वाचनातील कंटाळा दूर करण्याचे ३ खात्रीशीर उपाय !!

नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये जग ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शोधताना इंटरनेटचा वापर केला जातो आणि या सगळ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची सवय कमी झाली आहे. मुले वाचनाचा कंटाळा करतात पण माझ्या या ब्लॉग मधून जाणून घ्या मुलं वाचनाचा कंटाळा का करतात आणि त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी काय उपाय करावेत. हे सोपे उपाय तुमच्या मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी नक्की परिणामकारक ठरतील.


मित्रांनो, Versatile Educaare System ही organisation गेले १७ वर्ष मुलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे.. आणि ह्याच १७ वर्षांच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की... मुलांना योग्य वयात वाचनासाठी मार्गदर्शन केले तर त्यांचा कंटाळा दूर होतो आणि त्यांच्या मनात वाचानाबद्दल रस निर्माण होतो.

 १)मुलांची वाचण्याची पद्धत का चुकते आणि त्यावरील उपाय.

 पुस्तक वाचताना मुले एक सारखी सरळ बसत नाहीत थोड्यावेळाने ते त्यांची पोझिशन बदलतात. कंटाळा येतो म्हणून पडून सुद्धा वाचन करू लागतात. पण असं केल्याने वाचन एकचित्ताने होत नाही. म्हणून दररोज थोडे का होईना पण जमेल तेवढ्या वेळ शांत आणि ताठ बसून वाचन केले पाहिजे. वाचताना पुस्तक आणि डोळ्यांपर्यंतचे अंतर प्रॉपर मेंटेन करावे. पुस्तक जास्त जवळ किंवा लांब नसावे म्हणजेच, अख्ख्या पुस्तकातील कमीत कमी पूर्ण एक ओळ भरून नजर मावेल एवढे अंतर असावे. सुरुवातीला कमी वेळ पण नंतर हळूहळू वाचनाचा वेळ वाढवावा.  
पुस्तक वाचण्याआधी मुलं नेहमी थेट गोष्ट वाचायला किंवा सुरुवात वाचायला सुरू करतात. म्हणजेच प्रस्तावना वाचण्याचा कंटाळा करतात. त्यांना हे सांगणे गरजेचे आहे की, पुस्तक वाचताना कधीही नेहमी पुस्तकाचे नाव आणि प्रस्तावना पहिला वाचावी. त्यामुळे या पुस्तकात कोणत्या गोष्टी वाचायला मिळणार आहेत हे स्पष्ट होते आणि वाचण्याचा इंट्रेस्ट देखील वाढतो. 

२) मुलांचा वाचनाचा वेग वाढवण्याचे उपाय


पुस्तक वाचताना ते समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे असते.
मुलं वाचन करताना हमखास ही चूक करतात ती म्हणजे शब्दा नंतर शब्द वाचण्याची सवय ठेवतात. असं केल्याने त्यांचा वाचनाचा वेगही वाढत नाही आणि त्यांना ते लवकर समजतही नाही. म्हणून कधीही वाचताना शब्दा नंतर शब्द वाचण्याऐवजी शब्दांचा समूह म्हणजेच पूर्ण वाक्य वाचण्याची सवय ठेवावी. कधीकधी वाचताना ते चुकून या गोष्टी सुद्धा करतात. आणि त्या म्हणजे, ते एक ओळ वाचताना ती वाचून परत मागे येतात आणि तीच ओळ परत वाचू लागतात. किंवा मग चुकून खालची ओळ वाचण्याऐवजी त्याखालची ओळ वाचू लागतात. तुमच्या सोबत सुद्धा असं बऱ्याचदा होत असेल, असं का? याचे कारण वाचण्यामध्ये एकाग्रता नाही. अशाने त्यांचा वाचल्याबद्दल चा आत्मविश्वास सुद्धा राहत नाही. त्यासाठी वाचताना नेहमी ओळीवर पेन, पेन्सिल किंवा बोट ठेवून वाचावे. हे आपल्यासाठी एखाद्या पॉईंटर सारखे काम करते. असं केल्याने एकाग्रता टिकून राहते. आणि मग तुमच्या या पॉईंटचा वेग हळूहळू वाढवावा. वाचताना फक्त वाचणेच महत्त्वाचे नाही, त्यामधील दडलेला अर्थ समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणूनच कमी महत्त्वाचा भाग लवकर वाचून घ्यावा पण जसजसे तुम्ही महत्त्वाच्या ओळींवर येता, तेव्हा ते कळताच वाचनाचा वेग कमी करावा. जेणेकरून वाचलेल्या वाक्याचा अर्थ लक्षात येऊ शकतो. 

३) मुलांनी वाचलेली गोष्ट किंवा माहिती लक्षात राहण्यासाठी चे उपाय

बऱ्याचदा मुलं बरीचशी पुस्तके वाचतात पण काही गोष्टी लक्षात राहत नाहीत असे त्यांचे म्हणणे असते. यासाठी काय करावे? तर सर्वप्रथम वाचताना मुलांनी मोठ्या आवाजात वाचावे. मोठ्या आवाजात वाचले की वाचलेले शब्द पुन्हा एकदा कानावर पडतात आणि त्यांचे रिविजन होते म्हणजेच त्यांचे एका शब्दाचे वाचन दोनदा होते. असे केल्याने त्यांना लवकर आणि चांगले लक्षात येऊ शकते. यावर आणखीन एक उपाय म्हणजे, वाचताना एखाद्या महत्त्वाच्या भागाला खाली रेश मारावी किंवा त्या गोष्टीला एखाद्या माणसाशी किंवा विषयाशी मनात जोडून ठेवायचे. जेणेकरून ते लक्षात राहण्यास सोपे पडते. 


मुलांना हे सांगणे गरजेचे आहे की वाचनाचे असंख्य फायदे असतात. 

वाचन हे मेंदूसाठी अन्नासारखे सारखे असते. जशी आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता असते तशीच मेंदूला देखील वाचनाची गरज असते. वाचनात मेंदूची रचना बदलण्याची शक्ती असते. वाचनामुळे आपण हुशार होतो कारण आपण बर्‍याच माहितीचा वापर करतो. विचार करा एका यशस्वी व्यक्तीचे ज्ञान इतके उच्च का आहे? वास्तविक रहस्य म्हणजे यशस्वी व्यक्ती त्यांच्या मोकळ्या वेळात पुस्तके वाचतो. आपण कोणती पुस्तके वाचतो आणि कोणासोबत राहतो यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. प्रत्येक पुस्तकात शब्द, कल्पना, माइंडसेट, लेखकाचा सल्ला आणि अनुभव समाविष्ट असतो. वाचन आपले लक्ष आणि संभाषण देखील सुधारित करते. वाचन आपल्या मनाला विश्रांती देते. तसेच आपल्या स्मरणशक्तीला मदत करण्यासाठी हे सुधारते. वाचनामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व बदलते. 
म्हणून वाचन करणे गरजेचे आहे. मला खात्री आहे हा ब्लॉग वाचल्यानंतर तुमचा देखील वाचनातील इंटरेस्ट नक्कीच वाढला असेल.

वाचनासंदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्याव्यतिरक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास"

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

Comments

Post a Comment