५ सूत्र ज्यामुळे तुम्ही दैनंदिन आयुष्यात निसर्गाची काळजी घेऊ शकता !!

नमस्कार वाचक मित्रांनो,
  आजची ठळक बातमी मुंबई, पुणे,कोल्हापूर या ठिकाणी पाणी भरून काही घर वाहून गेली ,बातमी 2, मुलुंड आणि बोरीवली च्या भागात बिबट्याची घुसखोरी. त्यामुळे थेतील स्थानिक लोकं घाबरली . इथे घुसखोरी नक्की कोणाची ? बिबट्याची ,पाण्याची की माणसांची ?
अरे!! हे मी काय वाचत आहे बातमी की ब्लॉग हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल ,पण हे सत्य आहे.
या प्रश्नावर विचार करणे खूप आवश्यक आहे. 


मित्रांनो ,या प्रश्नांवरून तुम्हाला लक्षात आले असेल की आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सानिध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे कार्य माणसाला करावेच लागेल त्याशिवाय आपण हे महाकार्य यशस्वीरीत्या पुढे नेऊ शकणार नाही.
खरं तर निसर्गाचे महत्त्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे, हे वेगळे सांगायला नको ,निसर्गाचे आपल्यावर खुप उपकार आहेत.त्यामुळे तर तुम्ही आता श्वासोश्वास (ऑक्सिजन) घेऊ शकताय आणि तेच करता करता हा ब्लॉग तुम्ही वाचताय, म्हणूनच निसर्गाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. निसर्गाचे जतन करण्यासाठी आपण काय करू शकतो ? तर ,पहिलं स्वतःपासून सुरुवात करूयात ,आपण छोटी सुरुवात करू शकतो आणि ही छोटी छोटी पाऊलं मोठ्या कार्य करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात

१. तीन R 
Reduce ,Reuse , Recycle अर्थात कमी वापरा ,पुन्हा वापरा, पुनर्निर्मिती करा .हा मंत्र कदाचित तुम्ही वाचलेला किंवा तुम्हाला माहीत असेल आपण जितकं निसर्गा कडून घेतो ,तितकी निसर्गाची हानी करतो .त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, गरज असेल तेवढ्याच वस्तूंचा वापर करा .तसेच काही वस्तू पुनर्निर्मित असतात त्यांचा पुन्हा वापर करा.
.
२. पाण्याचं महत्त्व नेहमी लक्षात ठेवा: 

    पाणी जपून वापरा , आपल्या घरात नळ गळती होणार नाही, तसेच पाण्याचा गैरवापर होणार नाही याची सदैव काळजी घ्या .तसेच पावसाळ्यात घरांवरून, पत्र्यावरून किंवा इमारती वरून पडणारे पाणी साठवण्याची व्यवस्था (Rain harwasting )तुम्ही करू शकता.

३. प्लास्टिकचा वापर टाळा : 

आता मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी खूप पर्याय आलेले आहेत .बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत घेऊन जाल याची काळजी घ्या. फिरायला जाताना सोबत स्वच्छ व उकळलेल्या पाण्याची बाटली सोबत घेऊन जा .त्यामुळे तुम्हाला नवीन बाटली विकत घेण्याची गरज भासणार नाही .याचबरोबर तुम्ही निरोगी राहाल. आपण प्लास्टिकच्या वस्तू १ वेळा वापरून फेकून देतो ते टाळून reuse होतील अश्याच प्लास्टिकच्या वस्तू विकत घ्या. तसेच 1 time वापरायच्या वस्तू straw , kotton birds वापरणं बंद करावं

४. अन्नाची नासाडी टाळा आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करा:
  संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या फूड इंडेक्सनुसार ग्राहकांसाठी दुकानात, रेस्टॉरंट्समध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या अन्नापैकी 17% टक्के अन्न वाया जातं. त्यात घरात वाया जाणाऱ्या अन्नाचा वाटा मोठा आहे.
वाया गेलेलं अन्न कुजतं, तेव्हा त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. जागतिक तापमानवाढीसाठी हा वायूही कारणीभूत आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या अंदाजानुसार अन्नाची नासाडी थांबवली, तर माणसाकडून होणारं हरितवायूंचं उत्सर्जन 6 ते 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तसेच तुम्ही उरलेलं अन्न कंपोस्ट करू शकता.

५. एक तरी झाड लावा.

 प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावलं तर एक तरी झाड लावा ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. झाडे फक्त माणसाला उपयोगी पडतात असे नाही तर ती ,पक्षी, फुलपाखरे आणि बाकीचे छोटे कीटक यांना सुद्धा निस्वार्थपणे आसरा देतात मदत करत असतात.
 यावरील काही पॉईंटवरून आपल्याला समजत,माणूस आणि निसर्ग या दोघांचं नातं एकमेकांवर अवलंबून आहे.आणि हे आतूट नात कायम टिकून राहणं तितकच महत्त्वाचा आहे .निसर्गाशिवाय माणूस अपूर्ण आहे. 
निसर्गाचि काळजी घ्या निसर्ग तुमची दाम दुपटीने काळजी घेईल ... तर मी आता इथे थांबते ..

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" ANKURAM


Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.




Comments

  1. खूपचं सुंदर पर्यावरण स्नेही लेख 👌👍 यातील सहज सोपे उपाय सहज अमलात आणून निसर्गाशी पुन्हा मैत्री प्रस्थापित नक्कीच होईल....🏞️🌹💐🌄🌍🌈

    ReplyDelete

Post a Comment