३ नियम ज्याने तुम्ही स्टेज वर निर्भिडपणे वावराल !!


स्टेज वर बोलताना घाबरणे ही २१ व्या शतकातली सगळ्यात जास्त हाताळली जाणारी समस्या आहे. व्यावसायिक असो वा शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रत्येकालाच आत्मविश्वासाने आणि ठामपने स्टेज वर वावरता यावे, स्वतः ची एक professional image तयार करता यावी असे वाटत असते. परंतु अभ्यासातून असे लक्षात आले आहे की १०० पैकी ७५% लोक एकतर स्वतः चे मत सगळ्यांसमोर मांडायला घाबरतात किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे ते स्टेज वर सगळ्यांसमोर व्यक्त होण्यासाठी कधी पुढाकारच घेत नाहीत !! 


अनेकदा स्टेज वर मिळालेल्या पहिल्या अपयशाच्या भीतीमुळे विद्यार्थी किंवा तरुण मंडळी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेत नाहीत. आणि म्हणून ते संपूर्ण आयुष्यात मागे राहून वावरत असतात.

आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की स्टेज वर वावरण्याची ही भीती घालवण्यासाठी तुम्ही नेमके काय करायला हवे ??

मित्रांनो, Versatile Educaare System ही organisation गेले १७ वर्ष मुलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे.. आणि ह्याच १७ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून असे लक्षात आले आहे की... कोणत्याही माणसाने जर नियमित प्रयत्न केले आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवले तर त्याची मोठ्यातली मोठी भीती जाऊन तो निर्भिड पने स्टेज वर व्यक्त होऊ शकतो आणि हवे असलेले कोणतेही रिझल्ट मिळवू शकतो.

१. पहिला प्रयत्न स्वतः समोर करा : 


कोणत्याही भाषणाच्या किंवा वक्तव्याचा सुरुवातीला आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करा. प्रेक्षकाला समजून घेण्याआधी किंवा त्यांच्यासमोर स्टेज वर स्वतः ला represent करण्याआधी स्वतः ला आरशात निरखून पहा.. कोणत्या वाक्याला तुमच्या चेहऱ्यावर कोणते भाव असतात आणि त्या वाक्यासाठी कोणते गरजेचे भाव आहेत हे आधी समजून घ्या. ह्यामुळे तुम्हाला स्वतः ला ओळखण्यासाठी मदत होईल.

२. वीस मिनिटांपूर्वी तयार रहा :


स्टेज वर जाण्याआधीचे वीस मिनिटं संपूर्ण स्वतः ला द्या. ह्या वेळेत शक्य असल्यास शांत राहून मेडीटेशन करण्याचा प्रयत्न करा. स्वतः चे भाषण, वक्तव्य, संवाद किंवा इतर वाक्यांची एकदा मनात उजळणी करा. लक्षात ठेवा ह्या वेळेत कधीच प्रेषक तुमच्या भाषणाला किंवा प्रयोगाला कसा प्रतिसाद देतील असा अजिबात विचार करू नका ! ह्या व्यतिरिक्त तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळवण्यासाठी स्वतः चे बेस्ट देण्याचा प्रयत्न करा.

३. स्टेज वर गोंधळून जाऊ नका : 


लहान असो वा मोठा प्रेक्षक समोर आल्यावर प्रत्येकाचाच गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. पण मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत गोंधळून न जाता प्रसंगावधान राखून त्या परिस्थिती ला सांभाळून घेता यायला हवे. चार्ली चॅप्लिन ५ वर्षांचा असताना त्यांनी स्टेज वर पाहिलं पाऊल टाकलं होते. त्यावेळेस त्यांच्या आईची अचानक खराब झालेली तब्बेत पाहून कोणताही ५ वर्षांचा मुलगा गोंधळून गेला असता. परंतु चार्लीचॅप्लिन ने मात्र न गोंधळता त्या परिस्तिथी मध्ये स्वतःला व आईला सांभाळून घेतले ज्यामुळे प्रेक्षक वर्ग अत्यंत खुश होऊन भावनावश झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्टेज वर गोंधळून न जाता तिथे धैर्याने आणि आत्मविश्वासाने वावरा.

मित्रांनो, यासोबतच स्टेज वर जाण्यापूर्वी तुम्हाला एक उत्कृष्ट वक्ता होता यायला हवे.. तरच न घाबरता तुम्ही स्टेज वर स्वतः ला represent करू शकाल आणि प्रेक्षकांना खिळवून ठवू शकाल.

Public Speaking, Communication Skills, Stage appearance, Content Writing आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि सध्या चर्चेत असलेल्या स्किल्स बद्दल जाणून घेण्यासाठी किंवा त्या आत्मसात करण्यासाठी "Versatile Educaare System" च्या Blogger ला फॉलो करा. आणि स्वतः च्या सोनेरी भविष्याकडे एक पाऊल उचला...

आणि हो यशस्वी होण्याच्या तयारीसाठी... किंवा तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरांसाठी Versatile Educaare System खालील माध्यमातून संपर्क साधावा :

Facebook Page : Versatile Educaare System

Facebook Group : PRAGYAKULAM

YouTube : Versatile Educaare System

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.


Comments

Post a Comment