५ सवयी ज्या मुलांचा वेळ प्रॉडक्टिव घालवण्यात मदत करतील !!

नमस्कार मित्रांनो,
मैदानी खेळ, ग्रुप activities, फॅमिली टाइम ह्या सर्वाची जागा आता ऑनलाईन क्लासेस, मोबाईल फोन वरील गेम्स, टीव्ही, व्हिडिओ गेम्स ह्यांनी घेतलीय...आणि त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे... त्यामुळे मुलांच्या वागण्यावर, बोलण्यावर होणार परिणाम हा नक्कीच तुम्हाला दिसून येत असेल...

तुमच्यापैकी खूप पालकांना असे वाटत, की मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करणे शक्य नाहीये... कारण आता मोबाईल शिवाय आपली काही काम होतच नाहीत आणि त्यात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल हा लागतोच... मग ह्या मोबाईल पासून लांब मुलांना कसं ठेवावं?

पालक हो, तुम्ही पाहिलं असेलच की, आपण लहान मुलांना मोबाईल मधलं काहीच शिकवत नाही तरीही त्यांना सर्वच गोष्टी माहीत असतात आणि ते तुमच्यापेक्षा ही उत्तम रीतेन वेगवेगळे device चालवत असतात...आणि ह्यामुळे मुलांना अशा device पासून लांब ठेवणं थोड कठीण असते... 
पण एक पालक म्हणून तुम्ही नेहमीच मुलांना वाईट सवयी व कोणत्या गोष्टीचं व्यसन लागणार नाही ना ह्या चिंतेत असता..

Versatile Educaare System ही organization गेली 17 वर्ष मुलांच्या आणि पालकांच्या समस्यावर त्यांना मार्गदर्शन करत आहे... जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा.. ह्याच १७ वर्षांच्या अनुभवातून आज आपण असे काही सोपे उपाय पाहणार आहोत.. त्यामुळे मुलांचं मोबाईलचं व्यसन हे नक्कीच दूर होऊ शकत...

1. बाहेरील ॲक्टिविटी साठी प्रोहसाना द्या...
ह्या ऑनलाईन च्या जगात मुलांना मैदानी खेळ खेळायला शक्य होत नाहीय.. किंवा पालक हे भीती मुळे मुलांना बाहेर पाठवत नाहीत... आणि ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे मुलांचं वाढता स्क्रीन टाइम... त्यामुळे मुलांना खेळायला बाहेर पाठवा, किंवा बागकाम, झाडांना पाणी देणे, पाळीव प्राण्यांबरोबर फिरणे, गार्डन मध्ये फिरणे, swimming, dance class इ साठी पाठवा किंवा तुम्ही त्यांना घेऊन जा.. त्यामुळे थोडा वेळ तरी मुले स्क्रीन टाइम पासून लांब राहतील व त्यांना त्याचा विसर पडेल...

2. मुलांसोबत दिवसातून काही वेळ घालवणे...
मुलांचे कोणतेही व्यसन घालवण्याचा उत्तम उपाय म्हणजे मुलांन सोबत quality time घालवणे... दिवसातून काही वेळ तरी तुम्ही मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवला पाहिजे.. त्या वेळात तुम्ही मुलांसोबत काही शेअरिंग करू शकता.. इंटरेस्टिंग गेम्स खेळू शकता... घरातील काही विषयावर चर्चा करू शकता.. तुमचं आणि मुलांचं नात घट्ट होईल अश्या activity करू शकता...

3.मुलांसमोर मोबाईल चा वापर कमी करा...
पालक हो, मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्या समोर मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे... मुलांचे पहिले रोल मॉडेल हे त्यांचे पालक असतात... म्हणूनच तुम्ही ज्या गोष्टी मुलांसमोर जास्त करणार त्याच गोष्टी मुलं शिकत रहाणार.. त्यामुळे मोबाईलचा वापर हा कमी किंवा लिमिटेड टाइम साठी करा.. व मुलांना ही हीच सवय लावा..

4.पासवर्ड प्रोटेक्शन
तुमचा मोबाईल किंवा मुलांचा वेगळा मोबाईल असेल तर तो पासवर्ड ने प्रोटेक्ट हवा... मोबाईल मध्ये मुलं कोणता गेम्स खेळतात किंवा कोणत्या site वर जातात ह्यावर तुम्ही लक्ष ठेवून त्यानुसार त्या साईट lock करून ठेवाव्या... मोबाईल मध्ये AppLock सारखे ऍप घेऊन त्यात ठरावीक वेळे साठी जास्त वापरात आणलेले ऍप lock करून ठेवू शकता...

5. रोजचे वेळापत्रक बनवून ठेवणे...
मुलांना नाही हा शब्द ऐकायला आवडत नाही किंवा आपण त्यांना कोणत्याही गोष्टी साठी नाही बोललो की त्यांची चिडचिड वाढत जाते.. त्यामुळे त्यांचं दिवसांच वेळापत्रक बनवणे हा उत्तम उपाय आहे...त्यामध्ये अभ्यासाचा वेळ, खेळण्याची वेळ, टीव्ही मोबाईल बघण्याचा वेळ, no mobile time असा एक वेळ हा फिक्स असावा..जेणेकरून मुलं बाकीच्या वेळी मोबाईल मागणार नाही...

हे उपाय तुम्ही करून पाहिलेत तर नक्कीच तुम्ही मुलांचा मोबाईल टाइम कमी करू शकता... आणि मुलांना भविष्यात जाणवणाऱ्या समस्यावर मात करू शकता...

असेच तुमच्या अथवा तुमच्या मुलांच्या विकासाबद्दल काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM






Comments