निरोगी राहण्यासाठी ५ टिप्स !!

नमस्कार पालक मित्रांनो,
ह्या धावपळीच्या जीवनात कुटुंब, ऑफीस, सामाजिक जीवन सांभाळताना तुम्हाला दिवसाचे २४ तास ही कमी पडत आहेत.. बरोबर ना? आणि त्यात स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे किंवा स्वतःची काळजी घेणे ह्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे... तुमची दिवसाची कामे, महिन्याचे टार्गेट, घरच्यांची काळजी घेणे हे सर्व तुम्ही वेळेत पूर्ण करता पण ह्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला वेळच मिळत नाहीत... आणि ह्या सर्व ताणतणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.. पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप तेवढेच गरजेचे आहे...


Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून सामोरे आलेले पुढचे ५ मुद्दे आपण पाहुयात.

तर आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या व्यस्त जीवनात करायच्या आहेत ते ही तुमचा जास्त वेळ न घालवता....

१.  शांत झोप

व्यस्त जीवनामध्ये आपण एखादी गोष्टी कमी करत असू तर ती म्हणजे झोप... आणि हेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते... पण जर तुम्हाला २४ तास active आणि तणावमुक्त राहायचे असेल तर ७-८ तास शांत झोप गरजेची आहे.. अपुऱ्या झोपे मुळे तुम्हाला ताण, लठ्ठपणा, स्ट्रोक, नैराश्य, मूत्रपिंड रोग आणि हृदयरोग असे आजार होऊ शकतात.. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळापत्रकात झोपेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे...

२. पाणी 

पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या कामाची गती ही कमी होऊ शकते.. पण काही वेळा आपण बिझी schedule मध्ये पाणी पिणे विसरून जातो... किंवा आपल्याला काम करताना उठायला कंटाळा येतो... ह्यावर एक उपाय म्हणजे तुम्ही पाण्याची बॉटल ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्हाला लगेच दिसेल अश्या ठिकाणी भरून ठेवा... आणि दर एक तासांनी पाणी पित रहा... जेणेकरून तुम्ही पूर्ण दिवस active राहाल...

३.स्वतःसाठी एक मिनिट द्या...

 दिवसातून थोडा वेळ तरी तुम्हाला स्वतःसाठी काढणे गरजेचं असते.. पण काहीवेळा स्वतःसाठी १०-१५ मिनिट काढणं तुम्हाला कठीण वाटू लागतं... मग अशा वेळी तुम्ही स्वतःसाठी फक्त १ मिनिट काढा.. ह्या एका मिनिटात तुम्ही डोळे बंद करून शांत बसा, मोबाईल लॅपटॉप ह्या गोष्टी पासून लांब रहा... बघा नक्कीच त्या एका मिनिटानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल व तुम्ही उत्तम रित्या लक्ष केंद्रित करू शकता..

४. तुमच्या आईला किंवा जवळच्या व्यक्तीला कॉल करा...

जर तुम्हाला कामाच खूप pressure असेल आणि अशा वेळी काम कसे पूर्ण करावं हे कळत नसेल तर ह्या वेळी तुम्ही तुमच्या आईला किंवा जवळच्या व्यक्तीला अगदी २ मिनिटांसाठी कॉल करा.. ह्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल... आणि तुम्ही तुमचे काम योग्य रित्या करू शकता...

५. मॉर्निंग रूटिंग
बिझी schedule मध्ये तुम्हाला उत्साही राहण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे मॉर्निंग रूटींग.. ह्यामध्ये तुम्हाला सकाळी फक्त १०-१५ मिनिट काढून exercise, walking, meditation, book reading ह्या सारख्या गोष्टी करू शकता... ह्यामुळे तुमचा ताण कमी होईल, तुमचा सेल्फ awareness, तुमचा focus, तुमची कार्य क्षमता वाढण्यासाठी हे उपयोगी ठरेल... 

तसेच पौष्टिक आहार घेणे, जास्त थंड पेय न पिणे, आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जाणे, तुमचे छंद जोपासणे हे तुम्ही healthy राहण्यासाठी करू शकता... 
आणि हे सर्व उत्तमरीत्या करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील reminder चा वापर करू शकता... त्यामध्ये तुम्ही पाणी पिण्याची वेळ, जेवणाची वेळ, ब्रेक घेण्याची वेळ इ. सर्व सेट करून ते त्याच वेळी करू शकता..
ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि बिझी schedule मध्ये तुम्ही निरोगी राहू शकता...

असेच तुमच्या अथवा तुमच्या मुलांच्या विकासाबद्दल काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM





Comments