गोष्ट लंबॉर्गिनीची...!

     जगप्रसिद्ध असणार्‍या गाड्यांच्या ब्रँड पैकी लेम्बोर्गिनी हे नाव आपणा सर्वांना माहित असेल. आज ही कंपनी ज्या शिखरावर आहे तिचं तिथे पोहोचण्याचे रहस्य काय असेल ? हेच मी आज सांगणार आहे
लेम्बोर्गिनी ही कंपनी सुरू केली फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी ह्यांनी. फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांनी फरारीच्या मालकाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आपली स्वतःची कंपनी सुरु केले.

           फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांचा जन्म इटली मधल्या सेंट्रो शहरात 24 एप्रिल 1916 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अँटनीओ लॅम्बोर्गिनी होते. त्यांचे वडील शेती करुन घर चालवायचे. फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांना लहानपणापासून गाड्यांमध्ये खूप आवड होती. त्यांचं स्वप्न होतं की आपल्याकडे खूप गाड्या असाव्यात आणि त्यांना मेकॅनिकिंग मध्ये पण खूप रस होता. म्हणून त्यांनी आपल पुढील शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर म्हणून केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिल्या महायुद्धात एअर फोर्स मध्ये मेकॅनिकल सुपरवायझर म्हणून काम केले. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ते आपल्या गावी परत आले आणि त्यांनी एक छोटासा गॅरेज सुरू केले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे गॅरेज थोडाफार चाललं. पहिल्या महायुद्धानंतर इटलीत परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे खूप लोक शेती करत असे आणि तेव्हा ट्रॅक्टरची मागणी खूप होती म्हणून फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी ट्रॅक्टर निर्माण करण्याची कंपनी सुरू करायची असे ठरवले. 1948 मध्ये हे त्यांनी त्यांची कंपनी सुरू केली आणि कंपनीला लेम्बोर्गिनी trattori ही कंपनी सुरू केली. काही वेळानंतर त्यांचे ट्रॅक्टर विकू जाऊ लागले. वाढती मागणी आणि दमदार ट्रॅक्टर असल्यामुळे लवकरच त्यांची कंपनी इटलीत फार प्रसिद्ध झाली. प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत ही लॅम्बोर्गिनी trattoti झाली. ट्रॅक्टरचा उद्योग खूप चांगला चालत असल्याने त्यांनी 1959 मध्ये ऑइल रिफायनरी कंपनी सुरू केली. काही वेळातच ही कंपनी मोठी झाली. फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी हे नाव या बिझनेस मध्ये खूप मोठे झाले. सुरुवातीपासून त्यांना गाड्या घेण्याची आवड असल्यामुळे त्यांनी हळूहळू त्यांच्या स्वताच्या कार विकत घेतल्या. त्यानंतरच जसाजसा व्यवसाय चालत होता व नफा मिळत होता तेव्हा त्यांनी त्यांच्या आवडती गाडी फरारी 250 विकत घेतली. ही गाडी त्यांची खूप आवडते गाडी होती. गाडी विकत घेतल्यानंतर त्यांनी त्या गाडीवर काही ना काही काम सुरू ठेवले एकेदिवशी त्यांना गाडीत मोडिफिकेशन करताना इंजिन मध्ये आणि क्लोज पॅड मध्ये काही खराबी दिसून आल्या . तेव्हा त्यांना हे कळून आले की जर या गाडीमधील समस्या दूर झाल्या तर जगातील सर्वात मोठा फायदा होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी हे सांगण्यासाठी मालक एन्झो फेरारी यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांना अपमानास्पद बोलले गेले.
     एन्झो फेरारी त्यांना बोलले तुम्ही फक्त ट्रॅक्टर चालवू शकता तुम्हाला फेरारी बद्दल काही कळणार नाही. हे ऐकल्यानंतर फेरूक्रिओ लेम्बोर्गिनी यांनी स्वतःची कार कंपनी निर्माण करण्याच ठरवलं. फेरूक्रिओ लेम्बोर्गिनी यांना मालकाला अद्दल घडवायची होती. म्हणून त्यांनी इटलीच्या अगातो शहरात एक ऑटो फॅक्टरी सुरू केली. त्यावेळेस त्यांची कंपनी घाटात चालली होती. म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचे काही शेअर्स विकून कार बनवण्याची कंपनी सुरू केले. नंतर त्यांनी 1963 मध्ये लेम्बोर्गिनी ऑटोमोबाईल या नावाने कंपनी रजिस्टर केले. त्यानंतर लेम्बोर्गिनी ने पुढल्या एक वर्षात आपली पहिली गाडी लेम्बोर्गिनी 360GT लॉंच केले. लेम्बोर्गिनी चा गाड्या 1966 मध्ये लोकांच्या पसंतीस आल्या कारण तेव्हा लेम्बोर्गिनी ने एक गाडी लॉन्च केली होती तिचे नाव लेम्बोर्गिनी मिऊरा होते. वाढती मागणी आणि हाय परफॉर्मन्स लेम्बोर्गिनी ची मागणी खूप वाढली त्यानंतर लेम्बोर्गिनी कंपनीने मागे वळून पाहीले नाहीये. ही होती लॅम्बोर्गिनी या कंपनीची सक्सेस स्टोरी.

- विद्देश शेट्टे

Comments