५ सवयी ज्यामुळे कळेल मोबाईलच्या अती वापराचा परिणाम !!

नमस्कार पालक मित्रांनो
एक काळ होता, जेव्हा पालक आपल्या मुलाला मोबाईल ठेव आणि अभ्यासाला बस असे बोलत होते... आणि आता मोबाईल घे आणि अभ्यासाला बस असे बोलण्याची वेळ आलीय.. आजकालच्या ह्या online च्या. जगात मुलं खेळात पारंगत तर झाली आहेत पण ते मैदानावरच्या नाहीत तर मोबाईल वरच्या... हातात सतत मोबाईल ही प्रत्येक घरातील घटना...लहान मोठे सर्वानाच ह्या मोबाईल ने विळखा घातला आहे.. आणि ह्या सर्वांचे परिणाम हे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांवर जाणवू लागले आहेत...
पण ह्यावर उपाय काय? मुलांना ह्या मोबाईलचं व्यसन तर लागणार नाही ना? मुलांना ह्यापासून कसं लांब ठेवावं...? ह्यासारखे असंख्य प्रश्न तुम्हाला सतावत आहेत ना??

जेव्हा एखाद्या गोष्टी शिवाय एखादी व्यक्ती राहू शकत नाही किंवा त्या गोष्टीचा वियोग त्या व्यक्तीला सहन होत नाही. तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीच्या व्यसनाधीन झालीय असे म्हटले जाते...
मोबाईल वापरण्याचे सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचं आहे...मुलं ही दिवसातून 4 ते 8 तास मोबाईल वापरात असतात... पण तज्ञांच्या मते हे प्रमाण २० मिनिट असायला हवे...म्हणजेच आपण कित्येक पटीने जास्त मोबाईल वापरात आहोत ते तुमच्या लक्षात आलेच असेल...

मोबाइलच्या अधीन गेलेल्या मुलांमध्ये वयानुसार वेगवेगळी लक्षणे व वागणे दिसून येते. मुलांची विचार करण्याची क्षमता, मानसिकता, त्यांचं वागणं, ह्यावरून ते किती वेळ मोबाईल वापरत असतील हे ही कळून येते... जी मुले अती प्रमाणात मोबाईल किंवा स्क्रीन टाईम चा वापर करतात त्याच्या मध्ये चंचलपणा, हट्टीपणा, concentration, झोप न येणे, सारखे आजारी पडणे, यासारखे खूप गोष्टीना मुलांना सामोरे जावे लागते...
पालक हो, हे सर्व टाळण्यासाठी आताच तुम्ही तयार झाले पाहिजेत... योग्य निर्णय घेऊन आपल्या मुलांना ह्या मोबाईल क्या व्यसनापासून वाचवायला हवे. 
पण खरचं तुमची मुलं मोबाईल च्या अधीन झालेत का? हे पाहण्यासाठी पुढील प्रयोग नक्कीच करून बघा...

१. आवडत्या गोष्टी मधून रस कमी होणे

जर मुलांना drawing, study, वेगवेगळे खेळ ( कॅरम, चेस इ) खेळण्यात रस होता.. पण आता मोबाईल च्या जास्त वापरामुळे मुलांना सतत मोबाईलचं हवा असतो आणि बाकी सर्व गोष्टीत त्यांना काही रस नसेल, किंवा त्या गोष्टी करायला आवडतं नसतील तर तुम्हाला नक्कीच मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे..

२. इंटरनेट बंद पडणे

जर मुलं ऑनलाइन काही गेम्स खेळत असतील किंवा त्यांच्या आवडीच काही बघत असतील आणि मध्येच नेट connection बंद झाले आणि मुलांची चिडचिड वाढत गेली. तर मुलं हळू हळू मोबाईल आणि नेट च्या अधीन होत आहेत...

३. मित्र, कुटुंब यांच्यासोबत वेळ न घालवने

जर मुलांना समोर असलेल्या मित्र, आणि घरच्या व्यक्तीपेक्षा मोबाईल मध्ये गेम्स खेळणे, सोशल मीडिया, चॅटिंग आवडतं आहे का...? ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

४. जलद प्रतिक्रिया

जर तुम्ही अचानक मुलांच्या हातून मोबाईल काढून घेत असाल, आणि ह्या गोष्टीचा त्यांना खूप राग येत असेल, त्यांची चिडचिड होत असेल, मुलं खूप हट्टीपणा करून रडत असतील, उलट बोलत असतील... तर ही नक्कीच गंभीर बाब असू शकते.

५. आरोग्यावर होणारा परिणाम

मोबाइलच्या अती वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर खूप मोठा परिमाण होत असतो... मोबाईल मधून येणाऱ्या radiance मुळे मुलांच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यांना झोप न येणे, सतत आजारी पडणे, नीट न जेवणे अशा प्रकारचा त्रास त्यांना जाणवू लागतो... आणि महत्वाचे म्हणजे जी मुले चंचल नसतात ती मोबाईल च्या वापरामुळे चंचल होतात...

पालक हो, मोबाईल जिंदगी है... असे बोलण्यापेक्षा मोबाईल हा फक्त कमापुरताच कसा वापरता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे... आणि तुमच्या मुलांना ही हीच सवय लावली पाहिजे... 
पुढच्या लेखात आपण मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी काय काय केले पाहिजे ते पाहूया..

आणि हो, VersatileEducaare System ही organization गेली 17 वर्ष मुलांच्या पालकांच्या समस्यावर त्यांना मार्गदर्शन करत आहे... जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा..
सध्या अकुंरम ह्या फ्री सेशन मधून दर शनिवारी पालक व मुलांना वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन देत आहोत... तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ह्यात सहभागी होऊ शकता..

कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास"

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

Comments

Post a Comment