कृष्ण.... २१ व्या शतकातला

"सत्य घटनेवर आधारित...!"




गोष्ट एका सतरा वर्षाच्या तरुणाची; हो अगदी बरोबर वाचताय...! सतरा वर्षाचा उत्साही तरुण
उराशी एक स्वप्न घेवून वावरत होता, त्याला तयार करायची होती अशी एक आद्य संस्था जी तरुणांना योग्य मार्गदर्शन देईल. खरतर
स्वप्नं होतं भारत देशासाठी पण सुरुवात केली मात्र एका १०-१० च्या खोलीतून आणि सोबत होते फक्त २ विद्यार्थी...!
लोकं नाही नाही ते बोलून टोकायचे.... नावं ठेवायचे
पण लोकांचं कामच ते....!!
मात्र तो तरुण खचला नाही, पुढच्याच वर्षी २ चे ९० विद्यार्थ्यांमध्ये त्याने जिद्दीनं रुपांतर केले.
विभागात नाव गाजू लागलं. लगातार काही वर्ष विभागातून दहावीला मुल पहिली येवू लागली.
पण स्वप्नं इथे पूर्ण झालं नव्हतं, आता तर खरी सुरुवात.....
आणि हे करत कोण आहे तर तोच 17 वर्षांचा मुलगा.
नवीन जागा घेतली, आकडे वाढत गेले, मुले उत्तीर्ण होत होती.
ह्या काळात ज्या वयात मुलांना मॅकडोनल, पिझ्झा, सोशल मीडिया, पिक्चर, फिरणं, महत्वाचं वाटायचं त्या वयात पुस्तकं वाचन, ट्रेनिंग घेणं हे काम तो करत राहिला
मात्र थांबला नाही. नवीन काहीतरी शिकायची आवड आणि स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ची जिद्द काय त्याला शांती देत नव्हती.
नुसत्या चहा वर दिवसरात्र मुलांना शिकवणारा तो १७/१८ वर्षाचा तरुण.
जगाच न ऐकता, स्वप्नासाठी झटत राहिला.
वरळी ते खारघर चा रोजचा प्रवास करत लोकलचे धक्के खात राहिला....
रात्री १०२ चा ताप असून ही सकाळी त्याच जिद्धी ने काम करणारा खरा हीरो (सुपरस्टार) आम्ही पहिला आहे.
मात्र जिद्द, चिकाटी कमी न होता.... वाढत गेली.
वर्ष उलटत होती, काळ पुढे जात होता...
काही नवे अनुभव घेण्यासाठी नवीन कामगिरी हाती घेतली; एवढा उत्साही मुलगा काम तर जोरदार करणारच.
स्वतः च्या बळावर नवीन कला, कौशल्य, शिकला.
आणि सर्वोच्च कामगिरी करू लागला.
जग मनोरंजनाच्या अधीन जात असताना तो तरुण मात्र नवीन नवीन उपक्रम शिकत होता इतकंच नाही तर शिकवतही होता.
स्वतःच तर खूप मोठं साम्राज्य होतच, सोबत सवंगडी ही होते...
हुशारी, जिज्ञासू वृत्ती या मुळे संपूर्ण भारतभर फिरला. ऑफिस कार ,फ्लॅट., व्यावस्थिस्त आयुष्य सुरू होत....
त्या तरुणाच एक तत्व आहे; "जेव्हा सगळं काही व्यावस्थिस्त सुरू असत तेव्हा नक्कीच काहीतरी चुकत असत...."

आयुष्यात असा एक काळ प्रत्येकाचा आयुष्यात येतोच ज्या मध्ये आपल्याला तत्व की मनोरंजन ह्या मधील एक निवडण्याची वेळ येते.

तुम्हाला काय वाटते बरं काय निवडलं असेल त्या तरुणाने..??
.
.
.
.
.
.
.
.
हो अगदी बरोबर.... "तत्व"

स्वतः च्या तत्वापायी ती कार, तो फ्लॅट, ते सूट बूट ते मनोरंजनपूर्ण, आयुष्य सोडून एक सरळ आयुष्य जगण्यास सुरू केलं.
परत तो लोकलचा वरली ते खारघर, वरळी ते मिरज इत्यादी प्रवास सुरू झाला.
अजिबात मनात कशाची खंत नाही. उलट उराशी अभिमान कारण आयुष्य भर तत्वा वर काम करणारा तो मुलगा..
आज तो तरुणान समोर एक आयडॉल म्हणून दिसत होता.
सोबत मात्र ते सवंगडी होतेच.
मग काय स्वतःचा साम्राज्य मध्ये आपल्या तत्वा वर काम करणं म्हणजे स्वर्ग सुख.
आहा आता मात्र तो तरुण कुठेही थांबला नाही, जोमाने कामे सुरू झाली,
नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत पोहचून, इतिहास लिहत राहिला.
एक विभाग, मग मुंबई, हळूहळू महाराष्ट्र भर पसरत गेला, स्वतःचा कामगिरीचे झेंडे रोवत गेला.
सोबत अनेक रोपटी होतीच, ज्यांना खत पाणी घालत, त्यांना मोठे करण्याचे काम करत राहिला, कशाची ही अपेक्षा न करत.
तुम्हाला माहिती आहे का त्या तरुणाची वय २७/२८ असावं मात्र भूमिका असख्या होत्या बाबा दादा सर गुरु खूप काही..
आणि हो कोणतीही भूमिका कुठेच कमी पडली नाही, लाड तिथे लाड आणि मार तिथे मार..कसलीही अपेक्षा न करता.

स्वतः सारखे काही तरुण गोळा केले एवढं मोठं स्वप्नं देशाचं मग सोबत समान स्वभावाची , वृत्ती ची मानस हवीच.

ह्या सोशल मीडिया चा युगात तो कृष्णा सारखा राहिला, इतरांना लढायला शिकवलं, जगायला शिकवलं.
आणि आताची पिढी ज्याला जास्त अधीन आहे म्हणजे सोशल मीडिया त्या पासून मात्र स्वतः लांबच राहिला.
आणि खरं सांगू का ते सवंगडी ही तसेच....
नो सोशल मीडिया....
बघा ना ह्या कलियुगात सतियुगतला कृष्णा आणि त्याचे त्याला पूर्ण अधीन गेलेलं सवंगडी सुद्धा...
आता २८/३० चा वयात जगविक्रण करण्याचं स्वप्न
आणि कलियुगात गुरुकुलाच स्वप्नं...
जगा वेगळा विचार करणारा तो तरुण कधीच थांबला नाही, थकला नाही, कधी कारण ही दिली नाही.
ह्या आयुष्य चा पिक्चर मध्ये तो हीरो असून ही कधीच हीरो म्हणून वागला नाही.
वयाचा १७ व्या वर्षी सुरू केलेलं 2 विद्यार्थ्यांचं घरकुल, आज एका मोठ्या गुरुकुलात बदलत आहे...

माफ करा.... अरे तुरे करावं लागलं.
तुम्हाला फार कमीच ओळखते मी पण जेवढं माहिती होत तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला.

ह्या कलियुगात खरा कृष्ण म्हणून वावरणारे म्हणजे....


श्री. अजय दरेकर. सर, दादा, बाबा, आई, मित्र, सगळच..!


धन्यवाद!

- अंकिता पेंडूरकर





Comments

Post a Comment