"संस्काराचे विद्यापीठ !" ( भाग - २ )


          शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना ही शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे, त्यासाठी भरपूर वाचन , भरपूर श्रवण करायला हवे . आपल्या दैनदिन अध्यापनात त्याचा वापर करावा. 


        एका महान शिक्षकास विद्यार्थी कायम लक्षात ठेवतो आणि त्याची काळजी घेतो. शिक्षकांचा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम होतो आणि महान शिक्षक विद्यार्थ्यांना महानतेकडे प्रेरित करतात. यशस्वी होण्यासाठी, एक महान शिक्षक असणे आवश्यक आहे आणि असे महान शिक्षक होण्यासाठीही महत्वाची कौशल्ये अंगी बाळगणे आवश्यक पाहूया ती उपयुक्त कौशल्ये पुढील प्रमाणे : 
1. एक आकर्षक व्यक्तिमत्व आणि अध्यापन शैली
२. धड्यांची स्पष्ट उद्दिष्ट्ये
3. प्रभावी शिस्त कौशल्य
४. उत्तम वर्ग व्यवस्थापन कौशल्य
५. उत्तम संवाद कौशल्य
६. अभ्यासक्रम आणि मानकांचे ज्ञान
७.संयम
८. अनुकूलनक्षमता
९. कल्पनाशक्ती
१०. कार्यसंघ
११. जोखीम घेणे
१२. सतत शिकणे
१३. चांगले संप्रेषण कौशल्य
१४. उत्तम मार्गदर्शक
१५. नेतृत्व कौशल्य 

 आपण मागच्या लेखात पाहिले की शिक्षक हा खऱ्या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो मग पाहूया अश्या शिक्षकांच्या गुणांना : 
१. शिक्षक हा शि म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असावा. 
२. शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे . स्वतःचे विषयात पारांगता प्राप्त करून घ्यावी. 
३. शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत करावे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. 
४. शिक्षकाला विद्यार्थ्यानं बद्दल आत्मनित्ता आणि प्रेम असावे. 
५. शिक्षक हा नवनिर्मितीचा प्रसारक व निर्माता असावा. 
६. न्याय , समानता , समता , बंधुता , धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्ये विथ्यार्थ्याच्या समोर ठेऊन शिक्षकाने स्वतःलाही विकसित करावे. 
७. शिक्षकाने स्वतः क्रियाशील व उपक्रमशील असावे व विद्यार्थ्यांना क्रियाशील राहण्यासाठी प्रेरणा द्यावी. 
८. विद्यार्थ्यांवर आपले विचार न लादता शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनाचा आधर करावा. 
९. शिक्षकाने आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर बिंबवणे. 
१०. शिक्षकाने श्रमनिष्ठा जोपासावी. 
११. शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे. 
१२. शिक्षक साहसी , धेर्यवान, परोपकारी वृत्तीचा असावा. 
 
          शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भावनांचा आदर करावा . विद्यार्थ्यांची स्तुती, कौतुक करून त्यांना उत्तेजन द्यावे.
   
           एक निकृष्ठ शिक्षक ‘ सांगत जातो ‘एक सामान्य शिक्षक' स्पष्टीकरण करतो‘ आणि  एक चांगला शिक्षक प्रत्याशिक करतो आणि खरा थोर शिक्षक प्रेरणा देतो.

" अध्यापन हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे"
"एक शस्त्र आहे, जगाला बदलण्यासाठी"
चला मग अश्याच शस्त्राला हाती घेऊ, विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आपले योगदान देऊ व गर्वाने बोलू मी शिक्षक आहे . 
"हो मी शिक्षक आहे" 

धन्यवाद!

- धनश्री परब

Comments

Post a Comment