"चपळ ससा आणि कष्टाळू कासव.."


     "बोलणाऱ्याची माती विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेसुद्धा विकले जात नाही !"

      बाळ एक वर्षाचं झालं की आजूबाजूच्या वातावरणातून सतत कानावर पडणारा एखादा शब्द ते अडखळत उच्चारत आणि संपूर्ण घरात बाळ बोलू लागलं असं म्हणून हर्शोल्हास साजरा केला जातो. ही परिस्थिती तुमच्यासाठी काही नवी नसली तरी २१ व्या शतकात खरच फक्त "बोलता येणं" हे पुरेसं आहे का ??


        सध्या जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यापासून ते रस्त्यावर स्टॉल लावून सामान विकणाऱ्या शेठ पर्यंत प्रत्येकच जण उत्तम रित्या बोलून कमी वेळात जास्त काम करून दाखवणाऱ्या लोकांच्या शोधात आहे. आणि या शोधात साधा सरळ, कष्टाळू, नेहमीच कामात व्यग्र असणारा इसम आता कुठेतरी हरवल्याच दिसून येतं.. अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना हल्ली "old school" किंवा "old fashioned" असं देखील म्हटलं जातं. फक्त उत्तमरित्या बोलता येत नाही, किंवा बोलून समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पाडता येत नाही ह्या एकमेव गोष्टीमुळे हल्ली लोकांच्या वर्षानुवर्ष चालत आलेले business ठप्प पडतात. कितीही टॅलेंट असलं तरी ह्या एकमेव कमतरतेमुळे साऱ्या जगासमोर तुम्हाला मागे ढकललं जाते. ह्यावर उपाय एकच तो म्हणजे स्मार्ट वर्क करून " उत्तमरित्या बोलण्याच्या पद्धती विकसित करून घ्या" 

        जवळपास सगळ्यांनाच ससा आणि कासवाची गोष्ट माहीत असेलच. त्या शर्यतीत कासवाच्या जिंकण्याकडे जरी खरेपणाचा विजय असं म्हणून पाहिलं गेलं असलं तरी आता मात्र परिस्तिथी बदलली आहे. आता शर्यत सुरू होण्यापूर्वीच तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बोलण्याच्या पद्धती वरून तुम्ही शर्यतीत भाग तरी घेऊ शकता की नाही हे निश्चित केले जाते. आणि मग शर्यत सुरू होण्यापूर्वीच किंबहुना शर्यतीत उतरण्यापूर्वीच तुमचा पराजय ठरलेला असतो. पण इतकं सगळं असूनही काही चपळ ससे ह्या शर्यतीत भाग कसा घेऊ शकतात किंवा विजयी कसे होऊ शकतात !! तर हे सारं त्यांना जमतंय एका अद्भुत कलेमुळे... 

तुम्हाला चपळ ससा व्हायचे आहे की कष्टाळू कासव..??

    तुम्हाला चपळ ससा होण्यासाठी फक्त ह्या सात सवयी आत्मसात कराव्या लागतील.. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक शर्यतीत तुम्हाला हक्कांन सहभाग मिळवून देण्यासाठी ह्या सवयीच मदत करतील....

१. आधी श्रोता व्हा - उत्तम वक्ता होण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक उत्तम श्रोता होणं ही आहे. तुम्ही कसे बोलता याआधी तुम्ही किती ऐकता ह्याचं कळत किंवा नकळत पण निरीक्षण केले जाते. शिवाय नंतर बोलण्यासाठी मुद्दे लक्षात यायला हवेत.. आणि नेमके त्यासाठी शांतपणे समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकायला हवं.

२. समोरच्या व्यक्तीचे वाक्य तुम्ही पूर्ण करू नका - एक उत्तम श्रोता कधीच समोरच्या व्यक्तीचे बोलणे मध्ये तोडत नाही. त्याचसोबत एक उत्तम वक्ता कधीच समोरच्याचे वाक्य स्वतः पूर्ण करत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्याच्या बोलण्यात रस नाही किंवा तुम्हाला काहीतरी घाई आहे असा त्याचा प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही बोलत असताना लोक तुमच्यासोबत सुध्दा तसच वागण्याचा प्रयत्न करू लागतात.

३. ऐकताना उत्सुकतेने ऐका - समोर असलेली व्यक्ती बोलत असताना त्याचं बोलण तुम्ही ज्या उत्सुकतेने ऐकता त्याच ऊर्जेमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्ही घर करून जाता. हल्ली धावत असणाऱ्या जगात कोणालाही कोणाच्याही आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात रस नाही आणि त्यामुळे तुमचं उत्सुकतेने ऐकून घेणं समोरच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरू शकतं.

४. नजरेचा योग्य वापर करा - बऱ्याचदा समोरचा माणूस बोलत असताना आपण संपूर्ण वेळ एकटक त्याच्याकडे बघत असतो ज्यामुळे त्याला बोलताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. याउलट समोरचा व्यक्ती बोलत असताना तुम्ही एकदाही त्याच्याकडे न बघणे हे दर्शवते की तुमचे त्याच्या बोलण्याकडे अथवा त्या व्यक्तीकडे काहीही लक्ष नाही. त्यामुळे योग्य आणि समोरचा व्यक्ती कंफर्टेबल असेल असाच आय कॉन्टॅक्ट ठेवा. 

५. बोलण्याआधी विचार करा/ वेळ घ्या - आपण react होण्यासाठी ऐकत असतो, पण आपण respond करण्यासाठी ऐकायला हवं. समोरच्याच बोलून पूर्ण झाल्यावर साधारण ३० सेकंद त्याच्या वक्तव्यावर विचार करा आणि मगच त्यावर respond करा.

६. बॉडी लँग्वेज शिका - माणूस ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस त्यांच्या तोंडासोबतच त्याची संपूर्ण बॉडी त्याच्या वक्तव्य त्याचं, म्हणणं, त्यातली इंटेन्सिटी समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे बोलत असताना शब्दां एवढच लक्ष संपूर्ण शारीवर सुद्धा असू द्या. 

७. ऐकणाऱ्याचा आदर करा - ज्या प्रमाणे कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी उलट सुलट बोललेल तुम्हाला आवडणार नाही, किंवा कोणीतरी उगाच येऊन तुमच्या कामाव्यतिरिक्त बडबड करून तुमचा वेळ वाया घालवलेल
तुम्हाला आवडणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही ह्यापैकी कोणतीही गोष्ट इतरांसोबत करणार नाहीत ह्याची काळजी घ्या. 

कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना किंवा जाणून घेताना ती नेहमीच कठीण वाटते. त्या अर्थाने "उत्तमरित्या बोलण शिकण्यासाठी उत्तम श्रोता होणं.. " हे थोडं कठीण वाटत असेलच. पण कोणत्याही चांगल्या रिझल्ट साठी कष्ट हे घ्यावेच लागतात. "सुरुवात करा... मार्ग आपोआप सापडेल..!" शर्यतीत धावयलाच हवे किंवा धावून जिंकायलाच हवं असही नाही. स्वतः मधील काही विशिष्ट अशा, वेगळ्या असे कला, गुण शोधा त्यांना जोपासा सोबतच communication skills, public speaking, stage fear ह्या अशा दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्वपूर्ण ठरणारी कौशल्य शिका, आत्मसात करा... आणि मग चपळ ससा झालात काय किंवा कष्टाळू कासव झालात काय यश हे तुमचंच असेल.

तुम्हाला पडणाऱ्या अशाच अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि स्वतः मध्ये हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी Blogger वर follow करा Versatile Educaare System ला आणि विचार करा तुम्ही चपळ ससा आहात की कष्टाळू कासव ??

Follow now  VES BLOGGER

Also join our Facebook group to know more !!



Comments