प्रो- अॅक्टिव्ह व्हा- पुढाकार घ्या !

प्रो- अॅक्टिव्हनेस ही स्टीफन आर कोव्हीं यांच्या The Seven Habbits of Highly Effective People ह्या पुस्तकातील पहिली सवय आहे. प्रो- अॅक्टिव्हनेस म्हणजे पुढाकार घेणे ही सवय परावलंबन म्हणजे मन विजयाची पहिली पायरी आहे.



मनुष्याकडे आपले आत्मभान किवा आपल्या विचारप्रक्रियेचा विचार करण्याची क्षमता आहे त्यामुळे माणूस सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेऊ शकतो व प्रगती करू शकतो. आणि ह्याच आत्मभानामुळे आपण आपले विचार, आपल्या सवयी व त्याचा स्वतःवर , इतरांवर आणि परिस्थितीवर होणारा परिणाम तपासून पाहू शकतो.
माणसाची होणारी जडण - घडण ही तीन संकल्पनेवर आधारलेली आहे. त्यातली पहिली म्हणजे वाशिंक हेतुमुलकता- म्हणजे पूर्वजांकडून तुमच्यात आलेले गुण. दुसरं म्हणजे मानसिक हेतुमुलकता- म्हणजे असे गुण जे थेट तुमच्या पालकांकडून आलेले असतात. आणि तिसरं म्हणजे पर्यावरणीय हेतुमुलकता- म्हणजे आसपासच्या घटकांमुळे तुम्ही अमुक प्रकारचे वर्तन करता. ह्या तिसऱ्या संकल्पनेचा आपल्या सवयींवर जास्त परिणाम होतो आणि अशा सवयी बदलण्यासाठी आत्मभान म्हणजेच स्व- परिक्षणाची माणसाला जास्त गरज असते.
प्रो- अॅक्टिव्हनेस
प्रो- अॅक्टिव्हनेस म्हणजेच पुढाकार घेण्याची वृत्ती. पुढाकार घेणे म्हणजे पुढे रेटणे नव्हे किंवा आक्रमक होणे नव्हे तर गोष्टी घडवून आणण्यासाठी जबाबदारी घेणे. काही व्यक्तींमध्ये ही वृत्ती निसर्गत: च असते अशा व्यक्तींना अग्रकर्मी व ज्यांच्यात ही वृत्ती कमी असते किंवा नसते त्यांना प्रतीकर्मी ( प्रतिक्रियावादी) म्हणतात. अग्रकर्मी व्यक्तींवर बाहेरील वातावरणाचा, क्षणिक मोहाचा, अपयशाचा काहीही परिणाम होत नाही. आयुष्यात येणाऱ्या दुःखाला, संकटाला हे लोक सामोरे जाऊ शकतात. कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ते आपले R आणि I (Resourcefulness and Initiative) ह्याचा वापर करून मार्ग काढतात. ह्याउलट असतात प्रतिकर्मी व्यक्ती अशा व्यक्तींवर बाहेरील वातावरणाचा लगेच परिमाण होतो, खूप भावनिक व बचावात्मक वृत्ती, कमी आत्मविश्वास, संकटाना सामोरे न जाणं अशा व्यक्ती ह्यात येतात.
आपल्या आयुष्याचा समतोल राखण्यासाठी प्रो- अॅक्टिव्हनेस ची आवश्यकता असते. आपली वृत्ती व वर्तणूक ही अग्रकर्मी करण्यासाठी आपल्या भाषेवर लक्ष दिले पाहिजे.. ह्याचे एक उदाहरण म्हणजे,
प्रतीकर्मी व्यक्ती - "मी काहीही करू शकत नाही."
अग्रकर्मी व्यक्ती - "कोणते पर्याय आहेत का ते पाहूया."
अशा प्रकारच्या भाषेने आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
आपले पुढाकार घेऊन काम करण्याचं प्रमाण किती आहे याबद्दल आत्मभान जागवायचा एक उत्तम मार्ग आहे तो म्हणजे आपला वेळ आणि ऊर्जा आपण कुठे केंद्रित करतो ह्याचे परीक्षण करणे.
आपण नेहमी दोन वर्तुळात आपली ऊर्जा व वेळ घालवत असतो. त्यातली पहिली म्हणजे काळजीचे वर्तुळ व दुसरे म्हणजे प्रभावाचे वर्तुळ. काळजीचे वर्तुळ आपण सतत करत असलेल्या चिंता, समस्या, कुटुंबाचे प्रश्न, ऑफिस चे टेन्शन, नकारात्मक ऊर्जा ह्यानी भरलेलं असते. प्रतीकर्मी लोकांचं हे वर्तुळ मोठे असते. उलटपक्षी प्रभावाचे वर्तुळ हे सकारात्मक ऊर्जा, विचाराचे नियंत्रण, समस्यांवर मार्ग काढण्याची वृत्ती ह्यांनी भरलेलं असते. अग्रकर्मी म्हणजे प्रो- अॅक्टिव्हनेस लोकांचे हे वर्तुळ मोठे असते.
आपल्याला आपले प्रभावाचे वर्तुळ विस्तारण्यासाठी आपल्या समोर येणाऱ्या प्रश्नावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्या समोर तीन प्रकारचे प्रश्न येतात. प्रत्यक्ष नियंत्रण ( स्वतःच्या वर्तूनुकिशी संबंधित प्रश्न), अप्रत्यक्ष नियंत्रित ( इतरांच्या वागण्यासंबधित प्रश्न) , नियंत्रण नसलेलेल प्रश्न( ज्यांच्या संदर्भात आपण कधीच काहीच करू शकत नाही असे प्रश्न). हे सर्व प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आपल्या हातात असते, ती म्हणजे आपल्या सवयी बदलणे, प्रभावाची पद्धत व दृष्टीकोन बदलणं. तसेच प्रभावाच्या वर्तुळाच्या हद्यस्थानी काय असेल शब्द व बांधिलकी देण्याची आणि पाळण्याची क्षमता. स्वतःला व इतरांना दिलेला शब्द पाळून व आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीवर लक्ष देऊन, संयमी राहून प्रभावाचे वर्तुळ वाढवायला सुरुवात करायला हवी.
स्टीफन आर कोव्हीं हे ३० दिवसांची परीक्षा देण्याचे आव्हान देतात..त्यात ते सांगतात.. ३० दिवस तुम्ही तुमच्या प्रभावाच्या वर्तुळावर काम करा.. छोटी वचने द्या, ती पाळा. प्रकाश व्हा; न्यायाधीश नको. आदर्श व्हा; टीकाकार नको. उत्तराचा भाग व्हा; प्रश्नाचा नको. तुमच्या वैवाहिक आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी याचा प्रयोग करा. स्वतःसाठी वाद घालू नका. जेव्हा एखादी चूक कराल तेव्हा ती मान्य करा, सुधारा आणि त्यापासून शिका. ताबडतोब दोषारोप करण्याच्या, नावं ठेवण्याच्या मन: स्थितीत जाऊ नका. तुमचे ज्यावर नियंत्रण आहे अशा गोष्टीवर काम करा. स्वतः वर काम करा. असण्यावर काम करा. जेव्हा समस्या येतील तेव्हा थांबा आणि त्यावर विचार करा. तुमच्या भाषेवर लक्ष द्या. तुमच्या प्रश्नांवर लक्ष द्या आणि नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करा. ही तीन दिवसांची परीक्षा देऊन पहा. तुमच्या प्रभावाच्या वर्तुळात नक्कीच तुम्हाला फरक पडलेला दिसेल.

धन्यवाद!

- स्नेहा जोगले






Comments

  1. Nicely written....hard work alway pays...good work sneha....👌

    ReplyDelete

Post a Comment