संघर्षापासून यशापर्यंत..!!

नमस्कार !

माणूस कितीही गरीब व वाईट परिस्थिती मध्ये असला, तरी श्रीमंत विचार म्हणजे मोठी स्वप्न आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असली, की सगळ्या परिस्थितीवर मात करून आपली स्वप्न पूर्ण करून तो त्याचं ध्येय गाठू शकतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी आपण या लेखात वाचणार आहोत. आज आपण खूप अडचणीच्या परिस्थितीत आहोत... वाईट दिवस सुरू आहेत... मला नशीब साथ देत नाही... आता आहोत त्याच परिस्थितीला तोंड देणे हेच माझ्या हातात आहे !! असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा ! आपण कर्नाटकच्या एका विद्वान "नारायण स्वामी" यांची जीवन कहाणी वाचुयात म्हणजे तुम्हाला नक्कीच पटेल की मनात दृढनिश्चय असेल उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर एकनिष्ठ एकाग्र लक्ष असेल आणि विचारांना निश्चित दिशा असेल तर काहीही शक्य आहे.


वर्षे १९८६ एकोणीस वर्षाचा एक मुलगा एक जोडी कपडे घेऊन कर्नाटकचा कोल्लार जिल्ह्यातून बंगलोर शहराकडे निघाला. ना डोक्यावर छप्पर ना दोन वेळचे अन्न मात्र उराशी एक स्वप्न शाळा सुरू करायला हवी. ह्या जिद्दी पुढे शेवटी नियतीने हात टेकले, कारण खिशात एक दमडीही नसताना आपल्यावर आलेली ही परिस्थिती अजून कोणावर येऊ नये म्हणून शाळा सुरू करण्याचं स्वप्न नारायण स्वामी बघत होते. ते स्वप्न काय त्यांना झोपू देत नव्हते.... त्यात तीस वर्षांपूर्वी जेव्हा नारायण स्वामींचे आई वडील वारले तेव्हा स्वामी बारावीची परीक्षा देत होते. पालकांची इच्छा असते माझा मुलगा शिकून मोठा व्हावा तसेच नारायण स्वामी यांच्या आई वडिलांची इच्छा होती नारायण स्वामी डॉक्टर व्हावे. म्हणून नारायणस्वामी यांनी डॉक्टर होण्याची तयारी सुरू केली होती. मात्र आई वडील वारल्यामुळे स्वप्न भंगले आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष नारायण स्वामींच्या वाट्याला आला. संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना नारायण स्वामी सांगतात "त्तीस वर्षापूर्वी मी जेव्हा गावातुन निघालो तेव्हाच ठरवलं होतं शिकण्याची इच्छा असलेल्या मुलांना माझ्यासारखा संघर्ष करण्याची वेळ यायला नको... जेवणाऐवजी पाणी पिऊन भूक मारणं काय ते मी जाणतो.." शिक्षकी पेशात शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये जात असताना नारायणस्वामीनी बरोबरीने छोटीमोठी कामं चालू ठेवली पुढे एका प्राथमिक शाळेत नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना शाळा सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं शिक्षकी पेशाचा पगार शाळा सुरू करण्यासाठी पुरेसा नव्हता म्हणून त्यांनी वडिलोपार्जित संपत्ती विकली आणि काही कर्ज घेतले.

१९९० साली पाच विद्यार्थ्यांना घेऊन स्वामींनी "विद्योदय हाय्यार" प्रायमरी स्कूल ची स्थापना केली. कमी खर्चात मुलांना गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर आणि एक वेळेस जेवण देता यावं ही त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. मुलांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच वैयक्तिक विकासाकडे कसे लक्ष देता येईल असा उद्देश नारायण स्वामीच्या शाळा सुरू करण्यामागचा होता मात्र नंतर आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण झालं. शेवटी अथक प्रयत्नांना मदतीची जोडही मिळते तसेच १९८८ साली कर्नाटक सरकारकडून १२ शिक्षकांच्या वेतनापोटी अनुदान मिळाले आणि नारायण स्वामी यांच्यावरील थोडासा हा भार हलका झाला. 

बिकट परिस्थिती, वाईट परिस्थिती व गरिबी असली, तरी विचार मात्र आपले श्रीमंत आणि आपली स्वप्न मोठी आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी असेल तर आपण काहीही करू शकतो ह्यासाठी नारायण स्वामी हे त्यामधील एक उदाहरण आहेत. नारायण स्वामी ना जे जमलं ते तुम्हाला सगळ्यांना का नाही जमणार फक्त एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे स्वप्न पाहण्याची !! स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची आणि अथक प्रयत्न करण्याची...

धन्यवाद !

- अंकिता पेंडुरकर

Comments