10 Ways to Zen !!

लहान मूल असो अथवा एखादं मोठं व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच खुश राहण्याचा अधिकार आहे आणि सोबतच तशी मनात दडलेली सुप्त इच्छा सुद्धा आहेच... मग खुश होण्यासाठी.. समाधानी राहण्यासाठी किंवा रोजच्या कामाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी करायचे तरी काय ?? हा प्रश्न इतरांसारखा तुम्हालाही सतावत असेलच आणि ह्याच कठीण वाटणाऱ्या पण अगदी सोप्या प्रश्नाचं उत्तर फक्त १० पायऱ्या वापरल्याने मिळू शकते.. चला सुरुवात करूया एका अशा प्रवासाला ज्या प्रवसाच ध्येय तुम्हाला नक्कीच भारावून सोडेल.


मित्रांनो, सगळ्यात आधी हे जाणून घ्या की हा ब्लॉग किंवा ह्यात सांगितलेल्या पुढच्या दहा पायऱ्या ह्या एकाएकी सुचलेल्या नसून झेन कथांमधून आणि त्याच संबधित अनेक पुस्तकांतून घेतलेल्या आहेत. ज्या वर्सटाईल एडुकेअर सिस्टमच्या मेमबर्सनी उपयोगात आणून पाहिल्या आहेत.. वर्सटाईल ही गेले सतरा वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे. तरुण पिढीसोबत घालवलेल्या ह्याच सतरा वर्षांच्या अनुभवातून पुढचे दहा मुद्दे नक्कीच तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतील हे सांगता येईल.

१. Let Go Of Comparing :- आपल्या तसेच अनेक अनोळखी व्यक्तींसोबत बोलत असताना आपण नेहमीच त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्य आहे हे शोधत असतो. आणि ह्याच शोधात कळत नकळत आपण एखाद्या व्यक्तीसोबत तुलना करू लागतो.. आणि ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीकडून आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे किंवा जास्तीचं असतं तेव्हा नेमक्या ह्याच गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि आपण आनंदी राहण्याच्या प्रयत्नांतून एक पाऊल मागे येतो.. त्यामुळे सगळ्यात महत्वाची आणि पाहिली पायरी म्हणजेच.. तुलना करणे बंद करा!!

२. Let Go Of Competing :- बरोबरीला येण्याची शर्यत तर प्रत्येक घरात तहाण्या बाळाला सुद्धा शिकवली जाते. आणि ह्याच शर्यतीमधून सतत स्पर्धा करण्याची मनोवृत्ती तयार होते.. आणि ज्यावेळेस ह्या स्पर्धेचा निकाल आपल्याला हवा तसा लागत नाही तेव्हा आपली हीच मनोवृत्ती आपली सगळ्यात मोठी जखम बनून राहते.. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक व्यक्तीसोबत स्पर्धा करणे थांबवणे हीच आपल्या ह्या प्रवासाची दुसरी पायरी आहे.

३. Let Go Of judgement :- मोठं होत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघून त्यावर स्वतः च मत मांडताना हळू हळू आपल्याला सवय होते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला, गोष्टीला किंवा परिस्थितीला जज करण्याची सवय आपल्याला होते. जी मानवी स्वभावातील अत्यंत नकारात्मक भूमिका पार पाडणारी सवय आहे. म्हणूनच ही सवय बदलणे ही आनंदी होण्यासाठीची तिसरी पायरी आहे.

४. Let Go Of Anger :- छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे, रागावणे आणि त्यामुळे बऱ्याचदा परिस्थिती आणखी गंभीर करणे ह्यामुळे नुकसान होते ते अर्थात आपल्या मनस्थितीचे... जी गोष्ट घडून गेली आहे ती बदलणार नसेल तर त्यावर चिडून काहीच मिळणार नाही त्याच पद्धतीने जर एखादी चूक दुरुस्त होणार असेल.. होऊ शकत असेल तरीही त्यावर चिडून काहीच फायदा नाही.. मग चिडून रागवून स्वतः चे नुकसान करून घेण्यापेक्षा चौथी पायरी वापरा म्हणजेच स्वतः चा राग त्यागा.

५. Let Go Of Worrying :- एका सुभाषितात खूप छान सांगितले आहे.. चिंता ही चीतेसम असते. त्यामुळे जी गोष्ट आपल्या हातात नाही त्यावर चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर काय उपाय करता येईल ह्याचा विचार म्हणजेच पाचवी पायरी.

६. Let Go Of Regrets :- माणसाला भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता एवढी त्रास देत असते की त्याला वर्तमानाचा विचार करण्याची.. वर्तमानात जगण्याची आठवण करून द्यावी लागते. आणि म्हणूनच वेळ निघून गेल्यावर आपण काय वेगळं करू शकलो असतो ह्याचा विचार करताना त्रास होतो आणि त्याच गोष्टीचा पस्तावा आपण करत राहतो.. त्यामुळे वर्तमानात जगताना जे घडेल त्याला सामोरं जावं म्हणजेच घडून गेलेल्या गोष्टीचा पस्तावा होणार नाही.

७. Let Go Of Blame :- घडलेल्या गोष्टीला कारणीभूत सर्वस्वी पणे तुम्ही स्वतः आहात ( आपण स्वतः आहोत ) असा दृष्टिकोन तयार झाला की साहजिकच आपण इतर व्यक्तींना दोष देणे टाळतो आणि घडलेल्या घटनेचा संपूर्णतः स्वीकार करायला लागतो. इतरांना दोष देणे बंद करणे हीच आनंदी होण्याची सातवी पायरी आहे. 

८. Let Go Of Guilt :- इतरांना दोष देणे बंद करायचे आणि स्वतः जबाबदारी स्वीकारायची ह्याचा अर्थ स्वतः ला दोषी मानायचे असा अजिबात होत नाही. घडलेल्या प्रत्येकच चांगल्या - वाईट घटनांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून स्वतः ला सुद्धा दोषमुक्त करायचे हीच आठवी पायरी आहे.

९. Let Go Of Fear :- घडून गेलेल्या किंवा भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टींची भीती बऱ्याचदा मनात घर करून बसते. आणि मग नवीन प्रयोग करताना ही भीतीच आपल्याला आडवी येते. आपण वरच्या काही पायऱ्यांमध्ये पाहिले की आपण जबाबदारी स्वीकारून, सकारात्मक दृष्टिकोनाने पुढाकार घेणार आहोत मग ह्या प्रवासात घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही.

१०. Have a proper belly laugh at least once a day :- संपूर्ण दिवसातून एकदातरी पोटापासून, बेंबीच्या देठापासून म्हणजेच अगदी मनापासून लहान होऊन हसा. हसणे हा एक चांगला व्यायाम आहे.. जो नक्कीच प्रत्येक गोष्टीत मदत करू शकतो. आणि आपल्या मनस्थितीला बदलण्यासाठी निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मित्रांनो, एक लक्षात घ्या ते म्हणजे कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्याबदल्यात काहीतरी द्यावे लागते. आणि परंतु प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगळी असू शकते आणि हे सुख मिळवण्यासाठी आपल्याला त्याबदल्यात काहीच द्यावे लागत नाही.. फक्त वरच्या दहा गोष्टी दैनंदिन जीवनात आणाव्या लागतात.. आणि मग त्याची जादू आपोआपच दिसून येईल. 

असेच तुमच्या अथवा तुमच्या मुलांच्या विकासाबद्दल काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM





Comments

Post a Comment