"३ सूत्र जे तुमचे स्वप्न साकार करतील..!!".



            माणूस म्हंटले की भाव भावना, आशा अपेक्षा आल्याच... आणि त्याच सोबत आली माणसाची सतत स्वप्न पाहण्याची वृत्ती... तुमचे वय काहीही असले, तुमचा जन्म, तुमचा भूतकाळ काहीही असला तरीही स्वप्न पाहण्याचा हक्क आपल्याला निसर्गानेच दिला आहे..पण फक्त म्हणून प्रत्येकाचे पाहिलेले स्वप्न १००% पूर्ण होतेच का ?? तर अर्थात नाही..!! पण स्वतः चे स्वप्न पूर्ण व्हावे असे मात्र सगळ्यांनाच वाटत असते.. तुम्हालाही असेच वाटते का ?? तुमचे स्वप्न कोणत्याही क्षेत्रातील असो, किंवा कितीही मोठे असो... ते पूर्ण झालेलं पाहायला तुम्हाला आवडेल का ?? मग मित्रांनो हा ब्लॉग तुमच्याचसाठी आहे...!!


      मित्रांनो, Versatile Educaare System ही organisation गेले १७ वर्ष मुलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे.. आणि ह्याच १७ वर्षांच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की... कोणत्याही माणसाने जर नियमित प्रयत्न केले आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवले तर त्याने पाहिलेलं अशक्य स्वप्न सुद्धा तो अगदी सहजपणे शक्य करू शकतो.

१) ध्येय निश्चित करा : 

"मंजिल गर पता हो, तो हर सफर आसान हो जाता है |"
          मित्रांनो, कुठे जायचे आहे हे माहीत असले की त्या ठिकाणी पोहोचायला सोपे होते. त्यामुळे सर्वात पहिली कृती म्हणजे तुमचे ध्येय निश्चित करा. आणि जमल्यास जवळच्या व्यक्तींसोबत किंवा तुमच्या मार्गदर्शकासोबत त्यावर चर्चा करा. ठरलेलं ध्येय एका पांढऱ्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहून ते सतत तुमच्या डोळ्यांसमोर राहील अशा ठिकाणी लावून ठेवा.

२) माहिती मिळवा : 


           ज्या प्रमाणे आपण एखादं स्पॉट पिकनिकला जाण्यासाठी निवडल्या नंतर त्या जागेची संपूर्ण चौकशी करतो, तिथली एकुनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे तुम्हाला आता तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाची किंवा ध्येयाची जास्तीत जास्त माहिती मिळवायला हवी. ह्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींची भेट घेऊन त्यांचा interview घेऊ शकता, किंवा त्या संदर्भात उपलब्ध असलेली पुस्तके वाचू शकता. आणि मग ती माहितीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल.

३) कल्पना करा : 


         ही पायरी सगळ्यात सोपी पण तितकीच महत्त्वाची आहे. ध्येय ठरवल्यावर आणि त्यावर नित्य नियमाने माहिती मिळवत असतानाच कल्पना करा की तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. आपण आपली सकाळ ज्या विचारांनी करतो त्याच विचारांनी आपल्या दिवसाचा शेवट होतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर "ते पूर्ण होण्याआधी" तुम्हाला "ते पूर्ण झाल्याची" कल्पना करायला हवी. 

         कोणतेही स्वप्न निश्चित केल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंतचा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा, तितकाच मोठा आणि खडतरिय असतो.. ह्या भागात आपण स्वप्न पूर्तेतेची सुरुवात पाहिली, पुढच्या भागात आपण पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आवर्जून घ्यायला हव्यात अशा काही कृती पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच संपर्कात रहा.
आणि जर तुम्हाला सोप्या शब्दात पण यशस्वी होण्याची गुरुकिल्ली जाणून घ्यायची असेल किंवा त्यासाठी पाऊल उचलायचे असेल तर श्री. अजय दरेकर लिखित "परिपूर्ण व्यक्ती ते यशस्वी उद्योजक" हे eBook नक्की वाचा. त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. Book लिंक ..

यशस्वी होण्याच्या तयारीसाठी... किंवा तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरांसाठी Versatile Educaare System खालील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page : Versatile's Facebook Page

Facebook Group : PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

Comments