टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

आज काल आपण नेहमीच ऐकतो की, आज मार्केट मध्ये ही टेक्नॉलॉजी आलीय, हे मशीन आलंय, न्यू मॉडेल चा मोबाईल आलाय , कार आलीय आणि हे सतत चालूच असते..



पण नक्की टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

      माणसांनी तयार केलेली अशी वस्तू किंवा यंत्र, ज्यामुळे माणसांच काम सोपे सोयीस्कर आणि कमी कष्टाचे होते. अनेकदा आपण ह्या टेक्नॉलॉजीचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण आता हीच टेक्नॉलॉजी माणसाला वापरत आहे....
म्हणजे आता असा प्रश्न पडतो की, मानवाने यंत्राला बनवलय की यंत्राने मानवाला ?? हल्ली असं वाटायला लागलंय की
ह्या टेक्नॉलॉजी ने माणसाला बनवलं आहे कारण मानवाने त्या टेक्नॉलॉजी चा वापर करत राहावं.
टेक्नॉलॉजी मुळे माणसांचे जीवन सुखकर, सोपे आणि प्रगत होत आहे.....सर्वच क्षेत्रांमध्ये ह्या टेक्नॉलॉजीचा वापर होतोय मग ते शिक्षण, शेती, मनोरंजन, सायन्स, औद्योगिक असे कोणतेही क्षेत्र असो.... . ह्या पेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनात सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत टीव्ही, फ्रीज, कूलर, मोबाईल, कार अशा टेक्नॉलॉजी म्हणजेच यंत्रांचा वापर करत असतो..

       प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसच ह्या टेक्नॉलॉजीचे देखील आहे, कारण ह्याच जेवढे फायदे आहेत तितकेच तोटे ही आहेत पण रोजच्या धक्का धक्कीच्या जीवनात आपण त्याचा आपण विचार करत नाहीत.

         टेक्नॉलॉजीचा वापर हा कमीत कमी व्हावा असा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. कारण माणसाचा मेंदू हा टेक्नॉलॉजी वर अवलंबून राहायला लागला आहे.. आणि ह्यात सर्वात वरच्या स्थरावर आहे ते सोशल मीडिया, हे असे माध्यम आहे जे माणसांना माणसापर्यंत पोहचवत आहे( हा फक्त आपला समज झाला आहे)
काही दिवसापूर्वी एक आर्टिकल वाचलं त्यात सागितलं होत की, मोबाईल मध्ये जास्त कोणते अँप वापरले जातात तर सोशल मीडिया.. टॉप १० अॅप मध्ये हेच अँप आहेत जे आपण रोज वापरत असतो, व्हॉटसअप, इंस्टा, एफबी, ट्विटर इत्यादी..

        ह्या सर्व टेक्नॉलॉजी चा वापर आपण मर्यादित केला तर ही टेक्नॉलॉजी आपल्याला वापरणार नाही... आणि आपण त्याचा योग्य रीतीने उपयोग करू शकतो आणि हवे ते रिझल्ट मिळवू शकतो.

       त्यासाठी काही सवयी आहेत ज्या आपण लावल्या तर आपण नक्कीच हवं ते मिळवू शकतो..
म्हणजेच,
१. अश्या अँपचाच जास्त वापर करा, ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे.
२. लोकांशी संवाद साधण्यासाठी वेळ ठरवा आणि त्याच वेळी मोबाईलचा ( सोशल मीडिया चा) वापर करा.
३. टीव्ही, संगणक आणि इतर इलेक्टरॉनिक्स वस्तूंचा ही वेळ फिक्स करा. आणि ह्या साठी अशी वेळ निवडा ज्या वेळी तुमची सर्व महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली असतील.
४. जास्त वेळ हा निसर्गाच्या सानिध्यात, व्यायाम, पुस्तके वाचण्यात, नवीन काही शिकण्यात घालवा.

     वाचताना, किंवा विचार करताना कठीण वाटणाऱ्या ह्या गोष्टी सवयीच्या झाल्या की मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर झालेलं असेल.


धन्यवाद!

- स्नेहा जोगले





Comments

  1. Great information thanks for sharing while reading it i recognized that i have followed some rule in this lockdown period

    ReplyDelete

Post a Comment