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १८ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून असे लक्षात आले आहे की... कोणत्याही माणसाने जर नियमित प्रयत्न केले आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवले तर त्याची मोठ्यातली मोठी भीती जाऊन तो निर्भिड पने स्टेज वर व्यक्त होऊ शकतो आणि हवे असलेले कोणतेही रिझल्ट मिळवू शकतो.

१. Knowledge is power : 
वकृत्व किंवा भाषण करताना तुम्ही तुमचा विषय आणि त्याचा आशय आधी स्वतः समजून घ्यायला हवा. मग विषयाचे सखोल ज्ञान तुम्ही आत्मसात करायला हवे.. तरच तुमच्या बोलण्यातून ते तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला कोणते मुद्दे मांडायचे आहेत, मत मांडायचे आहे हे आधी लिहून घ्या.. आणि मग त्यावर परिपूर्ण माहिती मिळवून भाषणाची तयारी करा.

२. Practice makes perfect :
  प्रत्यक्ष बोलण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र संपूर्ण भाषण जशाच तसे वाचून काढू नये. याउलट त्यापूर्वीच भाषणाची किंवा वकृत्वाची पुरेपूर practice करावी. सोबतच बोलताना मुद्दे लक्षात रहावेत म्हणून एका छोट्या कागदावर मुख्य मुद्दे लिहून काढावेत. अशा छोट्या कागदाला क्यू कार्ड असे म्हंटले जाते. भाषण करताना नेहमीच असे क्यू कार्ड प्रत्येक वक्त्याने सोबत ठेवायला हवेत.

३. Personality Say's Alot : 
 आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपलं भाषण आपला ठसा उमटवून जातं. आपल्यात जे नाही, ते उगाचच छाप पाडण्यासाठी करू नये. उदा. भाषणात विनोद करणे सर्वांना जमत नाही, त्यामुळे ‘जोक’ मारणं हा प्रकार एकदम ‘फुस्स’ होऊन जाऊ शकतो. किंवा भाषणात मोठ्यांचे ‘कोट’ वापरणे, हेही सर्वाना जमेलच असं नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं बोलावं.

वकृत्व किंवा उत्कृष्ट रित्या भाषण करणे प्रत्येकालाच जमत नसले तरीही जिद्दीने आणि अफाट अभ्यासाने हे कलागुण कोणीही आत्मसात करूच शकते हे नक्की !!

त्यामुळे मित्रांनो Public Speaking, Communication Skills, Stage appearance, Content Writing आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि सध्या चर्चेत असलेल्या स्किल्स बद्दल जाणून घेण्यासाठी किंवा त्या आत्मसात करण्यासाठी "Versatile Educaare System" च्या Blogger ला फॉलो करा. आणि स्वतः च्या सोनेरी भविष्याकडे एक पाऊल उचला...!!

त्याचसोबत तुमच्या मुलांनी सुद्धा अशा अनेक कला शिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर दर शनिवारी होणारे आपले अंकुरम चे सेशन नक्की पहा.. 

असेच तुमच्या अथवा तुमच्या मुलांच्या विकासाबद्दल काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



Comments