ह्या ५ सवयी लावा, आणि मुलांना लागलेलं मोबाईलचं व्यसन टाळा !!

नमस्कार पालकवर्ग,
    सध्याच्या कोरोनाच्या काळात मुलांमध्ये मोबाईल addiction खूप प्रमाणात वाढले आहे .पण बिचारी मूले तरी काय करणार ,मोबाईल शिवाय त्यांना दुसरा पर्यायच उरलेला नाही.शाळा , क्लासेस ऑनलाईन सगळच ऑनलाईन असल्यामुळे पालक हतबल झाले आहेत. पहिल्या सारख कधी सुरळीत होईल याची अजूनही आपल्याला कल्पना नाही पण मात्र आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे त्यांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून आपणच वाचवलं पाहिजे चला तर मग पाहूया असे काही तोडगे जेणे करून आपण आपल्या मुलांना मोबाईल addiction पासून दूर ठेऊ शकतो.

मित्रांनो, Versatile Educaare System ही organisation गेले १७ वर्ष मुलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे. 

1.टाईम टेबल बनवा:

 कधी कधी मुलं क्लासेस संपल्यावर देखील मोबाईलवर गेम किंवा अजून काहीतरी करत बसतात , तर हाच विनाकारण वापर आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी मुलांच्या दिवसभराच टाईम टेबल तुम्हाला त्यांना बनवून द्यायचं आहे यामुळे काय होईल तर जेवढे क्लासेस असतील तेवढाच वेळ मुलं मोबाईल चा वापर करतील, आणि schedule नुसार काम करण्याची त्यांना सवय लागेल.

२. मोबाईल ऐवजी पुस्तकांचा वापर करा : 


ऑनलाइन कलासेस संपल्यावर मुलांना घरचा अभ्यास सुद्धा ऑनलाईन मिळतो मग तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी तासनतास मुलं मोबाईल चा वापर करतात, तर इथे ऑनलाईन मिळालेला अभ्यास आपल्याला पुस्तकसनमध्ये टिक मार्क करून द्यायचे आहे . जेणेकरून मुलं पुस्तकामध्ये बघून अभ्यास पूर्ण करू शकतील यामुळे मुलांना डोलयांना त्रास होणार नाही याचबरोबर तुमचीही मुलांबद्दल ची काळजी दूर होईल .

3. नवनवीन गोष्टी करायला सांगा: 

आपल्याला माहीतच आहे की मुले नवीन काही शिकण्यासाठी किंव्हा करण्यासाठी नेहमी उस्याहीत असतात आपल्याला सुद्धा तेच करायच आहे त्यांच छोट्या छोट्या गोष्टीत मन रमवायच आहे उदारणार्थ घर नीटनेटके ठेवायला सांगणे अश्यामुळे मुलांचा खूप छानप्रकारे वेळ जाईल आणि त्यातूनच त्यांना नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील .

4 मुलांचा sharing partner बना : 


मुलं दिवसभर मोबाईल वर अभ्यास करून कंटाळून गेलेले असतात ,त्यांनी दिवसभर काय काय केल ते सांगायला त्यांना त्यांचा sharing partner हवा असतो . तर तुम्हाला इथे त्यांचा sharing पार्टनर बनायचं आहे , तुम्ही दिवसभरात काय काय केलेत ते तुम्ही त्यांना कथेमार्फत सुद्धा सांगू शकता कारण मुलांना गोष्टी ऐकायला नक्कीच आवडतात आणि मग त्यांनी दिवसभरात काय केले ते नक्की सांगतील आणि याच बरोबर तुमच्या नात्यातील bonding घट्ट होईल

5 छंद जोपासा: 

या digital युगामुळे आपल्या मुलांच्या छंदांकडे दुर्लक्ष व्हायला नकोत त्याचे छंद झोपासायला हवेत त्यासाठी त्यांना काय करायला आवडते त्यांना कोणत्या गोष्टीत रस आहे ते त्यांना करायला दयायला हवे . 

असेच मोबाईल addiction बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर versatile educaare ची संपर्क साधा आणि अश्याच नवनवीन विषयांसाठी ankuram group ला जॉईन करा 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास"
Ankuram

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.


Comments

  1. खूपच सुंदर उपयोगी माहिती आहे... धन्यवाद Versatile educaare system👌👍🙏💐👏

    ReplyDelete

Post a Comment