लहान मुलांच्या ५ सवयी, ज्या प्रत्येक पालकाला माहीत असायलाच हव्यात !!

मुलांना चांगल्या सवयी लावणे महत्वाचे आहेच पण त्याही आधी त्या का महत्वाच्या आहेत ते पाहू.
पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लहान वयात लावणे जास्त महत्वाचं आहे. चांगल्या सवयी मध्ये चांगले सामाजिक कौशल्य, शिष्टाचार, शारीरिक हालचालींमध्ये सवयी समाविष्ट असतात. त्यासाठी नियमित सराव नियमित प्रोत्साहन आवश्यक आहे.


तर Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून सामोरे आलेले पुढचे ५ मुद्दे आपण पाहुयात.

खरं तर चांगल्या सवयी म्हणजे एखाद्या पदार्थाचे पहिले मिश्रण म्हणायला हरकत नाही. म्हणजेच मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया म्हणू शकतो. आणि जस पदार्थामध्ये योग्य वेळीच योग्य मिश्रण घालतो तसेच योग्य वेळी योग्य ते संस्कार होणे महत्वाचे आहे. ही पिढी थोड्या वेगळ्या स्वभावाची आहे, आपल एखाद्या गोष्टीतील मत हे लगेच बरोबर आहे म्हणनारी किंवा मान्य करणारी नाही. त्यामुळे सगळी मते लादून पण चालत नाहीत. काही गोष्टी त्यांच्या कलेने देखील घ्यायला हव्यात. म्हणजेच बंधन देखील असतील पण त्याच त्यांना ओझे वाटता कामा नये. तर ती पूर्ण प्रोसेस enjoy करतील अशी असावी.

मग ही प्रोसेस असावी तरी कशी? 
पाहूयात काही छोट्या आणि सोप्या उपायांमधून.

१. चांगले शिष्टाचार शिकवणे :-

चांगली वागणूक चांगल्या सवयींना प्रोत्साहन देईल.
चांगल्या शिष्टाचारांमध्ये वडिलधार्‍यांशी किंवा लहानांशी प्रत्येकाचा आदर करण्याचे संस्कार समाविष्ट असतात.
यामध्ये मुले thank you, sorry, welcome अश्या आदरयुक्त शब्दांचा वापर करतात. लहान वयातच जर हे शिकवले तर या गोष्टी जीवनाचा भागच होउन जातात. मुलांना इतर लोकांना आपलंसं करणं सोप्पं होऊन जातं.

२ आपल्या मुलांसोबत गुंतून राहा :- 

‌ पालक कितीही व्यस्त असले तरीही मुलांच्या जीवनात त्यांचा सहभाग असणे जास्त महत्वाचे आहे. पालकांनी आपल्या मुलाच्या दिवसाबद्दल, मुलं शाळेत किंवा घरात काय करतात? या गोष्टी त्याच्या एखाद्या जाणून घ्यायला हव्यात. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधण महत्त्वाच आहे. अशाने मुलांच्या विचारक्रिये बद्दल पालकांना जाणून घेण्यास मदत होते. मुलांकडे सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि प्रभावी गुण असतो आणि तो म्हणजे प्रश्न विचारणे. त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आपण दिले पाहिजे, असं केल्याने आपल्यासाठी घरातले वातावरण अजून उत्साही होऊ लागतं. आणि हा मुलांसोबत संवाद वाढवण्याचा अजून एक उत्तम मार्ग आहे.
३ मुलांना प्रोत्साहित करणारे बक्षीस द्या:-


मुलांनी दररोज एक काम नियमित करावं म्हणजेच उदाहरणार्थ जर पालकांना वाटतं की मुलांनी घरी आल्यावर आपले सामान जागेवर ठेवावे किंवा मग अभ्यास नियमित पूर्ण करावा किंवा काहीही. तर पालकांनी आठवड्याला मुलांसाठी एखादे सरप्राईज किंवा बक्षीस ठेवावे. म्हणजे मग ती आवडीने ते काम पुर्ण करत राहतील तेही न कंटाळता. त्यांना कुठेच अवघड वाटणार नाही. मुलांना त्यांच्या चांगल्या सवयीबद्दल बक्षीस देणे, त्यांना अजून चांगल्या सवयी शिकण्यासाठी आणखी उत्साही बनवू शकतं. पण तुमचे बक्षीस कधीही चॉकलेट, तासभरासाठीचा टीव्ही किंवा मोबाईल किंवा आणखी काही असू नये. तर ते intangible गिफ्ट असावे.

४ मुलांना आदरयुक्त भीती असली पाहिजे:-


मुले बाहेर तसंच वागतात जसं त्यांना शिकवलेल असतं. जर घरी त्यांच्या आजूबाजूला चांगल्या सवयी असणारी, आदर करणारी माणसे असतील तर मुलेही अगदी तसंच वागतात. कारण ते लहानपणापासून त्याच वातावरणात वाढलेली असतात. पालकांचे मुलांशी मैत्री पूर्वक नातं असावं पण त्यालाही मर्यादा असावी. मुलांना त्यांच्या काही निर्णयाबाबतीत सूट असावी पण मुलांचा कुठल्याही बाबतीतील निर्णय पालकांवरती जास्त अवलंबून असावा. शिस्त आणि प्रेम याचा बॅलेंस साधता आला पाहिजे. 

५ मुलांना चांगल्या सवयींचे महत्व पटवून द्या:- 

एखादी चांगली सवय सातत्याने पाळल्याने मुलांमध्ये कसा सकारात्मक बदल होत असतो याची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. म्हणजेच उदाहरणार्थ जर दिवसभर मुलांनी त्यांच्या ठरवलेल्या शेड्युल नुसार काम केले अभ्यास केला तर ते संध्याकाळपर्यंत फ्रेश राहतील, कंटाळा नाहीसा होईल आणि सगळी कामं पूर्ण होत असल्याचा आनंद आणि समाधान देखील राहील. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची नेहमीच उत्सुकता राहील. एकदा लावलेली शिस्त आयुष्यभर टिकते. असं केल्याने त्यांचे कौतुकही होईल. आणि या सर्व शिस्तीतूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल. 

असेच मुलांच्या विकासाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर versatile educaare system सोबत संपर्क साधा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी ankuram group ला जॉईन करा 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.


Comments

Post a Comment