चला घडवूया "तरुण" भारत!!

चला घडवूया "तरुण" भारत!!



नमस्कार,

तुम्हा सर्वांना माहीत असेलच की जागतिक स्तरावर स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस १२ जानेवारी हा ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन २०१५ च्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतात आहे. आता भारताची अर्धी लोकसंख्या ही २५ वर्षाखालील आहे. अर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवकांच्या कामगिरीवर ठरेल.


अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे, असे वाटते. पण खर पाहिलं तर तारुण्याचा वयाशी किंवा परिस्थितीशी संबंध नसून तो मनाशी असतो. तर मग मला सांगा तुमच्या मते हा "आदर्श युवक" नक्की कोण असेल?
तर ज्याच्या चेहेऱ्यावर तेज, देहामध्ये शक्ती, नेहमीच मनात उत्साह, विवेक बुद्धी, हृदयामध्ये करुणा, इंद्रियांवर संयम, प्रबळ इच्छाशक्ती, धाडसी, सिंहासारखी निर्भयता, सेवेसाठी तत्परता आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मातृभुमीवर प्रेम, तोच "आदर्श युवक" आहे, अस स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं आहे. म्हणूनच ज्या देशाचा युवक आदर्श असेल तो देश देखील आदर्श व विकसित बनेल.

तुम्हाला माहित आहेच की आपल्या भारतात युवकांची संख्या जास्त आहे, पण आज अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की - आपली ही तरुण पिढी योग्य मार्गावर आहे का? त्यांना त्यांचे ध्येय माहीत आहेत का? ही तरुण पिढी आपल्या भारत देशाला विकसित करेल का? या तरुण पिढीवर असे प्रश्न का उभे राहत आहेत याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा नाही का...? 

आजही चांगलं काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आपल्या भारतीय तरुण पिढीत आहे. पण कमतरता आहे ती योग्य मार्गदर्शनाची, त्यांना दिशा दाखवण्याची व त्यांच्या स्व: ताची ओळख घडवून देऊन त्यांना उंच भरारी घेण्यासाठी जिद्द निर्माण करून देण्याची. मग मला सांगा त्यासाठी केवळ शालेय पुस्तकी ज्ञान पुरेसे आहे का?
अर्थातच तुमचं उत्तर नाही हेच असेल!

पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की अशा खूप साऱ्या संस्था युवकांना मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे काम करत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे आपली Versatile Educaare System संस्था जी गेली १७ वर्षे एका व्हिजनवर काम करत आहे ते व्हिजन म्हणजे "Being the Pioneer Youth Devlopment Organisation in India" म्हणजेच विद्यार्थी वर्ग व युवकांना मार्गदर्शन व त्यांना घडवण्याचं काम करत आहे व त्यासाठी VES - Youth Empowerment Program
ज्यामध्ये युवकांना

१) Self-Identification - स्व:ची ओळख



२) Self Discipline - स्वयं शिस्त


३) Self Reliance - आत्मनिर्भरता




४) Life Purpose - जीवनाचा उद्देश




५) Goal Setting - ध्येय निश्चिती



आणि अशा कितीतरी गोष्टींचं ज्ञान व मार्गदर्शन आपण विद्यार्थी वर्ग व युवकांना करत आहोत. 

कारण युवा पिढी हेच भारत देशाचे खरे भांडवल आहे, जर का युवक घडला तर अतुल्य असा तरुण भारत देश बनेल. तर असा युवक बनवण्यासाठी व घडवण्यासाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "VES - Youth Empowerment Program" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

  1. Superb...VES doing Great service for youth..So proud 👍👏👏🌹🌹🙏

    ReplyDelete

Post a Comment