यशाचे नऊ रहस्य !

      ह्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकालाच यशस्वी व्हावे असे वाटत असते, आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची आणि गुणांची आवश्यकता असते.. आज आपण असेच काही गुण पाहणार आहोत जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील...


१. निश्चित ध्येय
यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे निश्चित ध्येय किंवा आपल्याला काय पाहिजे याच स्पष्ट ज्ञान. जे लोक यशस्वी होतात ते एकच ध्येय समोर ठेवून मेहनत करतात आणि यशस्वी होतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्या शिवाय ते मिळणार कसं? एक ध्येयच समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही आपण गेलो तरी पोहोचणार कुठे? त्यामुळे ध्येय निश्चित करा आणि कामाला लागा..

२.प्रयत्न आणि चिकाटी
आपल्याला एक सवय असते, आपण २-३ वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आपण तो विचार सोडतो.. पण हेच आपण चुकीचं करतो.. जेव्हा आपलं ध्येय ठरलेले असेल तर कितीही वेळा अपयश आले तरी प्रयत्न चालू ठेवायचे आणि चिकाटीने ते ध्येय मिळवायचे..

३. सकारात्मक दृष्टीकोन
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपयशाकडे एका सकारात्मक दृष्टीकोनातून बघायचे आणि त्यातून सकारात्मक शिकवण घेऊन ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवायची आणि नाही शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाका.

४.आत्मविश्वास
आत्मविश्वास हा तुमच्यात मध्ये सकारात्मक असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट जी तुमच्या ध्येयासाठी महत्वाची आहे ती पूर्ण करू शकता...

५.मोटीव्हेटर
मोटीवेशन हा गुण तुमच्यात असायला हवा. स्वतःला आणि लोकांना, कर्मचाऱ्यांना, मित्रांना सतत प्रेरणा देत राहणं. तुम्हाला बघून तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे.

६. संवादक
तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असायला हवे. आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून सांगण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल हा महत्वाचा गुण असायला हवा..मग तुमचं कम्युनिकेशन हे फोनद्वारे असो, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष.

७. प्लॅनिंग
प्लॅनिंग हा खूप महत्त्वाची स्किल तुमच्यात असायला हवी.. आपले ध्येय शिखरापर्यंत पोहचवण्यासाठी प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचे ठरते..तुम्हाला स्वतःचे आणि स्वतःच्या जीवनाचे आर्किटेक्ट बनता आले पाहिजे..

८.तंत्रज्ञानी
आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला टेक्नॉसव्हीं असले पाहिजे.. टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करावा याची योग्य माहीती तुम्हाला असायला हवी.

९.रिस्क टेकर
रिस्क टेकर हा खूप महत्त्वाचा गुण तुमच्यात असायला हवे. खूप विचार करणारा, घाबरणारा व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

आणि सगळ्यात महत्वाचं हे नऊ गुण आत्मसात करतानाच आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्मसात करायला हवी आणि ती म्हणजे... "सतत शिकत राहणे.."
सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची कला तुमच्यात असायला हवी.. तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला नवीन नवनवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः ला वेळ दिला पाहिजे..

ह्याच बरोबर तुमचं कामात असलेलं सातत्य, तुमचा दृष्टीकोन, तुमचा पोसिटिव attituted हे सर्वात महत्वाचे गुण तुमच्यात असतील तर तुम्ही यशस्वी नक्की होऊ शकता... आपल्या सर्वात हे गुण कमी जास्त प्रमाणात असतात.. जे गुण कमी असतात ते सततच्या सरावाने आपण हे गुण विकसित करू शकतो..

Comments