Youth - देशाचं भविष्य !!

         पुष्कळ वेळा आपण आपल्या देशाच्या तरुण पिढी च्या बाबतीत जर कोणाला प्रश्न विचारला, तर १००पैकी ७०% लोकांचं उत्तर हेच असतं, की ‘आजकालची तरुण पिढी ही वाया गेलीय, social मीडिया आणि व्यसनाच्या आहारी जातेय, तिला देशाच्या भविष्याची किंवा स्वतः च्या भवितव्याची काळजीच नाही,’ पण जी उरलेली ३०% लोकं आहेत, त्यांचं मत हे आपल्या तरुण पिढी च्या बाबतीत काहीस वेगळं आहे. त्यांच्या मते, ‘तरुण पिढी निर्भय, शूर, वेगवान, गतिशील आणि आत्मविश्वासू आहेत. तरुणांकडे कल्पना, सर्जनशीलता आणि उत्कृष्ट जगाला आकार देण्यासाठी उत्तम ऊर्जा असते. तरुण पिढी आशेने परिपूर्ण आहे आणि नवकल्पना आणि कल्पनाशक्तीद्वारे ते समस्या सोडविणारे आहेत आणि जगात सकारात्मक सामाजिक बदल घडविण्याची मोठी क्षमता त्यांच्यात आहे.’ 
         मग आता आपल्याला आपल्या बाबीतत असलेलं नकारात्मक मत बदलायचं आहे. उरलेल्या ३०% जगाचं जे सकारात्मक मत आपल्या बाबीतत आहे ते पूर्ण १००% जणांना कळालं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य करायलाच पाहिजे. आणि हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा आपली तरुण पिढी ह्या साठी नीट पाऊल उचलेल. हीच ती खरी वेळ आहे जिथे आपण दाखवून देऊ शकतो, की तरुण पिढीची शक्तीही संपूर्ण जगासाठी एक विलक्षण शक्ती आहे. तरुणांकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला तोड नाही. या समाजातील कोणतीही शक्ती युवा पिढीच्या आदर्शवाद, उत्साह, ऊर्जा, धैर्य आणि सामर्थ्य या गोष्टींशी कधीच मेळ घालू शकत नाही. असं म्हणतात की, ‘तरुण पिढीचे चेहरे हे आपल्या देशाच्या भूतकाळाचे, आपल्या वर्तमान आणि भविष्याचे चेहरे आहेत.’ कोणत्याही देशातील तरूण पिढी ही त्या देशाची मोठी संपत्ती असते हे सर्वज्ञात सत्य आहे. तरुणांची बुद्धिमत्ता आणि कार्य देशाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. प्रत्येक नागरिक देशाच्या विकासासाठी जितका जबाबदार आहे तितकाच जबाबदार आजचा तरुण वर्ग देखील आहे. हे पटवून द्यायची आता खरंच ही काळाची गरज आहे. आज कदाचित आपण एखाद्या गोष्टीचं फक्त भागीदार असू, पण उद्या आपण प्रगतिशील देशाचे एक उत्तम लीडर असू, चांगले नेते असू. असं म्हणतात की छोट्या गोष्टींपासून मोठ्या बदलांची सुरुवात होते. आपल्याकडे आपल्या तरुण पिढीकडे ची उर्जा आहे खूप उत्साह आहे हे जगाला कळलं पाहिजे. आपल्याकडे कोणत्याही वातावरणात शिकण्याची आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. आपल्याला बदल घडवायचा हा बदल घडवण्यासाठी आपल्याला सेलिब्रिटी किंवा सुपरस्टार व्हायची गरज नाहीये..
 "All the power is within you; You can do anything & everything believe in that; Don't believe that you are weak, Stand up and express the divinity within you' असं स्वामी विवेकानंदानी सुद्धा नेहमी आपल्याला सांगितले आहे. 
  बदल घडवून आणायचा म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडला असेल... बदल घडवायचा म्हणजे नेमके काय करायचं?.. तर आपण जो स्वतःला बांध घातलाय (आपण एवढेच करू शकतो, आपल्याला बरं एवढंच जमतं!)...त्याच्या पल्याड काहीतरी करायचं, त्याहुन वेगळा विचार करायचा आहे, ह्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. नवीन काहीतरी प्रॉडक्टिव करायचं. सध्याचा काळ असा आहे की आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. स्वतः वर खूप चांगलं काम करू शकतो, प्रॉडक्टिव काहीतरी नवीन करू शकतो जे आपण कधीच केले नाही ते करू शकतो. आपल्यात जी धमक आहे ती ओळखू शकतो. आजची तरुण पिढी काहीही करू शकते, आपण काहीही करू शकतो यावर आपला विश्वास असणं फार महत्त्वाचं  आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, आपल्याला जिथे आपलं करियर करायचं आहे, मग ते राजकारण असो क्रिकेट असो काहीही असो, या क्षेत्रातून आपण बदल घडवू शकतो. आपल्याकडे सोशल मीडिया नावाची एक गुरुकिल्ली आहे. या गोष्टीचा आपण खूप कमाल उपयोग करू शकतो. आपण जस इंस्टाग्राम वरती फेसबुक वर नेहमी स्क्रोल करुन रिफ्रेश करतो नवीन पोस्ट साठी. सध्या असंच काहीसं आपल्याला जगासाठी करायच आहे,या आपल्या देशासाठी करायचं आहे, सध्या आपल्या देशाला नवीन विचारांची गरज आहे, रिफ्रेशिंग आयडिया ची गरज आहे, "RESTORE FREEDOM, RENEW POWER & RECLAIM YOUR VOICE"  आणि हे फक्त तरूण पिढीच करु शकते आपल्या तरुण पिढीकडे एक खूप कमाल गोष्ट आहे. आपण चुका मान्य करतो आणि त्या चुका पुन्हा होणार नाही ह्या साठी नेहमी स्वतः ला तयार करतो. पण आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा कधीच नाही करत, आपण समोरच्याच ऐकून घेतो समोरच्याचं म्हणणं समजून घेतो ही आपल्या तरुण पिढीची खरी ताकद आहे.
    मला माहित आहे आपल्या तरुण पिढीला कोणत्या प्रोब्लेम्स् चा सामना करावा लागतोय. डिप्रेशन, कन्फ्युजन, वेळेचे नियोजन या गोष्टींवर आपण काम करु शकतो. हे अडथळे नाहीयेत हे प्रॉब्लेम्स नाही; हा तुमच्या विकासाच्या वाटेवरचा एक टप्पा आहे जो आपल्याला पार करायचा आहे आणि आपण तो पार करतो. आपण मेडिटेशन केलं पाहिजे, आजचा तरुण जिम करतो, व्यायाम करतो, त्यामुळे आपली पर्सनल स्ट्रेंथ वाढते. आपला mindset खूप छान बदलतो.
    आपण आपल्या नंतर च्या पिढी साठी एक चांगलं उदाहरण स्वतःच्या रुपात ठेवू शकतो.  आपण त्यांना सुद्धा प्रोत्साहित करू शकतो, त्यांना मदत करू शकतो.  असं म्हणतात, इतिहास हा वेड्या नीच घडवलाय आणि ह्या वेडेपणाची ताकद फक्त तरूण पिढी मध्ये आहे. History has always been shaped by power of Youth. .... आणि एका महान व्यक्ती ने म्हंटलच आहे "थोडासा पागलपन महानता के लिए जरूरी है।"    
    आता ना हे "असं म्हणतात " हे सुद्धा बदलायची गरज आहे, हे आमच्या कडे "असंच म्हणतात" ह्या पासून सुरुवात झाली पाहिजे. 
   चांगल्या विचारानी जसा भावनेत बदल होतो,
तसच एका चांगल्या कृतीने आपल्या भविष्यात बदल होतो..

Comments